Robert Kiyosaki : कुठल्याही पुस्तकांच्या दुकानात, रस्त्याकडेला असलेल्या पुस्तकांच्या स्टॉलवर एक पुस्तक आपल्याला हमखास पाहायला मिळतं, ते म्हणजे ‘रिच डॅड, पुअर डॅड’. श्रीमंत कसं व्हायचं? किंवा अधिक पैसे कसे कमवायचे? कुठे गुंतवणूक करायची? यासंबंधीचे सल्ले देणारं ‘रिच डॅड, पुअर डॅड’ हे पुस्तक जगभरातल्या बेस्ट सेलिंग (सर्वाधिक विकलं गेलेलं) पुस्तकांपैकी एक आहे. परंतु, जगाला श्रीमंत कसं व्हायचं याबाबत सल्ले देणारं पुस्तक लिहिणारा लेखक मात्र प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली आहे. ‘रिच डॅड, पुअर डॅड’चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्यावर सध्या १.२ अब्ज डॉलर्सचं (९ हजार ९८२ कोटी रुपये)कर्ज आहे. परंतु, त्यांना या कर्जाची चिंता नाही. उलट रॉबर्ट कियोसाकी लोकांना कर्ज घेण्याचा सल्ला देत आहेत.

प्रसिद्ध लेखक आणि उद्योगपती रॉबर्ट कियोसाकी यांचं एक इन्स्टाग्राम रील व्हायरल होत आहे. यामध्ये ते म्हणत आहे की, माझं कर्ज १ अब्ज डॉलर्सच्या पुढे गेलंय. परंतु, मी दिवाळखोर झालो तर बँकही दिवाळखोर होईल. त्यामुळे मला फार काही अडचण नाही. त्याचबरोबर मला या कर्जाची चिंतादेखील नाही.

Success Story Of Ashley Nagpal
success story : मुंबईत खरेदी केलं ‘सी-फेसिंग अपार्टमेंट! वाचा भारतीय व्यावसायिक ॲशले नागपाल यांची यशोगाथा
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
career journey of actor james earl jones
व्यक्तिवेध : जेम्स अर्ल जोन्स
Famous painter SH Raza prakriti painting stolen from warehouse of auction house at Bellard Pier Mumbai news
प्रसिद्ध चित्रकार एस.एच. रझा यांच्या चित्राची चोरी; अडीच कोटी रुपये किंमतीच्या चित्राच्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल
paradise painting venice loksatta article
कलाकारण: जुन्या कलेच्या (आणि व्यवस्थेच्याही) चिंध्या…
Nitin Gadkari Announces Incentives for Vehicle Scrapping
जुने भंगारात दिले, तरच सवलतीत नवीन वाहन; नितीन गडकरी यांच्याशी चर्चेनंतर वाहन निर्मात्यांचे पाऊल
PM Thailand, Paetongtarn Shinawatra,
विश्लेषण : थायलंडच्या पंतप्रधानपदी ३७ वर्षीय युवा महिला… कोण आहेत पेतोंगतार्न शिनावात्रा? त्यांच्यासमोर कोणती आव्हाने?
What happened to South Asian University after the Chomsky case
‘चॉम्स्की प्रकरणा’तून साउथ एशियन युनिव्हर्सिटीचे काय झाले?

कियोसाकी म्हणाले, बहुसंख्य लोक कर्ज घेऊन त्यांच्यावरील जबाबदाऱ्या वाढवतात. मुळात त्यांनी कर्ज घेऊन संपत्ती वाढवलेली असते. मला नेहमी वाटतं की, फेरारी आणि रोल्स रॉयससाख्या आलिशान गाड्या म्हणजे तुमची संपत्ती नव्हे. यांना जबाबदाऱ्या मानायला हवं.

रॉबर्ट कियोसाकी यांची संपत्ती किती?

रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितलं की ते रोख पैसे साठवून ठेवत नाहीत. ते म्हणाले, मी सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक करतो. मी कर्जाला अजिबात घाबरत नाही. कारण कर्ज म्हणजेच पैसे. चांगल्या कर्जातून पैसे निर्माण करता येतात आणि चुकीच्या कर्जातून कमी कामाई होते. मला वाटतं, लोकांनी कर्ज घ्यावीत आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करावी. माझ्याकडे सध्या १०० मिलियन डॉलर्सची संपत्ती आहे. सुरुवातीच्या काळात मला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात मीसुद्धा दिवाळखोरी पाहिली आहे. परंतु, हळूहळू मी त्या समस्येतून बाहेर पडलो आणि यशस्वी झालो.

हे ही वाचा >> क.. कमॉडिटीचा : तिघांचे भांडण… मका उत्पादकांचा लाभ!

पुस्तकाच्या ४ कोटींहून अधिक प्रतींची विक्री

‘रिच डॅड, पुअर डॅड’ हे पुस्तक १९९७ मध्ये प्रकाशित करण्यात आलं होतं. हे पुस्तक आजही मोठ्या प्रमाणात विकलं जात आहे. १०० हून अधिक देशांमध्ये ५० हून अधिक भाषांमध्ये हे पुस्तक विकलं जात आहे. आतापर्यंत या पुस्तकाच्या ४ कोटींहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. लोक पैसे कमावण्यासाठी रॉबर्ट कियोसाकी यांनी दिलेले सल्ले वाचतात.