जीवनात श्रेयसची निवड करणे फायदेशीर असते. श्रेयस म्हणजे जे आपल्यासाठी चांगले आहे ते आणि प्रेयस म्हणजे जे आपल्याला आवडते ते. श्रेयसची निवड केल्याने तत्काळ फायदा होत नसला तरीही दीर्घकालावधीमध्ये आपल्याला त्याची उपयुक्तता लक्षात येते. बचत आणि गुंतवणूक करतानादेखील आपण विविध पर्यायातून आपल्यासाठी श्रेयस असणाऱ्या पर्यायांची निवड केली पाहिजे. आजच्या लेखाच्या मदतीने आपण आर्थिक नियोजनात श्रेयसची निवड कशाप्रकारे करावी याची माहिती विविध उदाहरणांच्या मदतीने घेऊ या.
मागील लेखात आर्थिक साक्षरतेविषयी काही प्रश्न विचारले होते, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. म्हणूनच या लेखातदेखील काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे देत आहे. वाचकांनी प्रथम आपले उत्तर निश्चित करावे आणि नंतर लेखात दिलेल्या उत्तरासोबत पडताळून बघावे.
हेही वाचा – Money Mantra: प्रश्न तुमचे, उत्तरं तज्ज्ञांची
– दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी…
श्रेयसची निवड कधी?
अ) दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी केवळ बचतीच्या पर्यायात रक्कम ठेवणे.
ब) दीर्घकालीन उद्दिष्टासाठी वायदे बाजारात व्यवहार (शेअर ऑप्शन्स ट्रेडिंग) करावे.
क ) समभागसंलग्न म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य करणे.
अनेकदा जोखीम आणि गुंतवणूक सुरक्षितता याचा विचार करून अगदी १५-२० वर्षांनंतर पूर्ण करावयाच्या उद्दिष्टांसाठीदेखील केवळ बचतीच्या पर्यायात रक्कम ठेवण्यात येते. अर्थातच वास्तव परतावा कमी मिळाल्यामुळे वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी पुरेशी रक्कम उपलब्ध होत नाही. त्यामुळे आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यात खूप अडचणी येतात. सुरक्षिततेचा विचार करावयाचा झाल्यास वास्तव परतावा कमी मिळाल्यामुळे दीर्घकालावधीसाठीच्या उद्दिष्टांसाठी केवळ बचतीच्या पर्यायात रक्कम ठेवणे हेच सुरक्षित नाही.
अर्थातच येथे दरमहा म्युच्युअल फंडात शिस्तबद्ध पद्धतीने ‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतवणूक करून आर्थिक उद्दिष्ट साध्य करणे हे श्रेयस ठरते. म्युच्युअल फंडात शिस्तबद्ध पद्धतीने दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास जोखमीचे प्रमाण कमी होते आणि ‘रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग’चा फायदा मिळाल्यामुळे नफ्याचे प्रमाणदेखील वाढते.
आयुर्विमा घेताना…
श्रेयसची निवड करा.
अ) हफ्ता कमी असतो याकरिता पत्नी /मुलगा / मुलगी यांच्या नावे आयुर्विमा घेणे.
ब ) मुदतपूर्तीनंतर कोणतीही रक्कम मिळत नाही याकरिता मुदत विम्याऐवजी अन्य विमा कवच घेणे. उदा . २४,००० रुपये हप्ता भरून १ कोटीचे मुदत विमा कवच घेण्याऐवजी २७,००० रुपये हप्ता भरून ५ लाखांचे आयुर्विमा कवच घेणे.
क ) आयुर्विम्याबद्दल आर्थिक सल्लागाराकडून योग्य माहिती घेऊन आपल्या कुटुंबीयांना पुरेसे आर्थिक कवच मिळेल अशी विमा योजना घेणे. आयुर्विमा कवच आणि गुंतवणूक यांच्यात गल्लत न करता मुदत विम्याच्या मदतीने कुटुंबीयांना योग्य आर्थिक कवच देणे श्रेयस ठरते.
– म्युच्युअल फंड घेताना…
खालीलपर्यंत श्रेयस निवडा
अ ) मागील ३ महिन्यांची कामगिरी बघून सर्वात जास्त परतावा देणाऱ्या पर्यायात गुंतवणूक करणे.
ब ) प्रतापरावांच्या मुलीचे ६ महिन्यांनी लग्न आहे, त्याकरिता त्यांनी ‘स्मॉल अँड मिडकॅप फंड’ योजनांमध्ये गुंतवणूक करणे.
क ) दरमहा २ लाख ७० हजारांचे उत्पन्न असणाऱ्या रमेश यांनी ‘डायरेक्ट प्लॅन’च्या मदतीने दरमहा ४,००० रुपयांची गुंतवणूक सेवानिवृत्तीसाठी करणे.
ड ) आर्थिक सल्लागार / म्युच्युअल फंड विक्रेते यांना आपल्या आर्थिक उद्दिष्टांची योग्य माहिती देऊन म्युच्युअल फंडात त्यांच्या सल्ल्याने गुंतवणूक करणे आणि दरवर्षी आढावा घेऊन आवश्यकतेनुसार त्यात बदल आणि वाढ करणे.
अनेकदा वेळेअभावी पुरेसा अभ्यास न करता म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते याकरिता तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करणे श्रेयस आहे.
सेवानिवृत्तीच्या निधीचे नियोजन
सेवानिवृत्तीनंतर १.५ कोटी ते २ कोटी रुपयांचा सेवानिवृत्तीचा निधी एका कंपनीतील कर्मचाऱ्यांना मिळाला. या कर्मचाऱ्यांनी केलेल्या निधीच्या नियोजनाच्या मदतीने आपण श्रेयसचे महत्त्व जाणून घेऊया.
अ ) १.२५ कोटींचे नियोजन – ७५ लाखांचा गावी बंगला, सरकारी योजनेत १५ लाख रुपयांची गुंतवणूक, बँक मुदत ठेव १५ लाख रुपये आणि उर्वरित रक्कम अन्य आर्थिक उद्दिष्टांसाठी खर्च.
ब ) मुलीचे धुमधडाक्यात केलेले लग्न व महागड्या गाडीसह अन्य खर्च केल्यावर उर्वरित १८ लाखांची मुदत ठेव.
क ) भविष्यासाठी आर्थिक नियोजनकाराच्या मदतीने योग्य पर्यायांमध्ये बचत व गुंतवणूक करून उर्वरित रकमेतून आपली विविध स्वप्न साकारणे.
वयाच्या ५८ अथवा ६० व्या वर्षी सेवानिवृत्त झाल्यावर खूप मोठा निधी मिळत असतो. या निधीचे योग्य नियोजन करून पुढील ३० वर्षांची तरतूद करायची असते. मोठी रक्कम मिळालेली असल्याने कोणतेही नियोजन न करता उधळपट्टी केली जाते. अनेकांना सुरुवातीच्या ५-१० वर्षांत अडचण येत नाही, मात्र त्यानंतर आर्थिक चणचण जाणवते. याकरिता तज्ज्ञांच्या सल्ल्याने भविष्यासाठी बचत व गुंतवणूक करून उर्वरित रक्कम आपल्या आनंदासाठी खर्च करणे अधिक योग्य ठरते.
हेही वाचा – Money Mantra: फंड विश्लेषण- आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ब्लूचिप फंड
काही वर्षांपूर्वी ‘लोकसत्ता’मध्ये श्रेयस आणि प्रेयस हे एक प्रसिद्ध सदर होते. त्यात विविध क्षेत्रांतील मान्यवर त्यांच्या आयुष्यातील श्रेयस आणि प्रेयसबाबत सविस्तर माहिती देत. या सदराचे मी नियमित वाचन करत होतो. त्यातूनच प्रेरणा घेऊन गुंतवणुकीतील श्रेयस गुंतवणूकदारांना कसे निवडता येईल याबाबतची लेखमाला मागील वर्षभरात लिहिली.