गेल्या काही दिवसांपासून भारतात डिजिटल पेमेंट झपाट्याने वाढले आहे. डिजिटल पेमेंटमध्ये नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT), रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) आणि इमिजिएट पेमेंट सर्व्हिस (IMPS) यांसारख्या अनेक पद्धतींद्वारे ऑनलाइन पेमेंट केले जात आहे. या पद्धतींमुळे लहान ते मोठ्या प्रमाणात पैसे हस्तांतरित करणे सोपे झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

IMPS द्वारे पेमेंट हा नेट बँकिंग मनी ट्रान्सफरमधील प्रमुख पर्यायांपैकी एक आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) नवीन नियमाबाबत नियोजन करीत आहे, जेणेकरून IMPS व्यवहार अधिक प्रभावी होऊ शकतील. या पद्धतीद्वारे लवकरच वापरकर्ते ५ लाख रुपये ट्रान्सफर करू शकतील.

हेही वाचाः पराग देसाई कोण होते? ज्यांनी २ हजार कोटींचे ‘वाघ बकरी टी’चे साम्राज्य निर्माण केले

तुम्ही मोबाईल नंबर आणि बँकेच्या नावाने पैसे पाठवू शकता

५ लाखांपर्यंतचे हस्तांतरण करण्यासाठी तुम्हाला कोणतेही बँक खाते जोडण्याची किंवा IFSC देण्याची आवश्यकता नाही, फक्त तुम्ही मोबाईल नंबर आणि बँकेच्या नावाच्या मदतीने IMPS द्वारे ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम हस्तांतरित करू शकाल. IMPS सेवेद्वारे कधीही पेमेंट केले जाऊ शकते. ही प्रणाली लागू करणारा भारत हा जगातील चौथा देश आहे. ही एक रिअल टाइम पेमेंट पद्धत आहे आणि एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पटकन पैसे हस्तांतरित करते. ते वापरून तुम्ही पैसे कसे ट्रान्सफर करू शकता.

हेही वाचाः Money Mantra : लग्नासाठी पीएफचे पैसे काढण्याचे नियम काय? ईपीएफ अ‍ॅडव्हान्स कसा काढायचा?

IMPS च्या मदतीने अशा प्रकारे पैसे ट्रान्सफर करा

  • प्रथम मोबाइल बँकिंग प्रणाली उघडा
  • आता निधी हस्तांतरण विभाग उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा.
  • निधी हस्तांतरित करण्यासाठी ‘IMPS’ पद्धत निवडा
  • ज्या बँकेत पैसे पाठवायचे आहेत त्या बँकेचा मोबाईल नंबर आणि नाव टाकावे लागेल.
  • बँक खाते किंवा IFSC क्रमांक टाकण्याची गरज नाही
  • आता तुम्हाला तुमच्या खात्यात पाठवायची असलेली रक्कम टाका.
  • लवकरच तुम्ही ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम पाठवू शकाल
  • सर्व आवश्यक माहिती प्रदान केल्यानंतर कन्फर्मवर क्लिक करा.
  • OTP टाकल्यानंतर लगेच पैसे ट्रान्सफर केले जातील.
मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You can send money up to 5 lakhs without connecting bank account online know the new rule of imps vrd