रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज रेपो रेटसंदर्भात घोषणा केली. सहाव्यांदा आरबीआयनं रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे यावेळीही रेपो रेट ६.५ टक्के इतका स्थिर राहणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीनं यासदंर्भातील निर्णय घेतल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. कमिटीतील ६ सदस्यांपैकी ५ सदस्यांनी व्याजदर जैस थे ठेवण्याच्या बाजूने मत दिल्यानंतर हा निर्णय अंतिम करण्यात आला.

विकासासोबत महागाईवरही लक्ष

दरम्यान, यावेळी महागाई हा प्राधान्यक्रम असल्याची बाब शक्तीकांत दास यांनी अधोरेखित केली. “रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीनं करोना काळात अर्थव्यवस्थेमध्ये अधिक पैसा खेळता राहावा यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना कमी करण्यावर भर देण्यास एकमत दर्शवलं आहे. आर्थिक विकासाला हातभार लावतानाच महागाई नियंत्रणात आणण्यासाठी यामुळे मदत होईल”, असं शक्तीकांत दास पत्रकार परिषदेत म्हणाले.

Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
process of regularizing project affected constructions gained momentum after return of mahayuti government
गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात
Rajya Sabha Winter Session.
Parliament Session : सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
Vidhan Bhavan premises Central Vista vidhan
विधानभवन परिसराचा कायापालट, अध्यक्षपदी फेरनिवड होताच राहुल नार्वेकर यांचा पुनरुच्चार; सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर विकास
Pune and Pimpri Chinchwad may raise PMPML ticket prices due to rising operational deficit
पीएमपी तिकीट दरवाढीचे भवितव्य, ‘दादांच्या ‘ हाती, काय निर्णय घेणार ?

पुढच्या आर्थिक वर्षासाठीचा महागाई दर…

दरम्यान, यावेळी गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पुढील आर्थिक वर्षासाठीच्या महागाई दरावरही भाष्य केलं. “पुढच्या आर्थिक वर्षात महागाईचा दर ४.५ टक्क्यावंर राहण्याचा अंदाज आहे. पहिल्या तिमाहीत ५ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ४ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ४.६ टक्के तर चौथ्या तिमानीह ४.७ टक्के दर राहील”, असा अंदाज शक्तीकांत दास यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर ७ टक्के इतका असेल, असाही अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे.

Story img Loader