आपल्या दैनदिन तसेच भविष्यातील गरजा भागविण्यासाठी सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे त्यासाठी लागणारा पैसा. आपण आपापल्या कुवतीनुसार पैसा मिळवत असतो. आपल्याकडे एखादे कौशल्य असेल किंवा मिळेल ते काम करण्याची तयारी असेल तर पैसे मिळविणे फारसे अवघड नसते. मात्र मिळत असलेल्या पैशांचा योग्य विनियोग करून आपल्या दैनंदिन तसेच भविष्यातील गरजा भागवणे हे तितकेसे सोपे नसते. असे असले तरी जर आपण आपली अर्थ साक्षरता वाढविली तर हे सहज शक्य होऊ शकते, आणि म्हणून सर्वप्रथम आपण अर्थसाक्षर असणे गरजेचे असते. मात्र त्याधी अर्थ साक्षरता म्हणजे काय हे आपण समजून घेणे आवश्यक आहे. अर्थ साक्षरतेत प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश होतो.

-आपल्याला जे दैनदिन आर्थिक व्यवहार करावे लागतात त्याची प्राथमिक माहिती करून घेणे.
-उदा: बँक व्यवहार( सेव्हींज खाते त्याचे नियम,मुदतीच्या ठेवी का व कशा करव्यात , लॉकर बाबतचे नियम.
-गृह कर्ज/ वाहन कर्ज/ शैक्षणिककर्ज/सोने तारण कर्ज या बाबतची माहिती.
-बँकेव्यतिरिक्त अन्य कोठे गुंतवणूक करता येते (जसे कि पीपीएफ/एनपीएस/म्युचुअल फंड/शेअर्स/कंपनी ठेवी ई. यातील जोखीम व यातून मिळणारा परतावा
-आयुर्विमा/आरोग्य विमा कसा घ्यावा व कसे घेऊ नये.
-आपल्या आर्थिक गरजांचे अल्पकालीन/मध्यमकालीन व दीर्घकालीन असे वर्गीकरण करून त्या दृष्टीने अर्थी नियोजन करणे .
-आपल्या आर्थिक उत्पन्नानुसार नेमका किती प्राप्तिकर भरावा लागेल व तो कमीतकमी भरावा लागण्यासाठी कुठे व किती गुंतवणूक करावी, आपल्यासाठी प्राप्तीकराचा कोणता पर्याय (जुना कि नवा ) योग्य राहील हे समजून घेणे.
-आपले रिटायरमेंट प्लॅनिंग का व कसे करावे व त्यासाठीचे योग्य पर्याय कोणते?
-आपल्या केलेल्या गुंतवणुकीस नॉमिनेशन कसे करावे.
-आपल्या पश्चात आपल्या चल अचल संपत्तीचे योग्य वाटप होण्याच्या दृष्टीने मृत्युपत्र कसे करावे.
-आजच्या डिजिटल जमान्यात नेट बँकिंग, मोबाईलबँकिंग , तसेच भीम/गुगल पे /फोनपे यासारखे युपीआय अॅप कसे वापरावेत.
-आर्थिक व्यवहार करताना जर आपली चूक झाली असेल तर ती कसी सुधारावी व फसवणूक झाली असेल तर आपले पैसे वसूल होण्यासाठी काय कृती करावी .
-पैसे कुठे गुंतवू नयेत याची जाणीव होणे.

hindu names of hijackers controversy
भावना दुखावून घेण्याची साथ आली आहे का? आयसी-८१४ वरील वाद हे त्याचंच लक्षण…
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
behavior, offensive, past, someone behavior,
माणसं अशी का वागतात?
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
morality Act to impose restrictions on women by the Taliban government of Afghanistan
संपूर्ण शरीर झाकणारा पोशाख… मोठ्या आवाजात बोलणे नाही, गाणी नाही… महिलांसाठी अफगाण नैतिकता कायद्यातील अजब तरतुदी! 
Healthy Foods for Your Liver
लिव्हर खराब होण्याचा धोका वाटतोय? लिव्हरमधील फॅट्स झपाट्याने काढून टाकतात ‘हे’ आठ पदार्थ? सेवनाची पद्धत घ्या समजून…
How to unsend an email in Gmail
How to undo Gmail : एकदा पाठवलेला मेल आता ‘Undo’ करता येणार; फक्त ‘या’ चार स्टेप्स फॉलो करा
Take care of your scooter
‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने घ्या तुमच्या स्कुटीची काळजी; मिळेल जास्त अ‍ॅव्हरेज

आज आपल्या १.४० कोटी लोकसंखेच्या सुमारे ७७% ते ७८% लोक साक्षर आहेत मात्र केवळ २७% ते २८% इतकेच लोक अर्थसाक्षर असल्याचे दिसून येते. आपण साक्षर आहोत याचा अर्थ अर्थ साक्षर आहोतच असे नाही हे वरील आकडेवारीने लक्षात येते. म्हणून या विषयाकडे सरकारी पातळीवरसुद्धा गांभीर्याने पहिले जात आहे. विविध बँका, म्युचुअल फंड कंपन्या, एनएसइ , बीएसइ एनएसडीएल,सीडीएसएल या सारख्या वित्तीय संस्था संपूर्ण भारतभर गेली १० वर्षे अर्थ साक्षरतेचे कार्यक्रम करत आहेत. अर्थ साक्षरतेच्या अभावामुळे एक तर चुकीचा आर्थिक निर्णय घेतला जातो किंवा आपली फसवणूक होते व दोन्हीमुळे शेवटी आपले आर्थिक नुकसानच होते म्हणून प्रत्येकाने आपली अर्थ साक्षरता वाढविणे अत्यंत आवश्यक आहे.

अर्थ साक्षरतेचे फायदे
• अधिक माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता वाढीस लागते
• पैसे आणि कर्जाचे प्रभावी व्यवस्थापन करता येणे शक्य होते.
• आर्थिक ध्येय प्राप्त करण्यसाठी नियोजन कसे करावे हे समजते.
• अनावश्यक खर्च टाळता येणे शक्य होते.
• गुंतवणुकीचे विविध पर्याय माहित झाल्याने आपल्या गरजेनुसार व जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार गुंतवणूक केली जाते व आपली गुंतवणुकीतील फसवणूक होत नाही.
• आर्थिक चिंता कमी होत असल्याने आणि मानसिक तणाव कमी होतो.
• विमा, कर्ज, गुंतवणूक आणि क्रेडिट कार्ड ,सोने, घर जमीन घेताना योग्य तो विचार केला जात असल्याने आपल्याला योग्य व परवडू शकेल अशीच खरेदी केली जाते, परिणामी कर्जबाजारीपणा येत नाही.
• आर्थिक नियोजन केले जात असल्याने उद्दिष्ट पुरती होऊ शकते.(उदा: मुलांच्या शिक्षणाच्या /विवाहाच्या खर्चाची तरतूद केली जाते)
• इन्श्युरन्सची उपयुक्तता व आवश्यकता समजल्याने चुकीच्या इंश्युरंस पॉलीसी घेतल्या जात नाहीत.
• प्राप्तिकरा बाबतची माहिती झाल्याने आवशक्य तेव्हढाच कर वेळेत भरला जातो व रिटर्न ही वेळेतच दाखल केले जाते यामुळे विलंब शुल्क द्यावे लागत नाही व रिफंड ही वेळेत मिळतो.

हे आणि असे अनेक फायदे अर्थसाक्षरतेमुळे होत असतात. अशी ही आवश्यक ती अर्थ साक्षरता आपल्यामध्ये आणण्यासाठी पुढील गोष्टी आपण स्वत: करणे गरजेचे आहे.

-आजकाल सर्व प्रमुख वर्तमानपत्रं (उदा: सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्रटाइम्स, तसेच विविध साप्ताहिके किवा मासिके ) विविध आर्थिक विषयावर तज्ज्ञांचे लेख प्रकाशित करीत असतात. असे लेख वाचल्याने आपली अर्थ साक्षरता वाढू शकते मात्र यात सातत्य आवश्यक असते.
-आता आपल्याला ज्याबाबत आर्थिक निर्णय घ्यायचा आहे त्याची सगळी माहिती गुगलवर सहजगत्या मिळू शकते. उदा: आपल्याला लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घ्यायची असेल तर त्याबाबत गुगलवर माहिती घेतल्यास आपल्याला टर्म इन्शुरन्स म्हणजे काय, युलिप म्हणजे काय, इंडोव्हमेंट पॉलीसी म्हणजे काय तर मनी बॅक पॉलिसी म्हणजे काय याची तपशीलात माहिती मिळू शकते व प्रत्येक पॉलिसीचे फायदे तोटे सुद्धा समजून येतात यामुळे आपण योग्य ती लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेऊ शकतो. तसेच गुंतवणूक करावयाची असल्यास गुगलवर गुंतवणुकीचे विविध पर्याय व त्यातून मिळणारा परतावा व गुंतवणुकीतील जोखीम (रिस्क ) तसेच तरलता(लिक्विडीटी) याची माहिती मिळत असल्याने आपण गुंतवणुकीचा योग्य निर्णय घेऊ शकतो.
-आपल्या जवळपास किंवा कामाच्या ठिकाणी एखादा अर्थ साक्षरतेचा कार्यक्रम होणार असेल तर त्यास आवर्जून जावे यातूनही आपल्याला बरीच माहिती माहिती मिळू शकते.
-या विषयातील तज्ञ ऑनलाईन तसेच ऑफलाईन वर्ग घेत आहेत आपल्या जवळचा असा एखादा क्लास जॉईन करावा, यासाठी काही भरावी लागली तरी यातून आपल्याला उपयुक्त अर्थ विषयक माहिती मिळून आपली अर्थ साक्षरता वाढेल.
-युट्यूब वर सुद्धा बऱ्याच तज्ञांचे म्युचुअल फंड, इंश्युरंस, प्राप्तीकर ,शेअर मार्केट, बँकिंग , इन्शुरन्स व्हिडीओ उपलब्ध आहेत तसेच हे तज्ञ वेळोवेळी या विषयावर नवीन व्हिडीओ करून सबंधित विषयाची माहिती अद्ययावत करीत असतात. असे आपल्याला हव्या असलेले व्हिडीओ सबसक्राइब केल्याने आपण अपडेट राहू शकता. यामुळे आवश्यकतेनुसार बदल करता येतात.
-गुंतवणूक तज्ज्ञाचा आवश्यकतेनुसार सल्ला घ्या , सल्ला घेताना संबंधित व्यक्ती संबंधित विषयात तज्ज्ञ असल्याची खात्री करून घ्या व त्याला योग्य ती फी द्या , फुकट सल्ला देणाऱ्याच्या मागे जाऊ नका. त्यातून तुमची फसवणूक होण्याची शक्यता दाट असते.
अर्थसाक्षरते सोबतच खालील बाबी सुद्धा लक्षात घेणे आवश्यक आहे.
-गुंतवणुकीस शक्य तितक्या लवकर सुरवात करावी व वाढत्या उत्पन्नानुसार गुंतवणूक वाढवीत जावे.
-गुंतवणुकीत सातत्य ठेवावे
-गुंतवणुकीतील जोखीम समजून घेऊन आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार जोखीम घ्यावी मिळणारा रिटर्न आपण घेतलेल्या जोखमेनुसार असतो .
-आपण केलेल्या गुंतवणुकीचे ठराविक कालावधी नंतर पुनरावलोकन करावे व गरजेनुसार त्यात बदल करावा.केवळ कर बचतीच्या उद्देशाने एन्डोवमेंट,मनीबॅक, युलीप यासारख्या पॉलिसी घेऊ नयेत. तर कमीतकमी प्रीमियम भरून जास्तीत जास्त कव्हर देणारी टर्म इन्शुरन्स पॉलिसी घ्यावी.

अधिक लाभाच्या प्रलोभनाने बँक/पोस्ट/पीपीएफ/आरबीआयबॉंड व्यतिरिक्तच्या पर्यायात गुंतवणूक करू नये. आपण कोणत्या बँकेत गुंतवणूक करीत आहोत ती बँक आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे का याची खात्री करून घ्या. क्रेडिट रेटिंग पाहूनच गुंतवणूक करावी.
जोखीम समजून घेऊन म्युचुअल फंड, शेअर्स यासारख्या पर्यायात काही रक्कम जरूर गुंतवावी.
एमएलएम तसेच पोन्झी योजनेपासून दूरच राहावे.

थोडक्यात आपण जरी साक्षर असलो तरी आपल्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आपण आपली आपली आर्थिक साक्षरता वाढविणे अत्यंत आवश्यक आहे व त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे.