पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा वाराणसीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्राद्वारे मोदींनी त्यांची संपत्ती जाहीर केली आहे. मोदींची एकूण संपत्ती ३.०२ कोटींची असून त्यांच्याकडे ५२,९२० हजारांची रोख रक्कम असल्याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे देण्यात आली आहे. आज विविध ठिकाणी लोक गुंतवणूक करत आसतात. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात असल्याचे बोलले जाते. असे असतानाही पंतप्रधान मोदींनी फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान मोदींनी त्यांच्याकडील एकूण संपत्तीपैकी जवळपास ९५ टक्के गुंतवणूक मुदत ठेवींमध्ये केली आहे. तसेच ९.१२ लाख रुपये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र या योजनेत गुंतवले आहेत. मुदत ठेवी गुंतवणुकीसाठी विश्वसनीय मानले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात एकूण ३.०२ कोटी रुपयांची वैयक्तिक संपत्ती जाहीर केली. मात्र, यातील ९५ संपत्ती मुदत ठेवींमध्ये गुंतवली असून यामध्ये २.८६ कोटी रुपयांचा समावेश आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, पंतप्रधान मोदींची स्टॉक, बाँड किंवा म्युच्युअल फंडांमध्ये कोणतीही गुंतवणूक नाही. त्यांच्या मालमत्तांमध्ये एसबीआय मुदत ठेवींमध्ये २.८६ कोटी आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्समधील ९.१३ लाखांचा समावेश आहे.

हेही वाचा : “माझ्या थायलंड भेटीबद्दल तुम्हाला कसं कळलं?”, प्रियांका गांधींचा मोठा आरोप; म्हणाल्या, “तुम्ही महिलांवर…”

फिक्स्ड डिपॉझिट गुंतवणूक योग्य पर्याय का आहे?

फिक्स्ड डिपॉझिट ही गुंतवणूक सर्वात विश्वसनीय गुंतवणूक म्हणून ओळखली जाते. ही गुंतवणूक विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगली गुंतवणूक म्हणून मानली जाते. स्वत: पंतप्रधानांनी त्यांच्या संपत्तीपैकी जवळपास ९५ टक्के संपत्ती मुदत ठेवींमध्ये ठेवल्यामुळे या गुंतवणुकीची विश्वासहर्ता आणखी वाढली आहे. तसेच मुदत ठेवींचे सर्वात वेगळे वैशिष्ट्य म्हणजे सातत्यपूर्ण उत्पन्न आणि बाजारातील चढउतारांपासून संरक्षण करण्याची क्षमता त्यामध्ये असते. फिक्स्ड डिपॉझिट गुंतवणूक ही गुंतवणूकदारांना आकर्षित का करते? याचे कारण बहुतेक जणांना विश्वासार्ह परतावा आणि आर्थिक स्थिरता हवी असते. विशेषतः सेवानिवृत्तीच्या काळात ही स्थिरता महत्वाची असते.

मुदत ठेवींचे फायदे काय?

स्थिर मुदत ठेवी आणि स्थिर व्याजदरांसह मुदत ठेवी संपूर्ण गुंतवणुकीच्या कालावधीत अंदाजे असतात. त्याच्या अंदाजानुसार गुंतवणूकदार त्यांच्या विविध आर्थिक उद्दिष्टांसाठी भविष्याच्या योजना आखू शकतात. कारण ते त्यांना किती रक्कम मिळेल, याचे गणित ते लावू शकतात. याचबरोबर एफडी खाती उघडणे आणि व्यवस्थापित करणे हे सहज शक्य आहे. तसेच गुंतवणूकदारांना मुदत ठेवींवर कर्जाची सुविधाही मिळते. एफडीची गुंतवणूक उच्च व्याजदरांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष फायदे देतात.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi property is assets are in fixed deposits marathi news gkt
Show comments