डॉ. गिरीश वालावलकर

‘कर्जाचा सर्वोत्तम प्रकार म्हणजे कर्ज नसणं!!” असं मानलं जातं. ‘ऋण काढून सण करू नये’ असं आपल्या आजोबा आणि वडिलांनी आपल्याला संगितलं आहे. ते खरं सुद्धा आहे . परंतु पूर्वी मुख्यतः सावकाराकडून कर्ज घेणं हा कर्जाचा जवळपास एकमेव पर्याय उपलब्ध होता, त्याकाळी हे वाक्य जितकं अर्थपूर्ण होतं तितकं अर्थपूर्ण ते आज राहिलं नाही, हे सुद्धा सत्य आहे. त्याकाळी कर्ज देणारा सावकार किंवा पेढी भरमसाठ व्याज दर लावून कर्ज देत असे. पैशांची गरज असलेल्या माणसाला दुसरा पर्याय नसल्याने ते कर्ज घेणं भाग असे. त्यानंतर त्या कर्जावरचं व्याज भरताना त्याचा जीव मेटाकुटीला येई. व्याजदर प्रचंड असल्याने कर्जदार बऱ्याच वेळा मुद्दल तर सोडाच पण व्याज सुद्धा फेडू शकत नसे. मग पुढे त्याला कर्जासाठी तारण ठेवलेलं घर, जमीन किंवा दागिने त्याला सावकाराला द्यावे लागत आणि कर्ज घेतलेला तो माणूस कफल्लक होई. अशी कर्जाने गांजलेली माणसं आपण कदाचित प्रत्यक्षात पहिली असतील आणि प्रत्यक्षात नसली तर, हिंदी आणि मराठी सिनेमात तरी नक्की पहिली असतील.

overseas debt become expensive due to the depreciating rupee
रुपयाच्या अवमूल्यनामुळे परदेशातून कर्ज उभारणी महाग
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
friend beaten , loan , Pune, Bhosari, pune news,
पुणे : उसने दिलेले पैसे परत मागितल्याने मित्राला लाकडी दांडक्याने मारहाण
rupee recovered 8 paise from its historic low against the us dollar to settle at 86.62
नीचांकी पातळीवरून रुपया ८ पैशांनी सावरला
Jumped Deposit Scam
बॅलेन्स चेक करताना बँक खातंच रिकामं; काय आहे नवीन ‘Jumped Deposit Scam’?
torres financial fraud loksatta news
Money Mantra : टोरेससारखी फसवणूक टाळायची असेल तर हा लेख तुमच्यासाठीच
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
Image Of Priyanka Gandhi And PM Modi
Dollar vs Rupee : “रुपयाच्या घसरणीचे सर्व विक्रम मोडले, पंतप्रधानांनी जनतेला उत्तर द्यावे”, प्रियांका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

कर्ज न फेडू शकल्याने अडचणीत आलेली माणसं आजही आपण पाहतो. पण आज कर्ज न फेडू शकल्याने एखादा माणूस अडचणीत येण्याची प्रामुख्याने तीन कारणं असतात.

१. त्याने कर्ज फेडण्यासाठी घेतलेलं नसतं. कर्ज घेतानाच ते न फेडता त्यातून बाहेर कस पडायचं याची योजना केलेली असते.
२. त्याने कर्ज एका कामासाठी घेतलेलं असतं पण ते पैसे तो वेगळ्याच कामासाठी खर्च करतो. म्हणजे एखादा माणूस उद्योग सुरु करण्यासाठी कर्ज घेतो पण नंतर मोहात पडून ते पैसे स्वतःसाठी गाडी घेणं किंवा कुटुंबाबरोबर फॉरीन ट्रीपला जाणं यामध्ये खर्च करतो.
३. त्याने कर्ज घेताना कर्जाचे उपलब्ध पर्याय, व्याज दर, कर्जावर मिळणाऱ्या सवलती आणि कर्जफेडीचं वास्तवावर आधारलेलं सुयोग्य नियोजन केलेलं नसतं.

आणखी वाचा-Money Mantra: अशी सोने खरेदी तुम्ही केलेय का?

पहिल्या दोन प्रकारातल्या व्यक्तींनी अडचणीची परिस्थिती स्वतःवर ओढवून घेतलेली असते. परंतु सर्वसामान्य माणूस जेव्हा कर्ज घेतो तेव्हा त्याला त्या पैशांचा योग्य विनियोग करून, कर्जाचे हप्ते वेळेवर फेडत ठरलेल्या मुदतीत कर्ज मुक्त होण्याची इच्छा असते. कर्ज घेताना सर्वांगीण विचार करून, बाजारात उपब्ध असलेले पर्याय तपासून, परतफेडीचं संपूर्ण नियोजन करून कर्ज घेतल्यास आपली त्या वेळची पैशाची गरज भागते, कर्ज वेळेवर फेडता येतं व त्या बरोबर इतरही काही फायदे सुद्धा मिळतात. योग्य विचार आणि नियोजन करून घेतलेल्या कर्जातून घर किंवा गाडी सारखी वस्तू खरेदी करणं, मुलांचं शिक्षण अथवा लग्न करणं हे कधीकधी स्वतःच्या बचतीच्या पैशातून हे खर्च करण्यापेक्षा सुद्धा किफायतशीर ठरू शकतं.

कर्ज काढून खर्च केल्यास त्याचे प्रमुख्याने पुढील फायदे असतात :

कर्ज घेतल्यास आपल्याला आयकरामध्ये सवलत मिळते. कित्येक वेळा करात मिळणाऱ्या सवलतीमुळे वाचणारी रक्कम ही व्याजापोटी भराव्या लागणाऱ्या रकमेइतकीच किंवा कधीतरी त्यापेक्षा सुद्धा थोडी जास्तच असते. विशेषतः घर खरेदीसाठी कर्ज घेतल्यास सरकार आयकरामध्ये अनेक सवलती देतं. कर्जाची रक्कम किती असल्यास आपल्याला करात जास्तीजास्त सवलत मिळेल याचा अभ्यास करावा. तेवढी रक्कम निश्चित पणे कर्जाऊ घ्यावी. त्यामुळे कर्जाच्या संपूर्ण कालावधीचा विचार करता आयकरामध्ये भरावी लागणाऱ्या मोठ्या रकमेची बचत होते.

काही वेळा आपण एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी पैसे उभे करायचे असतात. पण त्यासाठी कर्ज घेण्याचं आपण टाळतो. त्या ऐवजी आपली एखादी मालमत्ता म्हणजे जमीन किंवा सोनं विकतो. दूरगामी विचार करता ते तोट्याचं ठरू शकतं. म्हणजे समजा, आपल्या जमिनीची किंवा मालमत्तेची किंमत प्रतिवर्षी १२ टक्के दराने वाढत राहणं अपेक्षित असेल, आणि त्यासाठी कर्ज घेतलं तर भराव्या लागणाऱ्या व्याजाचा दर १० टक्के असेल तर ती मालमत्ता विकण्यापेक्षा कर्ज घेऊन व्याज भरणं अधिक किफायतशीर ठरू शकतं. ती मालमत्ता आपल्याकडेच ठेवली तर काही काळानंतर तिची किंमत व्याजापोटी १० टक्के दराने भरलेल्या रकमेपेक्षा कितीतरी अधिक झालेली असेल. मात्र मालमत्ता विकायची कि कर्ज घ्यायचं या संबंधीचा योग्य निर्णय घेण्यासाठी, मालमत्तेची किंमत किती वाढेल याचा अचूक अंदाज घेणं आणि त्या नुसार व्याजापोटी भराव्या लागणाऱ्या रकमेचं वाढीव किमतीशी तुलना करणारं गणित मांडण, आवश्यक असतं.

आणखी वाचा-Money Mantra : निफ्टी स्थिरावला.. पुन्हा एकदा तेजीची अपेक्षा !

कर्ज घेतल्यानंतर सर्वसामान्य माणसावर कर्जाचा हप्ता म्हणजे इएमआय भरायची जबाबदारी येते. त्यामुळे तो अनावश्यक खर्च टाळतो. त्याच्या खर्चाला शिस्त लागते. या सर्वांचा फार मोठा दूरगामी फायदा होतो. खरेदीसाठी आपल्या बचतीतले पैसे वापरण्याऐवजी कर्ज घेण्याचे काही दुष्परिणाम सुद्धा आहेत. कर्ज घेतल्यानंतर कर्जाचा हप्ता भरायचं दडपण येतं. कर्ज जर तीन वर्ष , पाच वर्ष किंवा त्या पेक्षाही दीर्घ मुदतीचं असेल तर तितका दीर्घकाळ ते दडपण सहन करावं लागतं. इतका प्रदीर्घ काळ आपल्या उत्पन्नातला एक हिस्सा कर्ज फेडीसाठी बाजूला कडून ठेवावा लागतो. त्यामुळे काही आवश्यक खर्चांवर सुद्धा बंधनं येऊ शकतात. अचानक काही अचानक उदभवलेल्या कारणामुळे आपलं उत्पन्न कमी झालं किंवा बंद झालं तर हप्ता भरणं आणि कर्जाची परतफेड करणं जिकिरीचं होऊन जातं. थोडक्यात, कर्ज घेऊन केलेल्या खरेदीचे पडसाद आयुष्यामध्ये दीर्घकाळ उमटत राहतात.

कर्ज घेण्यासाठी असंख्य कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. बँकेकडून कर्ज मिळवण्याची आपली पात्रता सिद्ध करावी लागते. हे सर्व केल्यावर सुद्धा बँक आपल्याला आवश्यक ती सर्व रक्कम देईल की फक्त त्याचा काही भागच देईल याची खात्री नसते. ते ठरवण्याचे सगळे अधिकार बँकेकडे असतात. कर्ज दिल्यानंतर बँक आपला ‘क्रेडिट स्कोअर’ म्हणजे आर्थिक पत सतत तपासत राहते. या सर्वांपेक्षा सुद्धा अधिक गंभीर बाब म्हणजे दिलेल्या कर्जाच्या बदल्यात बँक आपली एखादी मालमत्ता तारण म्हणून ठेऊन घेते. कर्ज फेडता न आल्यास बँक ती तारण ठेवलेली मालमत्ता जप्त करू शकते , तिचा लिलाव करू शकते , ती विकू शकते आणि आलेल्या रकमेतून आपलं कर्ज वसूल करू शकते. कर्जदाराने तारण ठेवलेल्या मालमत्तेची किंमत बँकेने दिलेल्या कर्जा इतकी किंवा त्यापेक्षा थोडी जास्तच असेल याची खात्री करून घेऊन मगच बँक कर्ज देते. त्यामुळे बँकेने जर तारण ठेवलेली मालमत्ता जप्त केली तर आ[पला फार मोठा तोटा होऊ शकतो. कधी कधी कर्जाचे बरेचसे हप्ते भरून झालेले असतात. म्हणजेच कर्जाची बरीचशी रक्कम फेडलेली असते. उरलेले शेवटचे काही हप्ते भरायला अडचणी येतात. ते भरता येत नाहीत. अशावेळी उरलेल्या त्या थोड्या रकमेसाठी सुद्धा बँक आपली मालमत्ता जप्त करू शकते. ते कधीही न भरून येणारं नुकसान ठरतं. म्हणून कर्ज घेताना, आपली मालमत्ता बँकेकडे तारण म्हणून सोपवयची जोखीम घ्यावी का याचा सारासार विचार करणं अत्यावश्यक आहे.

आणखी वाचा-Money Mantra : प्रश्न तुमचे उत्तरं तज्ज्ञांची

कर्जाचा हप्ता भरायला उशिर झाला तर बँक आपल्याकडून आधी लेट फी आणि नंतर पेनल्टी म्हणजे दंड वसूल करते. काही वेळा ही लेट फी आणि दण्डाची रक्कम मूळ मुद्दल आणि व्याजाच्या रकमेपेक्षा सुद्धा अधिक होऊ शकते. माझ्या एका मित्राने गाडीसाठी एका परदेशी बँकेकडून तीन वर्षांच्या मुदतीचे कर्ज घेतलं. त्याचा स्वतःचा छोटा व्यवसाय होता. त्याचं उत्पन्न चांगलं असलं तरी ते वेळेवर आणि नियमित येत नसे. त्यामुळे त्याला हप्ता भरायला नेहमीच उशीर होई. बँक त्याला लेट फी आणि दंड लावत असे. ती लेट फी आणि दंड भरत त्याने एकदाचं कर्ज फेडलं. त्यानंतर त्याने बँकेला एकूण किती रक्कम दिली याचा हिशोब केला तेव्हा कळलं की त्याने, मुद्दल आणि व्याज मिळून, आधी ठरलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम बँकेला दिली होती. म्हणजेच बँकेने मुद्दल आणि व्याजा इतकीच रक्कम त्याच्या कडून लेट फी आणि दंड यांच्या स्वरूपात वसूल केली होती! म्हणून बँकेकडून कर्ज घेताना आपला उत्पन्नाचा स्रोत नियमित आणि वेळेवर पैसे उपलब्ध करून देणारा आहे याची खात्री करून घ्यावी.

या सर्व कारणांमुळे बँक किंवा कोणत्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज घेताना आपल्याला नेमक्या किती रकमेची गरज आहे , आपण किती कर भरतो आणि त्यानुसार आपल्या किती रकमेवर जास्तीत जास्त सवलत मिळू शकते , कोणत्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेण्यास आपण पात्र ठरू शकतो याचा संपूर्ण अभ्यास करावा. या बरोबरच सर्वात महत्वाचं म्हणजे, आपलं नेमकं उत्पन्न किती , ते आपल्याला नियमित मिळतं का आणि त्या उत्पन्नापैकी नेमका किती हिस्सा आपण कर्जफेडीच्या हप्त्यासाठी विनासायास देऊ शकतो याचं तटस्थपणे विश्लेषण करावं आणि मगच कर्ज घ्यावं. अशाप्रकारे सर्वांगीण विचार करून घेतलेल्या कर्जातून केलेली खरेदी सुखकारक, किफायतशीर आणि कदाचित स्वतःच्या बचतीतून केलेल्या खर्च पेक्षा सुद्धा अधिक फायदेशीर ठरू शकते !

Story img Loader