आजकाल मुलं फार लवकर आपल्या करिअरमध्ये कामाला लागतात आणि त्यामुळे त्यांच्या हातामध्ये फार लवकर आणि बराच पैसा यायला सुरुवात होते. आपली भारतीय संस्कृती ही कायमच बचत करण्याच्या बाजूने राहिलेली आहे, आपण कधीही अवांतर खर्च करत नाही. शक्य तेवढं आधी बचत आणि नंतर मग खर्च अशी आपली कार्यपद्धती आहे, आणि त्यामुळेच भारत जगभरामध्ये कितीही संकटं आली तरीसुद्धा अगदी ठामपणे उभा आहे. जगभरामध्ये आज विविध आर्थिक संकटं असताना सुद्धा भारतामध्ये त्याचा कुठलाही विपरीत परिणाम जाणवत नाही, त्याचं कारण एकच की आपण वेळीच बचत करण्याची सवय लावून घेतलेली आहे.

ही बचत करण्याची सवय आजकालच्या मुलांमध्ये सुद्धा वाढीस लागलेली आपल्याला दिसून येते. ही मुले शक्यतो शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीला सुरुवात करतात तर काही ठिकाणी घरच्यांच्या दबावामुळे सोन्यामध्ये सुद्धा गुंतवणूक करण्यासाठी प्रेरित होतात. त्याचबरोबर त्यांना म्युच्युअल फंडाचा सुद्धा पर्याय उपलब्ध आहे आणि आता या सर्वच बाबी ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळे त्यांना फार जास्त त्रास घ्यावा लागत नाही. अशा या नवीन पिढीच्या मुलांचा डिजिटल गोल्डकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे, ते काय विचार करतात याची मांडणी करत मी आज डिजिटल सोन्याचा पर्याय त्यांच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग
Impact of US Elections 2024 on Indian Stock Market
दुरावलेला खरेदी उत्साह बाजारात परत दिसेल?
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
Baroda BNP Paribas Mutual Fund, Prashant Pimple,
‘व्याजदर शिखरावर असताना दीर्घ मुदतीची रोखे गुंतवणूक योग्य’
New Home Investment, Tax Exemption,
करावे कर समाधान : नवीन घरातील गुंतवणूक आणि कर सवलत
India is emerging as worlds third largest power generation and power consumption country
क्षेत्र अभ्यास – ‘पॉवर मोड ऑन’!
Should buy gold or diamond jewellery on Diwali
Money Mantra : दिवाळीत सोन्याचे की हिऱ्याचे दागिने घ्यावेत?

आणखी वाचा: Money Mantra : वर्षभरात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे मिड कॅप फंड; ‘या’ ७ फंडांमध्ये मोठा लाभ

नवीन काळामध्ये किंवा कॉम्प्युटर युगामध्ये सर्वच गोष्टी डिजिटल झाल्या आहेत आणि आता सोनंसुद्धा डिजिटल आपल्यासमोर आलं आहे तर या नवीन मुलांनी डिजिटल गोल्डचा पर्याय आपल्या बचत माध्यमांसाठी जर वापरला तर त्यांना फार मोठा फायदा भविष्यामध्ये मिळू शकतो. प्रत्यक्ष सोनं खरेदीमध्ये मी वेळोवेळी सांगितलेलं आहे की तुम्हाला जीएसटी लागू होतो त्याचबरोबर त्या दागिन्यांची घडणावळसुद्धा लागू होते शिवाय विक्री करताना आपल्याला किमान १७ टक्के रक्कम कमी मिळते त्यामुळे गुंतवणूक करताना डिजिटल गोल्ड चा पर्याय शक्यतो वापरावा.

यामध्ये मी पुन्हा एकदा प्रेफरन्स देईल की या मुलांनी सॉवरेन गोल्ड बॉंड चा विचार नक्की करावा कारण या मुलांकडे मोठी रक्कम येत असल्यामुळे महिना केवळ एक युनिट बॉण्ड खरेदी करून सुद्धा या माध्यमात गुंतवणूक सुरू करता येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सॉवरेन गोल्ड बॉंड मध्ये सोन्याचे मूल्य तर वाढतच परंतु त्याचबरोबर वार्षिक अडीच टक्के व्याजदर सुद्धा मिळत हे कुठल्याही गुंतवणूक प्रकारापेक्षा जास्त आहे, कारण सोन्यामध्ये वार्षिक किमान 8% तरी सरासरी वाढ होतेच होते आणि या आठ टक्क्यांमध्ये SGB मुळे अडीच टक्के वाढतात म्हणजे या ठिकाणी मिळालेला परतावा हा साडेदहा टक्क्यांपर्यंत असू शकतो किंवा त्यापेक्षा जास्तही असू शकतो. जर सोन्याचे भाव वाढले तर त्यामुळे हा सर्वोत्तम पर्याय या नवीन गुंतवणूकदारांनी जरूर वापरला पाहिजे.

आणखी वाचा: Money Mantra: ‘मिशो’च्या नफ्याचं गमक काय?

याव्यतिरिक्त जर त्यांना असं वाटत असेल की रक्कम आपल्याला कमी गुंतवायची आहे तर अगदी पन्नास शंभर रुपये सुद्धा गोल्ड ईटीएफ मध्ये गुंतवणूक करून ती आपल्या सोन्यामधील गुंतवणूक बिना जोखमीची आणि सुरक्षितरित्या करू शकतात. या ठिकाणी मिळणारा त्यांचा परतावा हा सोन्याची जेवढी किंमत वाढेल तेवढा मिळतो.

टॅक्स प्लॅनिंग सुद्धा SGB मध्ये फार चांगल्या रीतीने करता येतं कारण कमी वयामध्ये गुंतवणूक सुरू केल्यामुळे त्यांना जेव्हा आठ दहा वर्षानंतर पैसा लागेल तेव्हा या बॉण्ड मधून टॅक्स फ्री परतावा मिळेल त्यामुळे जास्त कुठलेही प्लॅनिंग न करता टॅक्स फ्री इन्कम ते या ठिकाणावरून घेऊ शकतात.

याचबरोबर डिजिटल गोल्डमध्ये काम करणाऱ्या काही खाजगी कंपन्या आजचा भाव निश्चित करून पाच वर्षापर्यंतचे बिनव्याजी हप्ते रक्कम भरण्यासाठी उपलब्ध करून देतात. या योजनेमध्ये या नव तरुणांना सोन्याच्या भाव वाढीचा फायदा मिळतोच मिळतो शिवाय सर्व गुंतवणूक एकाच वेळी करण्याची सुद्धा गरज पडत नाही भाव निश्चिती केल्यामुळे वाढणारा भाव हा त्यांचा मोठा परतावा असू शकतो त्याचबरोबर मासिक हप्ते भरल्यामुळे मोठ गोल्ड बुकिंग या माध्यमातून करता येत आणि मोठा फायदा घेता येतो.

नव तरुणांनी इतर गुंतवणूक पर्यायावरच डिजिटल गोल्डचा पर्याय जरूर अभ्यासावा.