- अजित मेनन
जेव्हा कोणीही त्याच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्याचा विचार करतो, तेव्हा बहुतेक जणांना निवृत्तीच्या नियोजनांबद्दलची चिंता सतावत असते. निवृत्ती नियोजनाचे लक्ष्य खूप मोठे आहे आणि त्यामध्ये अनेक अडथळे येऊ शकतात, अशी त्यांची खरी चिंता असते. लोकांना चांगला फायदा देणाऱ्या योजना आवडतात आणि सेवानिवृत्तीनंतर अनेकांचा खूप आनंददायी जीवन जगण्याचा उद्देश असतो. डॉक्टर किंवा वकिलांसारखे व्यावसायिक हे त्यांना पाहिजे तोपर्यंत सराव सुरू ठेवून उत्पन्न मिळवू शकतात, परंतु याउलट कॉर्पोरेट कर्मचार्यांना निवृत्तीची चिंता वाटत असते.
मुलांच्या शिक्षणासाठी, घर खरेदीसाठी, कार खरेदी करण्यासाठी, व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी तुम्हाला तरुण वयात कर्ज मिळू शकते, परंतु निवृत्तीनंतर अशी कोणतीही कर्ज योजना नाही. अशा परिस्थितीत तुम्ही योग्य वेळी निवृत्तीचे नियोजन करणे आवश्यक आहे. निवृत्तीचे नियोजन करताना आपण सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, उद्देश पूर्ण करण्यात काही अंतर असेल, तर ते कर्ज घेऊन भरून काढता येणार नाही. इतर आर्थिक उद्दिष्टांमधील अंतर कर्ज घेऊन पूर्ण करता येते.
जीवनाकडे एक आनंदी गोष्ट म्हणून पाहा
सेवानिवृत्ती हा आनंदी जीवन जगण्याचा मार्ग असू शकतो. परंतु त्यासाठी त्या काळात वापरता येतील एवढे पैसे जमवून ठेवणेही आवश्यक आहे. खरं तर तुम्हाला सर्वात पहिली गोष्ट करावी लागेल ती म्हणजे एक आनंददायी भावना तयार करणे. सामान्यतः लोक इतर सर्व गरजा पूर्ण करून सेवानिवृत्तीसाठी बचत करतात. ज्यांचे गुंतवणूक, भाडे, कला यांसारखे दुय्यम उत्पन्न आहे, त्यांना या कमाईद्वारे निवृत्तीचे नियोजन करून भविष्यात त्यांच्या आर्थिक स्थितीला बळकट करता येऊ शकते. एका संशोधनानुसार, जे लोक मोठ्या कुटुंबातून, संयुक्त कुटुंबातून किंवा अगदी कुटुंब आणि मित्रांच्या मोठ्या गटातून येतात, त्यांना त्यांच्या आर्थिक भविष्याबद्दल आणि निवृत्तीसारख्या आर्थिक उद्दिष्टांबद्दल कमी चिंता असते, कारण त्यांना भावनिक आणि आर्थिक आधार असतो.
नवनवीन कौशल्ये आत्मसात करा / त्यांना वाढवा
निवृत्ती नियोजन म्हणजे केवळ निधी उभारणे असे नाही. हा फंड तयार करण्यासाठी आर्थिक सल्लागार तुम्हाला मदत करू शकतात. पण खरी जोखीम एकाग्रतेची आहे, म्हणजे तुम्ही आयुष्यभर फक्त एकाच कौशल्यावर (नोकरी) अवलंबून आहात. आपण निवृत्तीचा विचार करत असताना निवृत्तीची चिंता दूर करण्याचा एक मार्ग म्हणजे सुरुवातीपासूनच नवीन कौशल्य प्राप्त करणे आहे. जेणेकरून तुमच्याकडे उत्पन्नाचा दुय्यम स्रोत असेल, तुम्ही तुमच्या दुय्यम स्रोतातून (कौशल्य) पैसेही कमवू शकता. कौशल्य ही एक आवड असू शकते, जी तुम्ही तुमच्या किशोरावस्थेपासून आयुष्यभर जपली पाहिजे, जसे की फिटनेस ट्रेनर, योग शिक्षक, अनुवादक, छायाचित्रकार इत्यादी.
सामाजिक मंडळ
एक अतिशय महत्त्वाचा पैलू म्हणजे एक मोठे कुटुंब, मित्रांचे वर्तुळ जे तुम्हाला तुमच्या आर्थिक भविष्याबद्दलचा ताण कमी करण्यास मदत करू शकतात. कुटुंबाशी जोडलेले राहणे खरोखरच त्या आर्थिक भविष्यातील मानसिक आधारास मदत करते.
आपले आरोग्य उत्तम ठेवा
६० ते ७० वयोगटातील लोकांना भेडसावणारी आणखी एक सामान्य समस्या म्हणजे आरोग्य आहे. चांगले आरोग्य राखल्याने तुमचा वैद्यकीय खर्च कमी होण्यास मदत होते. तसेच हेतुपूर्ण असण्याने आणि तुम्हाला आनंद देणार्या एखाद्या गोष्टीवर काम केल्याने तुमचे आरोग्य सुधारू शकते आणि निवृत्तीनंतरच्या वर्षांतही चांगले जीवन जगू शकता. आता आपल्या शब्दसंग्रहातून निवृत्ती हा शब्द काढून त्याला आर्थिक स्वातंत्र्य असे नाव देण्याची वेळ आली आहे.
हेही वाचाः TCS आता GeM प्लॅटफॉर्मचा कायापालट करण्यासाठी मोदी सरकारला मदत करणार; नेमकी योजना काय?
तुमचा निधी कसा गुंतवायचा?
याला तुमचे आर्थिक स्वातंत्र्याचे ध्येय समजा आणि त्यासाठी योजना करा. तुमच्या मालमत्ता वाटपाचे नियोजन करण्यासाठी चांगल्या आर्थिक सल्लागाराची म्हणजेच तज्ज्ञाची मदत घेणे योग्य ठरेल. पहिली पायरी म्हणजे तुमचे सध्याचे वय आणि सेवानिवृत्तीचे वय यावर आधारित सेवानिवृत्तीसाठी आवश्यक निधीचा अंदाज लावा. समजा तुमचे सध्याचे वय ३० वर्षे आहे आणि तुम्हाला वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्त व्हायचे असेल, तर तुमचा निधी तयार करण्यासाठी तुमच्याकडे ३० वर्षे आहेत. हा निधी ६० टक्क्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आजपासून आवश्यक असलेल्या मासिक गुंतवणुकीची गणना करा. तुम्ही त्याच्या गणनेसाठी सेवानिवृत्ती कॅल्क्युलेटर वापरू शकता.
हेही वाचाः SBI ने मुकेश अंबानींच्या १७ ट्रिलियनच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला टाकले मागे, १० वर्ष जुना विक्रम काढला मोडीत
एकदा तुम्ही हा निधी जमा केल्यानंतर तुम्ही हा निधी ३० वर्षांच्या कालावधीसाठी ३ टप्प्यांत ठेवू शकता. तुम्ही पहिल्या १० वर्षांसाठी काही उत्पादनांमध्ये गुंतवणूक करू शकता, ज्यातून तुम्ही पैसे मिळवू शकता. पुढील १० वर्षांसाठी हायब्रीड फंडांचा विचार करा. तिसऱ्या श्रेणीसाठी वैविध्यपूर्ण इक्विटी फंडांचा विचार करा.
प्रत्यक्षात काय होते की तुम्ही पहिल्या २ टप्प्यांसाठी तुमचे पैसे खर्च करत असताना तुम्हाला शेवटचा टप्पा गाठण्यासाठी एकत्रित २० वर्षे मिळतील. या कंपाऊंडिंगमुळे तुमची संपत्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे तुमचा तिसरी टप्पा जो तुम्ही रक्कम गुंतवली आहे, त्याला २० वर्षे लागतील आणि त्यामुळे तुमचा फंड सुस्थितीत राहील. एक चांगला आर्थिक सल्लागार तुम्हाला तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करू शकतो. पुढे अजित मेनन म्हणतात की, जेव्हा तुम्ही आर्थिक स्वातंत्र्याचा विचार करत असाल तेव्हा या पद्धतींचा अवलंब केल्यास तुम्हाला तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत मिळणार आहे.
(लेखक अजित मेनन हे पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडाचे सीईओ आहेत.)