बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने मुंबईतील वांद्रेच्या पाली हिल परिसरात आलिशान घर खरेदी केलं आहे. या घराची एकूण किंमत सुमारे १७.०१ कोटी इतकी असल्याची माहिती समजत आहे. रियल्टी प्लॅटफॉर्म IndexTap.com द्वारे मिळवलेल्या कागदपत्रांच्या आधारे ‘मनी कन्ट्रोल’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. पाली हिलच्या पॉश परिसरातील या आलिशान घराचं क्षेत्रफळ १४७४ चौरस फूट असून दोन राखीव पार्किंग स्पॉट्सही देण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रीती झिंटाने ‘कीस्टोन रिअल्टर्स लिमिटेड’कडून हे घर खरेदी केलं असून याबाबतच्या दस्तऐवजाची नोंदणी २३ ऑक्टोबर रोजी करण्यात आली आहे. प्रीती झिंटाने हे घर खरेदी करताना सुमारे ८५.०८ लाखांचे मुद्रांक शुल्क भरले आहे, असे कागदपत्रांमध्ये दिसून आले.

हेही वाचा- ‘त्या’ घटनेनंतर शिल्पा शेट्टीने भारत सोडण्याचा घेतलेला निर्णय; राज कुंद्राचा मोठा खुलासा, म्हणाला…

दुसरीकडे, बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी आणि त्यांच्या पत्नी शबाना वाजपेयी यांनी ४ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या ओशिवरा परिसरात ७६२० चौरस फूटाचे चार ऑफिस युनिट्स खरेदी केले आहेत. याची एकूण किंमत ३२.९४ कोटी रुपये इतकी असल्याचं समजत आहे. याव्यतिरिक्त, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान यांनीही काही दिवसांपूर्वी मुंबईत विविध ठिकाणी कार्यालयांसाठी मोक्याची ठिकाणं खरेदी केली आहेत.