तीन कंपन्यांतील हिस्सेदारीची संस्थात्मक गुंतवणूकदारांना विक्री करून अदाणी समूह सुमारे २५,००० कोटी रुपये उभारण्याचा विचार करीत आहे. समूहातील आघाडीच्या कंपन्या अदाणी एंटरप्रायझेस आणि अदाणी ट्रान्समिशनने पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना शेअर्स विकून सुमारे २१,००० कोटी रुपये (२५० कोटी डॉलरपेक्षा अधिक) उभारण्यास आधीच मान्यता दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अदाणी ग्रीन एनर्जीचे संचालक मंडळही येत्या दोन आठवड्यांत १०० कोटी डॉलरपर्यंत निधी उभारण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समूहाच्या भांडवली खर्चाच्या गरजा भागवण्यासाठी या निधीचा उपयोग केला जाणार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) ही निधी उभारणी होण्याची शक्यता आहे. या हिस्सा खरेदीत युरोप आणि मध्य पूर्वेतील गुंतवणूकदारांनी स्वारस्य दाखवले आहे. तसेच काही विद्यमान गुंतवणूकदार आणि काही नवीन गुंतवणूकदारही यात सामील होऊ शकतात. जानेवारीअखेर आलेल्या हिंडेनबर्ग अहवालामुळे भांडवली बाजारात अदाणी समूहातील कंपन्यांचे शेअर्स गडगडले होते. अदाणी समूहातील कंपन्यांवर क्षमतेपेक्षा जास्त कर्ज असल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर कर्जभार कमी करण्याचा प्रयत्नही अदाणी समूहाने सुरू केला आहे.