Retail Inflation May 2023 : भारताच्या सांख्यिकी मंत्रालयाने मे २०२३ मधील किरकोळ महागाईत घट नोंदवणारी नवी आकडेवारी जाहीर केली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, किरकोळ महागाईचा दर मे महिन्यात ४.२५ टक्के नोंदवला गेला आहे, जो २५ महिन्यांतील नीचांकी पातळीवर आला आहे. अन्न, इंधन आणि अन्नधान्याच्या महागाई दरात घट नोंदवली गेली आहे. अहवालानुसार, ऊर्जेच्या किमती कमी करण्याबरोबरच तृणधान्ये आणि भाज्यांच्या किमती कमी झाल्याने मे महिन्यात महागाईची पातळी कमी ठेवण्यास मदत मिळाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सांख्यिकी मंत्रालयाने सोमवारी भारतातील किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर केली. मे महिन्यात तो दर वार्षिक आधारावर ४.२५ टक्क्यांच्या म्हणजेच २५ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला. तर एप्रिलमध्ये तो ४.७० टक्के होता. ग्राहक किंमत निर्देशांकांवर (CPI) आधारित महागाई सलग तिसऱ्या महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) अपेक्षेप्रमाणे २-६ टक्क्यांच्या आत राहिली.

हेही वाचाः मोठा दिलासा! किरकोळ महागाई दर २५ महिन्यांच्या नीचांकावर, खाण्या-पिण्याच्या गोष्टी झाल्या स्वस्त

ग्राहक अन्न किंमत निर्देशांक (CPFI) एप्रिलमधील ३.८४ टक्क्यांवरून मेमध्ये २.९१ टक्क्यांवर घसरला. ग्रामीण महागाई दर ४.१७ टक्के तर शहरी महागाई ४.२७ टक्के आहे. मे महिन्यात भाजीपाल्याच्या महागाई दरात ८.१ टक्क्यांची घट झाली होती. अन्न-पेय आणि इंधन विभागातील महागाई पातळी अनुक्रमे ३.२९ टक्के आणि ४.६४ टक्के आहे. तसेच तृणधान्यांचा महागाई दर १३.६७ टक्क्यांवरून १२.६५ टक्क्यांवर आला. ऊर्जेच्या किमती कमी करण्याबरोबरच तृणधान्ये आणि भाजीपाल्यांच्या किमती नरमल्याने मे महिन्यात महागाईचा स्तर कमी ठेवण्यास मदत झाली. एलपीजी आणि केरोसिनच्या आंतरराष्ट्रीय किमतींमध्ये झालेल्या घसरणीमुळेही मे महिन्यात इंधन महागाई आटोक्यात राहिली. ४५ अर्थशास्त्रज्ञांच्या रॉयटर्स पोलने एप्रिलमधील महागाई दर ४.७० टक्क्यांवरून मे महिन्यात महागाई दर ४.४२ टक्क्यांपर्यंत कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. सीपीआय चलनवाढीतील नरमाईचा कल मे महिन्यात कायम राहिला आणि महागाई ४.३४ टक्के राहण्याची अपेक्षा आहे, असंही अर्थतज्ज्ञ राहुल बाजोरिया यांनी सांगितलं आहे. बाजोरिया यांनी एल निनोचा प्रभाव पडल्यास जुलै २०२३ मध्ये किमती पुन्हा वाढू शकतात, असं म्हटलं आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होऊन मूळ चलनवाढ कायम राहिल्यास किंमत आणखी वाढू शकते, असा इशाराही दिलाय.

हेही वाचाः मुकेश अंबानी दिल्ली एनसीआरमध्ये स्मार्ट सिटी बनवणार; ‘एवढ्या’ हजार एकरांमध्ये नवं शहर वसवणार