भारताच्या मध्यवर्ती बँकेने काल संध्याकाळी पी. वासुदेवन यांची RBI चे नवीन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. ३ जुलैपासून ते पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्याकडे चलन व्यवस्थापनाशी संबंधित आणखी तीन विभागांची जबाबदारी असेल. त्यांच्याकडे चलन व्यवस्थापन, कॉर्पोरेट धोरण आणि बजेट विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

याआधी ते पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम विभागाचे प्रभारी मुख्य व्यवस्थापक म्हणून काम करीत होते. आरबीआयच्या मुख्य कार्यालयाबरोबरच त्यांनी दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू येथील कार्यालयांमध्येही काम केले आहे. RBI च्या परिपत्रकात म्हटले आहे की, वासुदेवन यांनी बँकांबरोबरच नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या, पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टममध्ये देखील काम केले आहे. तसेच ते बँकर्स ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणूनही कार्यरत आहेत.

Shreyas Iyer to captain Mumbai Team in Syed Mushtaq Ali Trophy Prithvi Shaw included in Squad Ajinkya Rahane
Shreyas Iyer: श्रेयस अय्यरच्या खांद्यावर ‘या’ संघाने कर्णधारपदाची दिली जबाबदारी! अजिंक्य रहाणेही अय्यरच्या नेतृत्त्वाखाली खेळणार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nitin Gadkari campaigned for Mahayuti in 13 days across Maharashtra during Assembly elections
गडकरींकडून महाराष्ट्र पालथा
Ajit Pawar: ‘विलासराव देशमुख आघाडीचे सरकार चालविण्यात पटाईत’, अजित पवारांचे सूचक विधान; महायुतीला इशारा?
Congress Secretary Sandesh Singalkar filed a complaint against Modi, Shah, and Nadda with Election Commission
संविधान बदल अन् ‘ चारसो पार’ चा नारा:मोदी, शाहांविरुद्ध एफआयआर करा,काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार
telangana news
भाजपाचे नेते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे चीअरलीडर्स आहेत; केटी रामाराव यांचा आरोप!
kerala ias officer Row
Keral IAS officer: हिंदू-मुस्लीम व्हॉट्सॲप ग्रुप बनवणं महागात पडलं; केरळमध्ये दोन आयएएस अधिकारी निलंबित
Office Space, Pune, Mumbai, Delhi,
कार्यालयीन जागा सहकार्यात पुण्याचा झेंडा! मुंबई, दिल्लीला मागे टाकत देशात दुसऱ्या स्थानी झेप

पी. वासुदेवन यांचे शिक्षण किती?

वासुदेवन यांनी माहिती प्रणाली ऑडिट (CISA), माहिती सुरक्षा व्यवस्थापन (CISM) आणि FinTech (National University of Singapore) मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्स (CAIIB) चे प्रमाणित सहयोगी आणि द व्हार्टन स्कूलचे माजी विद्यार्थी देखील आहेत.

हेही वाचाः Money Mantra : प्राप्तिकर परताव्याचे पाच नियम तुम्हाला माहीत आहेत का?

‘या’ पदांवरही नियुक्ती करण्यात आली

गेल्या महिन्यात आरबीआयने दोन नवीन कार्यकारी संचालकांच्या नियुक्तीची घोषणा केली होती. यामध्ये डॉ. राजीव रंजन आणि डॉ. सितिकंथा पटनायक यांची निवड करण्यात आली आहे. राजीव रंजन यांच्याकडे कार्यकारी संचालक म्हणून चलनविषयक धोरण विभागाची (एमपीडी) जबाबदारी देण्यात आली आहे. ते आरबीआय एमपीसीचे सदस्य म्हणूनही काम करतील. ज्यामध्ये डॉ. सितिकंथा पटनायक यांच्याकडे आर्थिक आणि धोरण संशोधन (DEPR) विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचाः टीसीएसनंतर आता टाटा स्टीलमध्ये ३८ कर्मचाऱ्यांना केले कमी; कंपनीने सांगितले ‘कारण’