आपल्याला अपघात होऊ नये असे प्रत्येकास वाटते व त्या दृष्टीने आपण काळजी सुद्धा घेत असतो असे असले तरी कधी आपल्या चुकीने तर कधी दुसऱ्याच्या चुकीने तर कधी नैसर्गिक आपत्तीने तर कधी घातपाताने अपघातात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.भारतात प्रतिदिनी सुमारे १२०० अपघात होत असतात. सुमारे १.५ लाख लोक प्रतिवर्षी या अपघातामुळे मृत्युमुखी पडत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

असा अपघात कोणाच्याही आयुष्यतील दुर्दैवी घटना असू शकते .
कारण अपघाताच्या स्वरूपानुसार खालील तीन गोष्टी संभवतात.
१. अपघातात होणारा दुर्दैवी मृत्यू
२. अपघातामुळे संपूर्ण अपंगत्व अथवा अंशत: अपंगत्व येऊ शकते
३. अपघातामुळे अपंगत्व जरी आले नाही तरी काही काळ हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी राहावे लागते
या तिन्ही कारणाने सबंधित व्यक्ती किंवा कुटुंबीय यांना मोठ्या आर्थिक समस्येस तोंड द्यावे लागते प्रसंगी कर्ज घ्यावे लागते किंवा काही चीज वस्तू नाईलाजाने विकाव्या लागतात, किंवा अन्य कुठल्या महत्वाच्या कारणासाठी बाजूस ठेवलेली शिल्लक वापरावी लागते, परिणामी ज्या उद्देशाने रक्कम शिल्लक ठेवलेली असते त्याची पूर्तता करता येत नाही. यावर मात अपघात विमा पॉलिसी घेऊन सहजगत्या करता येते . मात्र या पॉलिसीबाबत अजूनही जनसामान्यांना फारशी माहिती नसल्याचे दिसून येते. या पॉलिसीची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे
आहेत.

१.साधारणपणे रु. २० ते २५ लाखाचे इन्शुरन्स कव्हर कंपनी देऊ करते. काही थोड्या कंपन्या रु. १ कोटी पर्यंतचे कव्हर देऊ करतात .

२. रु.२० लाखाच्या कव्हरसाठी सुमारे रु.१५०० ते २००० इतका वार्षिक प्रीमियम पडू शकतो. प्रीमियमची रक्कम व पॉलिसीतील अटी इन्शुरन्स कंपनीनुसार कमी अधिक असू शकतात.
३.पॉलिसी सर्वसाधारणपणे एक वर्षाच्या कालावधी साठी दिली जाते मात्र आता काही इन्शुरन्स कंपन्या ३ ते ५ वर्षमुदतीची पॉलिसी देऊ करत आहेत.
४. पॉलिसी देताना वैद्यकीय तपासणी केली जात नाही.
५.वैयक्तिक अपघाती विमा योजनेत अपघाती मृत्यू, कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व, कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व, अल्पकालीन अकार्यक्षमता आदी गोष्टींसाठी विमा कवच लाभते. पूर्वी साहसी खेळ किंवा त्यास्वरूपाच्या गोष्टी व्यक्तिगत अपघात विम्यातून वगळण्यात आल्या होत्या. आता मात्र, साहसी खेळांदरम्यान अपघात झाल्यास त्यासाठीही अपघात विमा छत्र उपलब्ध आहे.
६.अपघाती मृत्यू झाल्यास पॉलिसी धारकाच्या नॉमिनीस कव्हरची संपूर्ण रक्कम दिली जाते.तर जर पॉलिसी धारकास अपघातामुळे संपूर्ण अपंगत्व आले (उदा:दोन्ही डोळे , दोन्ही हात, दोन्ही पाय निकामी झाले असतील ) तर पॉलिसीधारकास पॉलिसी कव्हरची संपूर्ण रक्कम दिली जाते. जर पॉलिसीधारकास अपघातामुळे अंशत: अपंगत्व आले (उदा:एक हात, एक डोळा , एक पाय , किंवा हाताची बोटे किंवा अंधुक दृष्टी ) तर अपंगत्वाचे प्रमाण जितके % असेल त्या प्रमाणात पॉलिसीधारकास क्लेमची रक्कम दिली जाते व हे % सिव्हील सर्जन किंवा तत्सम वैद्यकीय अधिकाऱ्याने तसे प्रमाणपत्र द्यावे लागते. उदा: कव्हरची रक्कम रु.१० लाख आहे व अपंगत्व ४०% इतके असेल तर पॉलिसीधारकास रु. ४ लाख क्लेम पोटी मिळतील.

७. जर पॉलिसीधारकास अपघात्तात झालेल्या दुखापतीमुळे कायमचे अपंगत्व आले नसेल मात्र उपचारासाठी काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागणार असेल तर अशा वेळी जास्तीतजास्त रु.५०० प्रतिदिनी हॉस्पिटल मधील कालावधी किंवा जास्तीतजास्त १०४ दिवस या दोन्हीतील कमी असणाऱ्या कालावधी साठी दिले जातात.
थोडक्यात असे म्हणता येईल कि लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, मेडिक्लेम पॉलिसीबरोबरच वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी घेणे निश्चितच हितावह असते, यामुळे अपघात टाळता येणे जरी शक्य नसले तरी त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान काही प्रमाणात कमी करता येणे शक्य होते. म्हणून आजच्या धकाधकीच्या जीवनात वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी घेणे अगदी आवश्यक आहे.