Flipkart Partners With Axis Bank Personal Loan : वॉलमार्टच्या मालकीच्या ऑनलाइन रिटेलर प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टने शुक्रवारी अॅक्सिस बँकेच्या प्लॅटफॉर्मवर वैयक्तिक कर्ज सुविधा सुरू करण्याची घोषणा केलीय. फ्लिपकार्टच्या प्लॅटफॉर्मवरील ग्राहक तीन वर्षांसाठी अॅक्सिस बँकेकडून पाच लाखांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज घेऊ शकतील. फ्लिपकार्टच्या प्लॅटफॉर्मवर सुमारे ४५ कोटी लोक नोंदणीकृत आहेत, असंही फ्लिपकार्टने एका निवेदनात म्हटले आहे.
फ्लिपकार्टचे वरिष्ठ उपाध्यक्ष (फायनान्स टेक्नॉलॉजी आणि पेमेंट्स ग्रुप) धीरज अनेजा म्हणाले की, आमचे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आधीच बाय नाऊ पे लेटर (बीएनपीएल), समान मासिक हप्ते (ईएमआय) आणि क्रेडिट कार्ड यांसारख्या आर्थिक सुविधा देते. तर ‘डिजिटल बिझनेस अँड ट्रान्सफॉर्मेशन’चे अध्यक्ष आणि प्रमुख समीर शेट्टी म्हणाले, या भागीदारीद्वारे बँक ग्राहकांच्या विस्तृत वर्गाला क्रेडिट सुविधा प्रदान करेल.
३० सेकंदांत कर्ज मिळणार
एका निवेदनानुसार, या भागीदारी अंतर्गत ग्राहकांना ३० सेकंदात कर्ज मंजुरी मिळणार आहे. याची परतफेड करण्यासाठी ग्राहकांना परतफेड सायकलची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून, जी ६ महिने ते ३६ महिन्यांपर्यंत असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्ड यांसारख्या उच्च जोखीम कर्जांमध्ये उच्च वाढीबद्दल चिंता व्यक्त केल्याच्या वृत्तांदरम्यान ही घोषणा करण्यात आली आहे. पर्सनल लोन बिझनेसमध्ये फ्लिपकार्टच्या प्रवेशामुळे PhonePe समोर सर्वात मोठे आव्हान उभे राहिले आहे. फ्लिपकार्टने आपल्या ४५ कोटी ग्राहकांना वैयक्तिक कर्ज देण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचाः रशियातील बड्या कंपनीच्या संचालक मंडळावर भारतीयाची नेमणूक
कर्ज मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक?
कर्ज मिळवण्यासाठी ग्राहकांना मूलभूत तपशील जसे की, पॅन क्रमांक, जन्मतारीख आणि कामाचे तपशील द्यावे लागतील. एकदा हे तपशील दिल्यानंतर अॅक्सिस बँक त्यांची कर्ज मर्यादा मंजूर करेल. त्यानंतर ग्राहक त्यांच्या सोयीस्कर मासिक परतफेडीची क्षमता लक्षात घेऊन त्यांच्या पसंतीची कर्जाची रक्कम आणि परतफेडीची पद्धत निवडू शकतात. Flipkart कर्जाचा अर्ज मंजूर करण्यापूर्वी पुनरावलोकनासाठी सर्वसमावेशक कर्ज सारांश, परतफेडीचे तपशील आणि अटी आणि शर्थी सांगेल. त्यानंतर तुमचं कर्ज मंजूर केलं जाईल. विशेष म्हणजे निवेदनानुसार, ग्राहक त्यांच्या कर्जाची मंजुरी प्रक्रिया अवघ्या ३० सेकंदात पूर्ण करू शकतात, असंही कंपनीचं म्हणणं आहे.
हेही वाचाः बांगलादेश डॉलरपेक्षा आता रुपयाला महत्त्व देणार; दोन बँकांनी बनवला जबरदस्त प्लॅन
अन् PhonePe फ्लिपकार्टपासून वेगळे झाले
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये PhonePe अधिकृतपणे फ्लिपकार्ट समूहापासून विभक्त झाला होता आणि आता वॉलमार्ट समूहामध्ये स्वतंत्र व्यवसाय म्हणून स्थापित झाला आहे. विभाजनानंतर ई-कॉमर्स दिग्गज कंपनी वर्तमान आणि माजी कर्मचार्यांना त्यांच्या ESOPs मधील PhonePe च्या मूल्याशी सुसंगत ७०० दशलक्ष डॉलरची एकाच वेळी भरपाई देणार आहे.