टाटा समूहाची व्यापार आणि वितरण शाखा असलेल्या टाटा इंटरनॅशनल (Tata International)ने राजीव सिंघल यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Operating Officer) म्हणून नियुक्ती केली आहे. ते टाटा इंटरनॅशनल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आनंद सेन यांना रिपोर्ट करणार आहेत आणि १ एप्रिलपासून त्यांनी पदभार स्वीकारलाय. याआधी ते टाटा स्टीलमध्ये फ्लॅट उत्पादनांचे विपणन आणि विक्रीचे उपाध्यक्ष होते आणि त्यांना ३५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.
राजीव सिंघल यांना बोर्डात घेतल्याने आनंद झाल्याची भावनाही सेन यांनी व्यक्त केली. सेन म्हणाले, “मला विश्वास आहे की, त्यांची धोरणात्मक विचारसरणी आणि ऑपरेशनल कौशल्य कंपनीसाठी अमूल्य ठरेल, कारण आम्ही विकास पुढे वाढवतोय आणि आमच्या व्यवसायाचाही विस्तार करणार आहोत. मला विश्वास आहे की, त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा इंटरनॅशनल मोठ्या प्रमाणात प्रगती करेल. व्यवसायाच्या सर्व पैलूंमध्ये अधिक उंची गाठेल.”
टाटा इंटरनॅशनलच्या शेअरची किंमत वाढली
टाटा इंटरनॅशनलच्या शेअर्सबद्दल बोलायचे झाल्यास ही बातमी आल्यापासून त्यांच्या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे. सोमवारी व्यापाराच्या शेवटी त्यांचे शेअर्स ११४.९२ अंकांच्या वाढीसह ०.१९ टक्क्यांनी वाढून बंद झाले. यासह टाटा इंटरनॅशनलच्या शेअर्सची किंमत ५९,१०६ रुपये प्रति शेअर झाली.
हेही वाचाः बँकांमध्ये जमा असलेले ३५ हजार कोटी तुमचे तर नाहीत ना, रक्कम परत कशी मिळवाल?
टाटा आयपीएलचे प्रायोजक आहेत
खरं तर टाटा मोटर्स देखील आयपीएल २०२३ चा प्रायोजक आहेत. यावेळी IPL मध्ये EV चा प्रचार करण्यासाठी टाटाने Tiago EV ही कार सामन्यांदरम्यान प्रदर्शनासाठी ठेवली होती आणि IPL दरम्यान टाटा ईव्हीच्या अनेक जाहिराती पाहता येतील. Tiago EV मध्ये फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, डायनॅमिक मार्गदर्शक तत्त्वांसह रिव्हर्स कॅमेरा, i-TMPS आणि IP67-रेट केलेला बॅटरी पॅक आणि मोटरदेखील मिळते.