खाद्यपदार्थ घरपोच देणाऱ्या कंपन्यात आघाडीचे नाव म्हणजे ‘झोमॅटो’ या कंपनीचा २०२३-२४ या वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा निकाल ‘फूड डिलिव्हरी सेगमेंट’ मध्ये होणाऱ्या बदलांची नांदीच ठरणार आहे. कंपनीने या तीन महिन्यात दीड कोटी ऑर्डरची डिलिव्हरी केली. त्याचबरोबर यातून कंपनीला ७३१८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले . आपल्याला झोमॅटो ही कंपनी फक्त आपल्या घरी ऑर्डर पोहोचवणारी कंपनी म्हणून माहिती असते. पण या कंपनीचे तीन प्रमुख व्यवसाय आहेत. झोमॅटो या नावाखाली ग्राहकांना घरपोच अन्नपदार्थ पोहोचवणे हा व्यवसाय केला जातो. देशभरातील रेस्टॉरंट आणि खाद्यपदार्थ विकणाऱ्या कंपन्यांशी कंपनीने करार केले आहेत. क्विक कॉमर्स या क्षेत्रात ‘ब्लिंक ईट’ या नावाने कंपनी कार्यरत आहे. खाद्यपदार्थ आणि व्यतिरिक्त दररोजच्या जीवनात लागणाऱ्या असंख्य वस्तू ऑनलाइन ऑर्डर करून ग्राहकांना मागवता येतात. या ब्रँड अंतर्गत कंपनीने या तिमाहीत २१४० कोटी रुपयाचा व्यवसाय केला, महिन्याला सरासरी ३९ लाख व्यवहार या कंपनीमार्फत पूर्ण केले गेले. बिझनेस टू बिझनेस (B2B) या अंतर्गत ‘हायपर प्युअर’ या ब्रँड नावाने कंपनी खाद्यपदार्थ बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि अन्य पदार्थ व्यवसायांना/ व्यावसायिकांना पुरवते. गेल्या तीन महिन्यात भारतातील एकूण आठ शहरांमध्ये या ब्रँड अंतर्गत ६१७ कोटी रुपये एवढा व्यवसाय कंपनीने नोंदवला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा