भारत सरकारच्या अल्प बचत गुंतवणूक योजना खूप लोकप्रिय झाल्या आहेत. त्यात व्याजाची व मुद्दलाची सुरक्षितता हे प्रमुख कारण आहे. आणि म्हणूनच देशातील नागरिक एक उत्तम गुंतवणूक मार्ग म्हाणून त्याचा स्वीकार करीत आहेत. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, किसान विकास पत्र, राष्ट्रीय बचत पत्र, पोस्ट ऑफिसेस मधील मुदत ठेवी किंवा आवर्ती ठेवी त्यात प्रमुख आहेत. यातील काही गुंतवणूक योजनाना गुंतवणूक झाल्यावर प्राप्तिकर कायदा १९६१च्या कलम ८० सी उत्पन्नातून वजावट मिळते तर काहीं योजनांच्या गुंतवणुकीवर मिळालेले व्याज पूर्णतः करमुक्त असते तर काही योजनाचे व्याज ठराविक मर्यादेत अंशतः करपात्र असते. अशा या वैविध्यपूर्ण गुंतवणुकीचा पर्याय असणाऱ्या राष्ट्रीय अल्पबचत गुंतवणूक योजनेत भारत सरकारने आता पूर्वी कधीही महिला केंद्रित नसणारी अशी नवीन ’महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ या गुंतवणूक योजनेचा समावेश केला आहे. या बचत पत्राद्वारे आता महिलाच्या व मुलीच्या आर्थिक सक्षमीकरण करण्याचा मुख्य हेतू आहे.. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही एक भारत सरकारने हमी दिलेली गुंतवणूक योजना असल्याने त्यात गुंतवणूक सुरक्शिततेची कोणतीही आर्थिक जोखीम नाही हे या योजनेचे प्रमुख आकर्षण ठरावे. .

ठळक वैशिष्ट्ये

Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
woman voters chatura article
तू मात्र या फुकट योजनांच्या अमिषाला बळी पडू नकोस…
government that gives Rs 1500 as ladaki bahin is not doing favour to women
‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
hearing in bombay high court after two years in pmc bank scam
पीएमसी बँक घोटाळ्यात दोन वर्षांनंतर आज सुनावणी
mahavikas aghadi release manifesto
महिलांना तीन हजार, मोफत बसप्रवास ते प्रत्येकी ५०० रुपयांत सहा गॅस सिलिंडर; मविआच्या जाहिरनाम्यात घोषणांचा पाऊस!
Mumbai woman lost rupees 6 lakhs
मुंबई : ऑनलाईन वस्तू विकणे महागात, महिलेला लाखोंचा गंडा

भारताच्या अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने सरकारी बचत प्रोत्साहन कायदा, १८७३ च्या कलम ३ए द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, भारतातील प्रत्येक कुटुंबाने घरातील ‘केवळ’ महिलांच्या नावाने सुरक्षित गुंतवणूक करून चांगला परतावा देणारी दोन वर्षे मुदत असलेली ‘महिला सन्मान बचत पत्र’ योजना केंद्र सरकारने जाहीर केली आहे. सदर गुंतवणूक योजना १ एप्रिल २०२३ पासून ३१ मार्च २०२५ पर्यंत खुली राहणार असून चक्रवाढ व्याज पद्धतीने साडेसात टक्के दराने त्यावर व्याज मिळणार आहे. पोस्ट ऑफिसेस व ठराविक बँकामध्ये ही बचतपत्रे गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत. अल्पबचत योजने अंतर्गत महिला केंद्रित असणारी ही योजना सध्या उत्तम गुंतवणुकीतील असणाऱ्या पर्यायामध्ये सर्वात आकर्षक, किमान कालावधीत उत्तम परतावा देणारी म्हणूनच लाभदायी ठरणारी योजना आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्य महिलेने तिचा लाभ घ्यायला हवा इतकी महत्वाची व फलदायी अशी योजना असल्याने अतिशय स्वागतार्ह आहे.

१. कोण गुंतवणूक करू शकतो?

या योजनेत फक्त महिलाच त्यांच्या नावाने वा अज्ञान असणाऱ्या मुलीच्या नावाने तिचे पालक गुंतवणूक करू शकतात. संयुक्त नावाने गुंतवणूक करता येणार नाही तर ही गुंतवणूक कलम ८०सी अंतर्गत उत्पन्नातून वजावटीस पात्र असणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.

२. किमान व कमाल गुंतवणुकीची मर्यादा काय आहे?

किमान एक हजार रुपयांची व त्यानंतर शंभर रुपयांच्या बचत पत्रात तर जास्तीतजास्त रु दोन लाखापर्यंत गुंतवणूक एका महिला व्यक्तीच्या नावाने करता येईल.

३. महिला सन्मान बचत पत्राची मुदत किती?

सदर बचत पात्र दोन वर्षाच्या कालावधी साठी वितरीत करण्याची योजना केंद्र सरकारने घोषित केली आहे.

४. मुदतपूर्व अंशतः रक्कम परत मागता येते काय?

आर्थिक अडचण निर्माण झाल्यास मुदतपूर्ती अगोदर किमान एक वर्षांनी बचतपत्र धारक पैसे फॉर्म नंबर ३ दाखल करून रक्कम अंशतः परत मागू शकतो. त्यास खात्यात मुद्दल व जमा झालेल्या व्याजासह शिल्लक असलेल्या रक्कमेच्या ४०% रक्कम परत मिळत असल्याने तात्पुरती आर्थिक अडचण दूर होऊ शकते. उर्वरीत रक्कम मुदतपूर्ती नंतर फॉर्म नंबर २ दाखल केल्यावर मिळेल.

५. वर्षातून किती वेळा बचत पत्र खरेदी करू शकतो?

दोन बचत पत्र वेगळ्या वेळी घेताना दोहोंमध्ये असणारा कालावधी तीन महिन्यांपेक्षा कमी असता कामा नये.

६. व्याजाचा दर काय आहे

व्याजाचा दर साडे सात टक्के असून चक्रवाढ व्याज पद्धतीने सदर दराने त्यावर व्याज मिळणार आहे. त्यामुळे कमी कालावधीतही अधिक व्याज ही या महिला केंद्रित असणाऱ्या बचत पत्राची खासियत झाली आहे.

७. कोणत्या कारणास्तव मुदतपूर्ती अगोदर बचतपत्र खाते बंद होऊ शकते?

खालील कारणास्तव मुदतपूर्ती अगोदर बचतपत्र खाते बंद होऊ शकते.

(अ) बचतपत्र गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास खाते त्वरीत बंद करता येऊन वारसास पैसे परत मिळू शकतात

(ब) अत्यंत दयनीय कारणास्तव असणाऱ्या परिस्थितीत असणाऱ्या प्रकरणांमध्ये ज्यावेळी खातेदाराच्या जीवघेण्या आजारांमध्ये वैद्यकीय सहाय्य आवश्यक असेल किंवा पालकाचा मृत्यू झाला असेल, अथवा खाते चालू ठेवल्याने खातेदाराला अवाजवी त्रास होत असेल अशा परिस्थितीत पूर्ण कागदपत्रांच्या आधारे आणि लिखित स्वरुपात नोंदवल्या जाणाऱ्या कारणांमुळे, जेथे पोस्ट ऑफिस किंवा संबंधित बँक समाधानी असतील अशा परिस्थितीत हे खाते मुदती पूर्वी बंद करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. असे खाते बंद झाल्यास, मूळ रकमेवर देय असलेल्या व्याज दरानेच म्हणजे साडे सात टक्के दराने व्याज दिले जाईल.

(क) ही गुंतवणूक सहा महिने पूर्ण झाल्यानंतर मुदती पूर्वी बंद करता येते. तथापि, गुंतवणुकीच्या कालावधीकरीता मिळणारे व्याज नियमित दराच्या दोन टक्क्यांनी कमी असणार आहे

८. प्राप्तीकर दायित्व कसे आहे?

अ. दोन वर्षाच्या कालावधी नंतर रु. २ लाख गुंतविलेल्या रक्कमेवर रु. २.३२ लाख मिळतील. यातील मिळणारे व्याज प्राप्तीकर कायद्या अंतर्गत करपात्र आहे.

ब मिळणारे व्याज कनिष्ठ महिलेस मिळाले तर कोणतीही करमुक्तीची सवलत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. कनिष्ठ महिला ज्या उत्पन्नाच्या कर गटवारीमध्ये असेल त्या दराने सदर उत्पन्न करपात्र होईल

क. ज्येष्ठ महिलेस असे व्याज मिळाले तर कलम ८०टीटीबी अंतर्गत रु पन्नास हजार रुपयांपर्यंत उत्पन्नातून वजावट मिळण्यासाठी पात्र आहेत.

९. व्याजावर टीडीएस कापला जाणार काय?

सध्या टीडीएस कापण्याची मर्यादा सर्वसामान्य महिलेस रु. चाळीस हजार आहे तर ज्येष्ठ महिलेसाठी रु पन्नास हजार आहे. याचा अर्थ जोपर्यंत सर्व करपात्र उत्पन्न या रक्कमेच्यापेक्षा अधिक होत नाही तोपर्यंत टीडीएस कापला जाणार नाही. या योजनेत जर ‘इतर काही उत्पन्न’ नसेल तर दोन वर्षानंतर जास्तीजास्त बत्तीस हजार रुपये मिळणार असल्याने टीडीएसच्या तरतुदी लागु होणार नाहीत. इतर उत्पन्न असल्यास या व्याजावरही करकपात होईल असे अधिसूचित करण्यात आले आहे.

१०. पॅन व आधार क्रमांक देणे आवश्यक ?

खाते उघडताना पॅन व आधार क्रमांक देणे आवश्यक असल्याने सदर व्याजाची माहिती एआयएस मध्ये समाविष्ट केली जाणार आहे हे लक्षात घेतले पाहिजे.