Ratan Tata helps Taj Mahal Palace Hotel employees after 26/11 terror attack : देशातील प्रसिद्ध उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचं वयाच्या ८६ वर्या वर्षी निधन झालं आहे. बुधवारी (९ ऑक्टोबर) रात्री मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांनी उद्योगांबरोबरच सामाजिक क्षेत्रातही नेहमी योगदान दिलं आहे. रतन टाटा जितके साधे होते तितकेच कणखरही होते. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा दहशतवाद्यांनी टाटांच्या मालकीच्या दक्षिण मुंबईतील ताज हॉटेलला देखील लक्ष्य केलं होतं. दहशतवाद्यांनी हॉटेल ताज महाल पॅलेसमध्ये घुसून तिथले कर्मचारी, मुंबईकर व पर्यटकांच्या हत्या केल्या होत्या. मुंबईतील विविध भागात दहशतवादी गोळीबार करत असतानाच रतन टाटा ताज हॉटेलमध्ये दाखल झाले होते. यावर रतन टाटा यांनी स्वतः एका मुलाखतीत भाष्य केलं होतं.

नॅशलन जिओग्राफी इंडियाशी बोलत असताना रतन टाटांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला होता. ते म्हणाले, “मी त्या रात्री आमच्या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना फोन केला. मात्र कोणीही फोन उचलला नाही. मला थोडं आश्चर्य वाटलं. कारण यापूर्वी असं कधी घडलं नव्हतं. त्यानंतर मी माझी कार घेऊन हॉटेलवर पोहोचलो. परंतु, वॉचमनने मला बाहेरच रोखलं. त्याने सांगितलं हॉटेलमध्ये गोळीबार चालू आहे”.

Narendra Modi On Ratan tata death News
Ratan Tata : रतन टाटा यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी नोएल टाटांशी संवाद साधत व्यक्त केला शोक
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Noel Tata New Chairman of Tata Trust Latest News
टाटा ट्रस्टला मिळाले नवे चेअरमन! रतन टाटांनंतर कुटुंबातील ‘या’ सदस्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी
Bharat Products salse at reliance retail
Bharat Brand: ‘भारत ब्रँडच्या वस्तू आता रिलायन्स रिटेलमध्ये विकल्या जाणार’, केंद्र सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत
Ratan Tata Will
Ratan Tata Will: ‘हे’ चार लोक रतन टाटांच्या मृत्युपत्राला अमलात आणणार; टाटांची एकूण संपत्ती जाणून घ्या
GST Rate Fixation, tax phases, GST Council, rate reduction, health insurance, life insurance, Nirmala Sitharaman, Union Finance Minister,
GST: आयुर्विमा, आरोग्य विमा होणार स्वस्त, तर तुमच्या आवडत्या ‘या’ वस्तूंवरील जीएसटी वाढणार
Ratan Tata Successor who is Noel Tata
Ratan Tata’s Successors : कोण आहेत नोएल टाटा? रतन टाटांच्या निधनानंतर उत्तराधिकारी म्हणून यांच्या नावाची होतेय चर्चा
Ratan Tata Will Tito dog
Ratan Tata Will: रतन टाटांनी १० हजार कोटींची संपत्ती सोडली, इच्छापत्रात श्वानाचीही केली सोय; नोकर, भाऊ-बहीण, शंतनू नायडूचाही उल्लेख

हे ही वाचा >> कोण होणार रतन टाटांचा उत्तराधिकारी? टाटा समुहाची धुरा कोण सांभाळणार?

हल्ल्याच्या दिवशी काय घडलं?

टाटा म्हणाले, “मुंबईवर हल्ला झाला तेव्हा दहशतवादी ताज हॉटेलमध्ये देखील घुसले आणि त्यांनी हॉटेलमध्ये गोळीबार सुरू केला. हॉटेलमध्ये ३०० पाहुणे राहत होते. रेस्तराँ भरले होते. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी पाहुण्यांना सुरक्षितस्थळी हालवण्यासाठी, रेस्तराँमधील लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, दहशतवाद्यांच्या हल्ल्यात अनेकजण मारले गेले. ते तीन दिवस व तिन्ही रात्री मी हॉटेल व्यावस्थापकांबरोबर थांबलो, सगळी व्यवस्था पाहिली”.

हे ही वाचा >> रतन टाटांच्या निधनानंतर टाटा सन्सच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया; म्हणाले, “टाटा समूहच नाही तर राष्ट्राची रचना…”

पीडितांना टाटांकडून मदत

या दहशतवादी हल्ल्यामुळे ताज महाल पॅलेस हॉटेलचं तब्बल ४०० कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. दरम्यान, या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन आठवड्यांत ताज पब्लिक सर्व्हिस वेल्फेअर ट्रस्टची स्थापना करण्यात आली. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या ‘ताज’च्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ३६,८५ लाख रुपये सुपूर्द करण्यात आले. तसेच हे कर्मचारी निवृत्त होण्याच्या तारखेपर्यंतचा पगार त्यांच्या कुटुंबाला दिला जाईल, अशी व्यवस्था केली. दिवंगत कर्मचाऱ्यांच्या मुलांना उत्तम शिक्षण मिळेल याची व्यवस्था देखील टाटांनी केली, अशी माहिती मनोरमा ऑनलाईनने प्रसिद्ध केली आहे.

हे ही वाचा >> भारतीय उद्योग जगताचे पितामह रतन टाटा काळाच्या पडद्याआड, अनेकांना समृद्ध करणाऱ्या खास माणसाची कारकीर्द कशी होती?

टाटा म्हणाले होते की, १२ वर्षांपूर्वी झालेला भयंकर विध्वंस कधीच विसरता येणार नाही. परंतु, त्यावेळी मुंबईकरांनी दाखवलेली एकीसुद्धा आमच्या नजरेसमोर आहेच. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी सगळे मतभेद वाजूला ठेवून मुंबईकर एकत्र आले होते.