सॉफ्ट ड्रिंक्स मार्केटमध्ये कॅम्पा कोलाला आपल्या प्रतिस्पर्धी कंपनीपेक्षा कमी किमतीत पुन्हा लॉन्च केल्यानंतर मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स आता एफएमसीजी(FMCG)च्या वैयक्तिक आणि होम केअर उद्योगात प्रवेश करणार आहे. रिलायन्स आपली उत्पादने इतर कंपन्यांच्या तुलनेत 30 ते 35 टक्के कमी किमतीत विकत आहे. कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे, जेणेकरून ते उत्पादने खरेदी करतील आणि त्यांची तुलना बाजारात आधीपासूनच उपलब्ध असलेल्या उत्पादनांशी केली जाईल, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिलायन्स मेकिंग डीलर नेटवर्क

रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL)ची उपकंपनी RCPL द्वारे वैयक्तिक आणि होम केअर विभागातील उत्पादनांची विक्री केली जात आहे. कंपनीची उत्पादने सध्या निवडक बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहेत. डीलर नेटवर्कवरही कंपनी अधिकाधिक लक्ष केंद्रित करत आहे.

FMGC मार्केट ११० डॉलर आहे

देशातील FMGC बाजार अंदाजे ११० अब्ज डॉलर आहे आणि HUL, P&G, Reckitt आणि Nestle यांसारख्या कंपन्यांचे वर्चस्व आहे. रिलायन्स या मार्केटमध्ये आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.

रिलायन्स FMGC उत्पादने कोणती?

लक्स (१०० ग्रॅमसाठी ३५ रुपये), डेटॉल (७५ ग्रॅमसाठी ४० रुपये) आणि संतूर (१०० ग्रॅमसाठी ३४ रुपये) यांच्या तुलनेत RCPL ने ग्लिमर ब्युटी सोप, रिअल नॅचरल साबण आणि प्युरिक हायजीन साबणाची किंमत प्रत्येकी २५ रुपये ठेवली आहे. आघाडीच्या ब्रँडच्या उत्पादनांच्या तुलनेत याव्यतिरिक्त Enzo २ लिटर फ्रंट लोड आणि टॉप लोड लिक्विड डिटर्जंटची किंमत जिओ मार्टवर २५० रुपये ठेवली आहे, तर एक्सेल मॅटिकच्या २ लिटर पॅकसाठी ३२५ रुपये घेते. Enzo फ्रंट-लोड आणि टॉप-लोड डिटर्जंट पावडरचा १ किलोचा पॅक JioMart वर १४९ रुपये आहे.

कॅम्पा कोला पुन्हा लाँच

या महिन्याच्या सुरुवातीला RCPLने कॅम्पा कोलासह शीतपेय बाजारात प्रवेश केला. कंपनीने २०० मिलीची बाटली १० रुपयांना आणि ५०० ​​मिलीची बाटली २० रुपयांना बाजारात आणली आहे.