केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १४ व्या हप्त्याची लवकरच तारीख जाहीर करू शकते. हा हप्ता एप्रिल ते जुलै २०२३ दरम्यान जारी होण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १३ वा हप्ता २६ फेब्रुवारी २०२३ रोजी देण्यात आला होता. आता या योजनेत सामील होणाऱ्या नवीन शेतकऱ्यांना पुढील हप्त्याचा लाभ घेण्यासाठी लवकरच अर्ज करावा लागणार आहे. दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी अर्ज केला आहे, ते लाभार्थी आहेत की नाही हे तपासू शकतात. केंद्र सरकार देशातील सातबाऱ्यावर नाव असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना चालवते. या योजनेंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४ महिन्यांच्या अंतराने २-२ हजार रुपयांच्या ३ हप्त्यांमध्ये ६ हजार रुपये वर्ग केले जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशा पद्धतीने करा योजनेसाठी अर्ज

पीएम किसान सन्मान निधी योजनेत नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाइट http://www.pmkisan.gov.in वर जा. त्याच्या होमपेजवर फार्मर कॉर्नरवर जा आणि ‘न्यू फार्मर रजिस्टर’ वर क्लिक करा. यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका आणि कॅप्चा कोड भरा. त्यानंतर “Click Here To Continue” या पर्यायावर क्लिक करा. यानंतर ‘YES’ वर क्लिक करून PM किसान नोंदणी फॉर्म २०२३ भरा. फॉर्म भरल्यानंतर तो सबमिट करा आणि त्याची प्रिंटआऊट घ्या.

हेही वाचाः टाटांच्या ‘या’ कंपनीचे शेअर सुस्साट, गुंतवणूकदार काही तासांत झाले श्रीमंत

‘या’ कागदपत्रांची आवश्यकता असेल

या योजनेत नोंदणी करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, जमिनीच्या सातबाऱ्याची कागदपत्रे, नागरिकत्व प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असेल. याशिवाय तुम्हाला तुमच्या बँक खात्याचा तपशील देखील द्यावा लागेल, ज्यामध्ये तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पैसे मिळवायचे आहेत. तसेच तुम्हाला एक सक्रिय मोबाइल नंबर देखील द्यावा लागेल, ज्यामध्ये तुम्हाला मेसेजद्वारे संबंधित अपडेट प्राप्त होतील.

लाभार्थी असल्याची स्थिती कशी तपासायची?

ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी आधीच अर्ज केला आहे, त्यांचा लाभार्थी दर्जा तपासण्यासाठी प्रथम अधिकृत पीएम किसान पोर्टलवर जा आणि ‘शेतकरी’ कोपऱ्यावर जा आणि ‘लाभार्थी यादी’ वर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडायचे आहे. त्यानंतर ‘Get Report’ टॅबवर क्लिक करा. या अहवालात तुम्हाला तुम्ही लाभार्थी आहात की नाही याची स्थिती समजेल.

हेही वाचाः आता तुम्हाला घरबसल्या पीएफ खात्यातून पैसे काढता येणार; फक्त क्लेम करण्यासाठी भरा ‘हे’ फॉर्म अन् पैसे निघालेच समजा

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm kisan samman nidhi big update on 14th installment money can come in april to july month vrd
Show comments