आयुष्यात पैशाने सर्व सुखं मिळवता येत नाहीत हे खरंच आहे पण जवळ पैसे नसतील तर आयुष्यातल्या अनेक चिंता वाढतात हे सुद्धा तितकंच खरं आहे. आपल्याला आनंदी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी त्याच बरोबर आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या योग्य त्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी सतत कमी जास्त प्रमाणात पैसे लागतच असतात. कधी काही अनपेक्षित आणि अटळ कारणांमुळे, किंवा निवृत्तीनंतर अपरिहार्यता म्हणून आपल्या कमाईचा ओघ मंदावतो किंवा थांबतो. या कालखंडामध्ये सुद्धा आपल्या गरजा पूर्ण करता याव्यात, त्याच बरोबर आपल्याला एक चांगली जीवनशैली सुद्धा सांभाळता यावी, यासाठी आपण नियमित पैसे कमावत असतानाच त्यातल्या योग्य भागाची उत्तम प्रकारे गुंतवणूक करणं आवश्यक असतं.

भविष्यकाळामध्ये अधिक लाभ मिळवण्याच्या उद्देशाने आपल्या जवळचे पैसे, सेवा किंवा इतर संसाधनं एखाद्या संस्थेला, एखाद्या योजनेला किंवा एखाद्या व्यक्तीला देणं म्हणजे ‘गुंतवणूक’. आर्थिक गुंतवणुकीच्या संदर्भात बोलायचं झालं तर. आपल्या जवळचे पैसे एखाद्या कंपनीमध्ये , संस्थे मध्ये किंवा योजनेमध्ये गुंतवून त्यापासून. गुंतवलेल्या रकमेपेक्षा अधिक परतावा मिळवणं हे गुंतवणुकीचं प्रमुख उद्दीष्ट असतं.

ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
high expectations from third quarter
तिसऱ्या तिमाहीकडून अपेक्षांचे ओझे !
loksatta money motra article Growth and Value strategy
तुमची रणनीती काय? ‘ग्रोथ की व्हॅल्यू’
RBI
अग्रलेख: दोन पुढे, चार मागे!
Success Story kalyani and dinesh Engineer couple
Success Story: इंजिनिअर जोडप्याने सुरू केला स्वतःचा व्यवसाय; वर्षाला कमावतात करोडो रुपये

आणखी वाचा: Money Mantra: आनंदी गुंतवणूक

अनेक कंपन्या किंवा संस्था एखाद्या उत्पादन, तंत्रज्ञान किंवा सेवे पासून, लाभ मिळवण्याच्या उद्देशाने त्यामध्ये, पैसे गुंतवून त्याचा उद्योग किंवा व्यवसाय उभा करतात. कंपनी किंवा संस्थेच्या पलीकडे जाऊन जेव्हा एखादी व्यक्ती स्वतः वैयक्तिक पातळीवर गुंतवणूक करते तेव्हा ती तिची ‘वैयक्तिक गुंतवणूक’ होते. आपल्या जवळ आज असलेल्या पैशांचा आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला भविष्यकाळात लाभ मिळावा हा आपल्या वैयक्तिक गुंतवणुकीचा मर्यादित पण अतिशय महत्वाचा उद्देश असतो.

अर्थशास्त्रातील काही मूलभूत सिद्धांत, मार्गदर्शक तत्वं आणि नियमांच्या आधारावर बहुविध दृष्टिकोनातून विचार करून आपल्या गुंतवणुकी संबंधी निर्णय घेणे म्हणजे आपल्या ‘गुंतवणुकीचं नियोजन’ करणे. गुंतवणूकीचं नियोजन करताना आपल्याला त्या गुंतवणुकीवरून किती कालावधी नंतर परतावा अपेक्षित आहे, परतावा मिळण्यास त्या पेक्षा अधिक कालावधी लागला तर त्या अतिरिक्त काळामध्ये तगून रहाण्याची आपली कितपत क्षमता आहे, आणि त्या गुंतवणुकी मागचं आपलं नेमकं उद्दिष्ट काय आहे म्हणजे, त्या गुंतवणुकी मधून मिळालेला परतावा आपलयाला नेमका कशासाठी ( उदा. मालमत्ता खरेदी करण्यासाठी, निवृत्ती नंतर उत्तम जीवन जगण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी इ.) वापरायचा आहे आणि आपली आर्थिक परिस्थिती म्हणजे, गुंतवणुकीसाठी आपल्याकडे उपलब्ध असलेले पैसे, यांचा प्रामुख्याने विचार केला जातो. या बरोबरच गुंतवणुकीचं नियोजन करताना जागतिक किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि नियमात होऊ शकणारे बदल, शेअर आणि धातूंच्या बाजारपेठेत होऊ शकणारे अल्प आणि दीर्घकालीन चढ- उतार या सर्व बाह्य घटकांचा सुद्धा विचार करून ‘योग्य तितकी’ गुंतवणूक केली जाते.

आणखी वाचा: Money Mantra: आनंदी गुंतवणूक
‘योग्य तितकी’ गुंतवणूक करण्यासाठी आपण किती पैसे कमावतो याच्या इतकंच आपण किती पैसे वाचवतो हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. काही वेळा आपण अनावश्यक खर्च करतो. त्याच बरोबर, बऱ्याच वेळा, आपण आपलं ‘क्रेडिट कार्ड’ वापरून केलेल्या खरेदी वर किंवा आपण भरत असलेल्या ‘ई.एम.आय.’ आवश्यकते पेक्षा कितीतरी अधिक पट रक्कम, आपल्याला क्रेडिट कार्ड आणि ‘ई.एम.आय सुविधा देणाऱ्या बँकेला, विनाकारण देत असतो. क्रेडिट कार्डच्या वापरा संबंधी आणि ई.एम.आय. पद्धतशीर हाताळणी विषयी पुरेसं ज्ञान नसल्यामुळे किंवा अनवधानाने किंवा बँकांच्या जाहिरातींना भुलल्यामुळे आपण ती अतिरिक्त रक्कम भरत असतो . यामध्ये आपले कष्टाने कमावलेले पैसे अक्षरश: वाया जात असतात. क्रेडिट कार्ड आणि इ.एम. आय. संबंधी योग्य माहिती घेतली तर आपण वाया जात असलेले ते पैसे वाचवून तेच पैसे एखाद्या चांगल्या आणि लाभदायी योजनेत गुंतवून त्यापासून अनेक फायदे मिळवू शकतो.

आपली वैयक्तिक गुंतवणूक ही गुंतवणुकीच्या, मुख्यतः, ‘सूक्ष्म गुंतवणूक’ या प्रकारात येते. आपलीकडे उपलब्ध असलेल्या पैशां मधूनच काही रक्कम बाजूला काढून ती नियमितपणे आणि दीर्घकाळ गुंतवण्याला ‘सूक्ष्म गुंतवणूक’ असं संबोधलं जातं. सूक्ष्म गुंतवणूक सामान्य माणसाला आर्थिक दृष्टया परवडणारी असते. त्याचबरोबर या गुंतवणुकीची पद्धतसुद्धा सहज आणि सोपी असते. सूक्ष्म गुंतवणुकीमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. ज्या योजनांमध्ये किंवा कंपन्यामध्ये फक्त श्रीमंत लोक गुंतवणूक करतात आणि त्यातून मोठा नफा मिळवत अधिक श्रीमंत होत जातात अशा योजनां आणि कंपन्यांमध्ये ‘नियोजन पूर्वक’ गुंतवणूक करून सामान्य मध्यम वर्गीय गुंतवणूक दार सुद्धा गुंतवणूक करून उत्तम नफा मिळवू शकतो. ‘गुंतवणुकीचं नियोजन’ समजून घेतलं तर आपल्या मर्यादित पुंजी मधून सुद्धा आपण उत्तम नफा कमवू शकतो. बँक किंवा वित्तीय सेवा देणाऱ्या एखाद्या कंपनी मध्ये किंवा जीवन विम्या सारख्या एखाद्या योजनेमध्ये अथवा जागा व घरासारख्या मालमत्तेमध्ये किंवा एखाद्या कंपनीच्या समभागांमध्ये किंवा म्युच्युअल फंडासारख्या सुविधांमध्ये नियोजनपूर्वक गुंतवणूक केल्यास आपण आपलं आणि आपल्या कुटुंबीयांचं भविष्य सुरक्षित आणि आनंदी करू शकतो . परंतु आपल्यापैकी बरेचजण विनाकारणच नियोजन पूर्वक गुंतवणूक करणं टाळत राहतात .

माझ्या ऑफिस मधला एक सहकारी काही कामानिमित्त श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला होता . एके दिवशी संध्याकाळच्या सुमारास तो उतरला होता त्या हॉटेल मध्ये अचानक कसली तरी गडबड जाणवू लागली . हॉटेल मध्ये जागोजागी हातात शस्त्र घेतलेले श्रीलंकेचे गणवेशधारी जवान आणि पोलीस दिसू लागले. हॉटेल बाहेरच्या रस्त्यावर सुद्धा श्रीलंकन सेनादलाची सुसज्ज वाहनं आणि हातात अत्याधुनिक शस्त्र घेतलेले जवान फिरू लागले . माझ्या मित्राने हॉटलच्या व्यवस्थपकाला या मागचं कारण विचारलं. “काही अतिरेक्यांनी शेजारच्या गावात मोठा हल्ला केला आहे . आता ते इथे सुद्धा तसाच हल्ला होऊ शकतो अशी माहिती मिळाली आहे . म्हणून काळजी घेतली जात आहे ” त्या व्यवस्थापकाने उत्तर दिलं. माझ्या सहकाऱ्यालाला दरदरून घाम फुटला . त्याने स्वतःला कसंबसं सावरलं. त्याला आपल्या बायकोची आणि शाळेत जाणाऱ्या मुलाची प्रचंड आठवण आली. त्याच्या मनात विचार येऊ लागला कि , ‘आता इथे आपलं काही बरं-वाईट झालं तर आपली बायको आणि मुलाचं पुढे काय होणार?‘ माझ्या सहकाऱ्याला उत्तम पगार मिळत होता. कंपनी त्याच्या प्रॉव्हिडंट फंडाची मोठी रक्कम दर महिना त्याच्या प्रॉव्हिडन्ट फ़ंडाच्या खात्यात जमा करत होती . पण त्या व्यतिरिक्त भविष्य काळाची तरतूद करण्यासाठी त्याने कोणतीही गुंतणूक नव्हती . पैशाच्या बाबतीत आपण अतिशय बेजबाबदार पणाने वागलो आहोत आणि त्याचे परिणाम आपल्या बायको आणि मुलाला भोगायला लागू शकतात हे त्याच्या त्या वेळी लक्षत आलं . त्याच्या सुदैवाने हॉटेल वर त्या रात्री कोणताही हल्ला झाला नाही . माझा सहकारी भारतात त्याच्या घरी सुखरूप परतला.
माझ्या सहकाऱ्यावर आली तशाच प्रकारची आपत्कालीन परिस्थिती, एखाद्या अपघातामुळे किंवा अचानक उदभवलेल्या आजारपणामुळे किवा तत्सम एखाद्या कारणामुळे आपल्या पैकी कुणावरही येऊ शकते. त्या वेळी आपलं कुटुंब किमान आर्थिक दृष्ट्या सुरक्षित आहे ही जाणीव होणं अत्यावश्यक ठरतं. सुरक्षिततेची ती जाणीव मिळवण्यासाठी आधी उत्तम नियोजन करून गुंतवणूक करावी लागते.
आपल्या गुंतवणुकीतील धोका कमी करून त्यापासून जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी पैशांपेक्षा सुद्धा गुंतवणुकीच्या या नियोजनाची समज असं असणं अधिक गरजेचं आहे. योग्य नियोजनाने केलेली गुंतवणूक सहज आणि सुखकर असते.

आपली गुंतवणूक सहज आणि सुखकरच असावी. तशी असेल तर ती आपल्याला अधिक लाभदायक ठरते. अशी गुंतवणूक आपल्या भविष्यकाळाबरोबरच आपला वर्तमान काळ सुद्धा आंनदी बनवते . ‘आनंदी गुंतवणूक ‘ या आपल्या साप्ताहिक सदरा मध्ये आपण अशाच सहज, सुखकारक आणि आपलं आयुष्य अधिक आनंदी बनवणाऱ्या गुंतवणुकींच्या संधी आणि मार्गां विषयी विषयी जाणून घेणार आहोत .

Story img Loader