सध्याच्या घडीला पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य झाले आहे. जर एखाद्या व्यक्तीने आपले पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही तर त्याचे पॅन कार्ड निष्क्रिय म्हणजेच बंद होते. त्यामुळे त्याला ते पॅन कार्ड अनेक प्रकारच्या व्यवहारांसाठी वापरता येणार नाही. खरं तर पॅन कार्ड बंद झाल्यास तुम्हाला बँक खाते उघडणे, एफडीमध्ये गुंतवणूक करणे इत्यादी अनेक गोष्टी करता येणार नाहीत. परंतु पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यानंतरही तुमचा पगार तुमच्या खात्यात येईल का, असा प्रश्न अनेकांना पडतो. याच प्रश्नाचं आता आपण उत्तर जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पॅन कार्ड निष्क्रिय केल्यानंतरही पगार खात्यात येईल का?

पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यानंतरही तुमच्या खात्यात पगार येणार आहे. परंतु तज्ज्ञांच्या मते, एकदा पॅन निष्क्रिय झाला की तुमचा पगार हस्तांतरित होण्यास वेळ लागू शकतो. पॅन कार्ड निष्क्रिय झाले तर तुम्ही काही सेवा आणि अनेक लाभांपासून वंचित राहू शकता. तुमच्याकडे अनेक गोष्टींसाठी पॅन नंबर असणे आवश्यक आहे. पॅनला आधारशी लिंक केल्यानंतरच तुम्हाला त्या सेवांचा लाभ मिळणार आहे.

हेही वाचाः कधी काळी इस्रोने पहिले रॉकेट सायकलवरून पाठवले होते, आता ते नासाशीसुद्धा स्पर्धा करण्यास सज्ज

पगारदाराकडे PAN नसेल तर त्याला त्या पगारावर कापलेल्या उद्गम कराचा लाभ घेता येणार नाही, फॉर्म १६ मिळू शकणार नाही, असंही कर सल्लागार प्रवीण देशपांडे यांचं म्हणणं आहे.

हेही वाचाः चांद्रयान ३ मोहिमेत टाटा अन् गोदरेजच्या कंपन्यांनी निभावली महत्त्वाची भूमिका अन् इस्रोनं रचला इतिहास

पॅन कसे सक्रिय करावे?

जर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय झाले तर तुम्हाला ते पुन्हा सक्रिय करावे लागेल. यासाठी तुम्हाला १००० रुपये दंड भरावा लागेल. दंड भरल्यानंतर तुमचे पॅन कार्ड ३० दिवसांनंतर पुन्हा सक्रिय होणार आहे.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will there be any problem in getting salary if pan card is closed experts say vrd
Show comments