भारत सरकारच्या अल्प बचत गुंतवणूक योजना खूप लोकप्रिय झाल्या आहेत. त्यात व्याजाची व मुद्दलाची सुरक्षितता हे प्रमुख कारण आहे. आणि म्हणूनच देशातील नागरिक एक उत्तम गुंतवणूक मार्ग म्हाणून त्याचा स्वीकार करीत आहेत. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, किसान विकास पत्र, राष्ट्रीय बचत पत्र, पोस्ट ऑफिसेस मधील मुदत ठेवी किंवा आवर्ती ठेवी त्यात प्रमुख आहेत. यातील काही गुंतवणूक योजनाना गुंतवणूक झाल्यावर प्राप्तिकर कायदा १९६१च्या कलम ८० सी उत्पन्नातून वजावट मिळते तर काहीं योजनांच्या गुंतवणुकीवर मिळालेले व्याज पूर्णतः करमुक्त असते तर काही योजनाचे व्याज ठराविक मर्यादेत अंशतः करपात्र असते. अशा या वैविध्यपूर्ण गुंतवणुकीचा पर्याय असणाऱ्या राष्ट्रीय अल्पबचत गुंतवणूक योजनेत भारत सरकारने आता पूर्वी कधीही महिला केंद्रित नसणारी अशी नवीन ’महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ या गुंतवणूक योजनेचा समावेश केला आहे. या बचत पत्राद्वारे आता महिलाच्या व मुलीच्या आर्थिक सक्षमीकरण करण्याचा मुख्य हेतू आहे.. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही एक भारत सरकारने हमी दिलेली गुंतवणूक योजना असल्याने त्यात गुंतवणूक सुरक्शिततेची कोणतीही आर्थिक जोखीम नाही हे या योजनेचे प्रमुख आकर्षण ठरावे. .
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा