NPCI New Guidelines : तुमच्या UPI आयडीबाबत एक अतिशय महत्त्वाची बातमी आली आहे. सर्व बँका आणि PhonePe आणि Google Pay सारख्या तृतीय पक्ष अ‍ॅप्स (Third Party App) निष्क्रिय UPI आयडी तात्पुरत्या स्वरूपात बंद करणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने सर्व बँका आणि थर्ड पार्टी अ‍ॅप्सना ते आयडी ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यात एका वर्षापासून कोणताही व्यवहार झाला नाही. यासाठी एनपीसीआयने ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या तारखेपूर्वी तुमचा UPI आयडी सक्रिय करा. UPI आयडी निष्क्रिय करण्यापूर्वी बँक युजर्सना ईमेल किंवा मेसेजद्वारे सूचना देखील पाठवेल. NPCI च्या या पावलामुळे UPI व्यवहार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होणार आहेत. याशिवाय चुकीचे व्यवहारही थांबणार आहेत.

हेही वाचाः WFH बंद केल्यानंतर टाटांच्या TCS ने अचानक २००० हून अधिक कर्मचाऱ्यांना पाठवली बदलीची नोटीस, नेमकं कारण काय?

Kavadi for lord importance of kavadi price of a kavadi
लोक-लौकिक : ‘कवडी’मोल!
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
sebi taken various steps to encourage the dematerialization of shares print
‘डिमॅट’ अनिवार्य करण्याचा विचार : सेबी
Jumped Deposit Scam
बॅलेन्स चेक करताना बँक खातंच रिकामं; काय आहे नवीन ‘Jumped Deposit Scam’?
torres financial fraud loksatta news
Money Mantra : टोरेससारखी फसवणूक टाळायची असेल तर हा लेख तुमच्यासाठीच
aishwarya narkar gives tips for couple to save money
“घर घ्यायचं ठरलं तेव्हा, वर्षाला २ लाख…”, संसारात पैशांची बचत कशी करावी? ऐश्वर्या नारकरांनी सांगितला अनुभव
Image Of Priyanka Gandhi And PM Modi
Dollar vs Rupee : “रुपयाच्या घसरणीचे सर्व विक्रम मोडले, पंतप्रधानांनी जनतेला उत्तर द्यावे”, प्रियांका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका
lokmanas
लोकमानस: उपभोग, गुंतवणूक, निर्यातीत वाढ आवश्यक

नवीन मार्गदर्शक तत्त्वे काय सांगतात?

NPCI च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व तृतीय पक्ष अ‍ॅप्स आणि PSP बँका निष्क्रिय ग्राहकांचा UPI आयडी आणि त्याच्याशी संबंधित मोबाइल नंबरची पडताळणी करणार आहेत. एका वर्षापासून या आयडीवरून कोणत्याही प्रकारचे क्रेडिट किंवा डेबिट व्यवहार केले नसल्यास ते बंद केले जाणार आहेत. परंतु ते आपल्याला पुन्हा सुरू करता येणार आहेत. नवीन वर्षापासून ग्राहकांना अशा आयडीवरून व्यवहार करता येणार नाहीत.

हेही वाचाः ”अदाणींच्या फायद्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या टीडीआर नियमांत बदल, ‘ही’ तर शिंदे सरकारकडून दिवाळी भेट”; काँग्रेसचा गंभीर आरोप

चुकीच्या व्यवहारांना वाव मिळणार नाही

NPCI ने अशा UPI आयडी ओळखण्यासाठी बँका आणि थर्ड पार्टी अ‍ॅप्सना ३१ डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. या नवीन मार्गदर्शक तत्त्वांद्वारे NPCI पैसे चुकीच्या व्यक्तीकडे हस्तांतरित केले जाणार नाहीत किंवा त्याचा गैरवापर होणार नाही हे सुनिश्चित करणार आहे. अलीकडच्या काळात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

मोबाईल नंबर बदलताना काळजी घ्या

अनेक वेळा लोक आपला मोबाईल नंबर बदलतात आणि त्याच्याशी संबंधित UPI आयडी निष्क्रिय करायला विसरतात. अनेक दिवस तो नंबर बंद असल्याने तो दुसऱ्या कोणाला तरी मिळतो. परंतु या क्रमांकाशी फक्त जुना UPI आयडी जोडलेला आहे. अशा परिस्थितीत चुकीचे व्यवहार होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.

Story img Loader