गेल्या काही वर्षांपासून आयफोन निर्माता कंपनी अॅपलच्या भारताकडून अपेक्षा वाढत आहेत. अलीकडेच कंपनीचे सीईओ टिम कूक भारतात आले आणि त्यांनी भारतात दोन खास स्टोअर उघडले. एक मुंबईत आणि दुसरं देशाची राजधानी दिल्लीत आहे. आता अॅपलने भारताच्या बँकिंग प्रणालीमध्ये प्रवेश करण्याची योजना आखली आहे. आयफोन बनवणारी अॅपल एचडीएफसी बँकेशी संयुक्तपणे क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यासाठी चर्चा करीत आहे. कंपनी अॅपल कार्डच्या नावाने क्रेडिट कार्ड लॉन्च करू शकते. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार, अॅपलचे सीईओ टिम कूक यांनी नुकत्याच भारत भेटीत एचडीएफसी बँकेचे सीईओ आणि एमडी शशिधर जगदीशन यांची भेट घेतली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अॅपलही आणू शकते UPI पेमेंटची सुविधा?
मनी कंट्रोलला सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती मिळाली आहे. Apple भारतात Apple Pay लाँच करू शकते, यासाठी कंपनी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) शी बोलणी करीत आहे. कंपनी UPI प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी चर्चा करीत आहे. परंतु त्यांचे क्रेडिट कार्ड NPCI च्या Rupay प्लॅटफॉर्मला पाठिंबा दर्शवणारे आहे की नाही हे अद्याप समजलेले नाही. भारत सरकारला रुपे कार्डचा प्रचार करायचा आहे आणि त्यासाठी अनेक देशांशी चर्चा सुरू आहे आणि अनेक देशांमध्ये रुपे कार्डवरून पेमेंटही स्वीकारले जात आहेत. जर Apple ला Rupay कार्ड लाँच करण्याची परवानगी दिली, तर त्याचा एक फायदा म्हणजे ते UPI शीदेखील लिंक केले जाऊ शकते.
हेही वाचाः एका बँकेकडून ग्राहकांना दिलासा अन् दुसऱ्या बँकेने EMIचा भार वाढवला; ‘या’ दोन बँकांनी बदलला MCLR दर
Apple पेमेंट क्षेत्रात प्रवेश का करू इच्छित आहे?
गुगल, सॅमसंग, अॅमेझॉन या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्या भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, अॅपलनेही एन्ट्री मारण्याची योजना आखली आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे भारतात ऑनलाइन पेमेंटचा वेग सातत्याने वाढत आहे. जर आपण वर्ष २०२२ च्या आकडेवारीवर नजर टाकली तर UPI पेमेंटमध्ये सुमारे ७० टक्के वाढ झाली होती. विशेष म्हणजे त्या रकमेबद्दल बोलायचे झाल्यास २०२२ मध्ये UPI द्वारे १२६ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झालेत.
UPI पेमेंट केल्यानंतर क्रेडिट कार्डद्वारे जास्तीत जास्त पेमेंट दिसून आले. रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, यंदा एप्रिलमध्ये क्रेडिट कार्डद्वारे १.३३ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झालेत, जे गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत ३ कोटी अधिक आहेत. खरं तर भारतात संधीची व्याप्ती इतर देशांपेक्षा जास्त आहे, अशा परिस्थितीत अॅपलसह अनेक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांना भारतात आपले अस्तित्व प्रस्थापित करायचे आहे. मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, क्यूपर्टिनो आधारित तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) शीसुद्धा कार्डबद्दल चर्चा केली आहे.
हेही वाचा: EPFO: १ लाख पगारावर ४७ हजारांहून अधिक पेन्शन मिळणार; ‘या’ तारखेपर्यंत निर्णय घेण्याची संधी
अॅपलची नजर भारतावर आहे
भारताच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये अॅपलचा वाटा ४ टक्के आहे, म्हणजेच भारतातील सुमारे २० दशलक्ष वापरकर्ते आयफोन वापरतात. ताज्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात भारतातून सुमारे १२,००० कोटी रुपयांच्या स्मार्टफोनची निर्यात झाली, ज्यामध्ये ८० टक्के निर्यात एकट्या ऍपलने केली. म्हणजेच १२,००० कोटी रुपयांपैकी १०,००० कोटी रुपयांची आयफोनमधून निर्यात झाली. २०२२-२३ या आर्थिक वर्षात अॅपलची भारतात विक्री ५०,००० कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे.
Apple चे क्रेडिट कार्ड कधी लाँच केले जाऊ शकते?
मनी कंट्रोलच्या एका अहवालात सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, Apple एचडीएफसी बँकेसह देशात त्यांचे Apple कार्ड लॉन्च करण्याची योजना आखत आहे. याबाबत दोघांमध्ये चर्चा प्राथमिक अवस्थेत असून, कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे ते कधी लॉन्च होईल याची कोणतीही खातरजमा करता येत नाहीये. या दोघांमध्ये करार होतो की नाही यावर ते सर्वस्वी अवलंबून असणार आहे.