नवीन वर्षाच्या सुरुवातीला बाजारात निर्माण झालेला उत्साह टिकून राहील काय ? अशी शंका या आठवड्याभराच्या काळात निर्माण झाली. स्मॉल आणि मिडकॅप या गटातील शेअरनी मागच्या वर्षी गुंतवणूकदारांना भरभरून परतावा दिला असला आणि हात लावीन तिथे सोने अशी मानसिक अवस्था निर्माण झाली असली तरीही महिन्याभरात घडून आलेल्या आणि जाणवलेल्या काही आर्थिक घटनांकडे आपण लक्ष द्यायला हवे. भारताचा आर्थिक प्रगतीचा कल वरच्या दिशेलाच राहणार असला तरीही जागतिक घडामोडींचा आपल्यावर होणारा परिणाम तपासून पाहणे आवश्यक राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

येत्या वर्षभरात अमेरिका, जपान आणि युरोझोनमध्ये अनिश्चितता कायम राहणार आहे. सरकारी खर्चाला वेसण घालणे आवश्यक आहे आणि एका मर्यादेपलीकडे व्याजाचे दर कमी करता येत नाहीत ही रिझर्व्ह बँकेची अपरिहार्यता असल्याने व्यवस्थेत पैसा आणायचा तरी कसा हा प्रश्न आकाराने मोठ्या असलेल्या अर्थव्यवस्थांना पडणार आहे.

हेही वाचा – Money Mantra: शेअर बाजाराचा ‘यू टर्न’, पडझडीतून सावरणार का? कसे?

या पार्श्वभूमीवर भारतीय बाजार तुलनात्मकदृष्ट्या ‘बऱ्या’ अवस्थेत आहेत. मागील वर्षभरापासून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे आकडे नफ्याचे खूपच उत्साहवर्धक नसले तरीही आयटी क्षेत्रातील कंपन्यांचा खर्च कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्या संदर्भातील प्रणाली महत्त्वाची ठरल्यामुळे वाढणार आहे. गेल्या आठवड्यात जाहीर झालेले रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे आकडे व्यवसायातील बदलाचे निर्देशक ठरतात. रिलायन्सच्या पेट्रोलियम, खनिज तेल शुद्धीकरणाव्यतिरिक्त डिजिटल सेवा आणि रिटेल क्षेत्रातील व्यवसायामध्ये वाढ होताना दिसते आहे. रिलायन्सच्या समूहाचा एकंदरीत नफा आणि महसूल वाढता आहेच, मात्र आगामी काळात त्यात निम्मा वाटा रिलायन्स रिटेल आणि जिओ नोंदवतील असे दिसते आहे. डिजिटल व्यवसायामध्ये वार्षिक १२ टक्क्यांची वाढ तर रिटेल साखळी दुकानांच्या व्यवसायात २९ टक्क्यांची वाढ हे बदलत्या व्यवसायाचे निर्देशक आहेत. भारतातील नव्याने उदयास येणारा मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय गट मागणीची गणिते बदलून टाकणार आहे.

‘सधन गट’ आणि गुंतवणूक संधी

गोल्डमन सॅक्स या आंतरराष्ट्रीय वित्त संस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात येत्या पाच वर्षांत भारतातील वार्षिक दहा हजार डॉलर इतके उत्पन्न कमावणाऱ्या व्यक्तींची संख्या १० कोटींच्या घरात असणार आहे, असा दावा केला आहे. या बदललेल्या लोकसंख्येच्या गटाला ‘सधन गट’ (एफ्ल्यूएंट) असा शब्द वापरण्यात आला आहे. प्रवास, महागड्या ठिकाणी जाऊन जेवणे, दणक्यात सण उत्सव साजरे करणे, लग्न समारंभाच्या निमित्ताने होणारी दागिन्यांची खरेदी यामध्ये वाढ झाल्याने नव्या कंपन्यांचे भविष्य अधिक आश्वासक आहे. अशा आठ कंपन्या या अहवालात नोंदवल्या आहेत. बोईंग या प्रवासी आणि मालवाहतूक करणारी विमाने बनवणाऱ्या कंपनीचे उपाध्यक्ष डॅरेन हल्स्ट यांनी भारतातील वेगाने वाढणारा व्यवसाय वर्ष २०४२ पर्यंत ‘बोईंग’साठी नवी संधी ठरणार आहे, हे सांगताना भारताला येत्या वीस वर्षांत अडीच हजार नवीन विमानांची गरज भासेल असे निरीक्षण नोंदवले आहे. भारतात नव्याने सुरू होणाऱ्या प्रवासी विमान वाहतूक व्यवसायात काही अब्ज डॉलरची गुंतवणूक पुढच्या दहा वर्षांत होणार आहे व यातील देखभाल सुटे-भाग निर्मिती असे व्यवसाय देशातच तयार झाल्याने नवीन रोजगार संधीसुद्धा उपलब्ध होतील.

एचडीएफसी आणि पडझडीची सुरुवात

गेल्या आठवड्यात बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसांत एचडीएफसी बँक या शेअरमध्ये झालेल्या पडझडीने गुंतवणूकदारांचे एक लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अलीकडेच एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांचे विलीनीकरण झाल्यावर तयार झालेल्या महाकाय बँकेवर आपल्या व्यवसायाचे भवितव्य नेटाने सांभाळायची वेळ येते आहे. बँकेची कर्ज आणि बँकेचे बँकेच्या ठेवी (लोन टू डिपॉझिट रेशो) हे गुणोत्तर शंभर टक्क्याच्या पलीकडे पोहोचले आहे. अर्थात कंपनीला कर्ज देण्यासाठी पैशाची टंचाई भासते आहे. अशावेळी बाजारातून चढ्या दराने ठेवी गोळा करणे हा शहाणपणाचा मार्ग ठरणार नाही. बँकेच्या मते, यामुळे व्यवसायामध्ये कोणती अडचण येणार नसून नफ्याचे प्रमाण काही महिन्यातच पुन्हा पूर्वपदाला येईल. मात्र तोवर शेअरमधील पडझड अशी सुरू राहिली तर त्याचा फटका गुंतवणूकदारांना बसणार हे निश्चित.

पडझड का संधी?

कंपनीच्या तिमाही निकालांकडे पाहिल्यावर कंपनीच्या व्यवसायावर फार मोठा परिणाम होईल असे दिसत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे अगोदरपासूनच एचडीएफसी बँकेचे शेअर आहेत आणि ज्यांना दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून अधिक शेअर खरेदी करायचे आहेत, त्यांच्यासाठी अशी झालेली पडझड ही एक संधीच ठरणार आहे. शेअर बाजाराचा अभ्यास करणाऱ्या गुंतवणूकदारांनी पुढच्या दोन महिन्यांत एका गोष्टीवर लक्ष ठेवायला हवे, ते म्हणजे ज्या म्युच्युअल फंड योजनांनी मोठ्या प्रमाणावर एचडीएफसी बँकेचे शेअर घेतलेले आहेत ते फंड मॅनेजर नक्की काय भूमिका घेतात यावरून आपल्याला बाजाराच्या मानसिकतेचा अंदाज येईल. दरम्यान १ जानेवारीपासून तीन आठवड्यांच्या बाजारातील परदेशी आणि देशी गुंतवणूकदारांच्या खरेदी विक्रीकडे लक्ष दिल्यास मागच्या आठवड्यात झालेली पडझड सुरू होण्याची सुरुवात नववर्षाच्या पहिल्या तीन दिवसांतच झाली होती. अठरा दिवसांपैकी आठ दिवस परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) विक्रीचा तर यातील सहा दिवसांत भारतीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (डीआयआय) विक्रीचा सपाटा लावला.

हेही वाचा – दोन घरांतील गुंतवणूक ग्राह्य

गेल्या आठवड्यात गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या आपल्या मासिक आढाव्यामध्ये रिझर्व्ह बँकेने पुढच्या आर्थिक वर्षासाठी सात टक्क्यांच्या अर्थव्यवस्थेतील वाढीचा अंदाज वर्तवला आहे. अन्नधान्य आणि खाद्यपदार्थाच्या भावांमध्ये स्थिरता न राखता आल्यास पुन्हा एकदा महागाईला तोंड द्यावे लागेल अशी भीती या अहवालात वर्तवली आहे. धोरणात्मक अडचणी दूर करून सरकारला कृषी मालातील महागाई आटोक्यात आणावी लागेल असे म्हटले आहे. लाल समुद्रातील भूराजकीय संकटामुळे व्यापार विस्कळीत झाला तर त्याचा पुरवठा साखळीवर परिणाम होईल असेही या अहवालात म्हटले आहे.

निकालवार्ता

ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीसाठी कंपन्यांचे निकाल यायला सुरुवात झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे तिमाही निकाल अपेक्षेप्रमाणे समाधानकारक आले आहेत. रिलायन्स जिओने डिसेंबर महिन्यामध्ये एक कोटी नवीन ग्राहक मिळवले. फार्मा क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या लुपिन या कंपनीचा शेअर ५२ आठवड्यांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचला. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची वाटचाल आगामी काळात युरोपात आणि अमेरिकेतील घडणाऱ्या घटनांवर अवलंबून असणार आहे.

५२ आठवड्यातील उच्चांकाचा आठवडा

स्वान एनर्जी, रेल विकास निगम, जेके पेपर, आयआरएफसी, हुडको, आरती इंडस्ट्रीज यासह साडेतीनशे कंपन्यांनी आठवड्याअखेरीस तेजी अनुभवली व शेअरचे भाव ५२ आठवड्यांतील उच्चांकाला जाऊन पोहोचले.

लेखक अर्थ अभ्यासक आणि वित्तीय मार्गदर्शक आहेत.

joshikd282@gmail.com