Success Story : यशाची चव नेहमीच गोड असते. पण त्यामागे असलेले अपार कष्ट अनेकांना दिसत नाहीत. भारतातल्या रस्त्यांवर दुचाकीचा राजा मानल्या जाणाऱ्या रॉयल एनफिल्ड बुलेटच्या यशाचीही अशीच एक कहाणी आहे. त्याची स्क्रिप्ट कंपनीचे विद्यमान सीईओ सिद्धार्थ लाल यांनी लिहिली आहे. एकेकाळी रस्त्यांवरून जवळपास गायब झालेली बुलेट आज तरुणांची पहिली पसंती बनली आहे. स्पीड, स्टाईल, लूक आणि लक्झरीची अनुभूती देणाऱ्या या बुलेट कंपनीची एकूण संपत्ती ५४ हजार कोटींच्या आसपास पोहोचली आहे.

सिद्धार्थ यांना २००० साली रॉयल एनफिल्डची जबाबदारी (सीईओ म्हणून) देण्यात आली होती, जेव्हा इतर कंपन्यांच्या जास्त मायलेज असलेल्या दुचाकींची मागणी वाढत होती. तेव्हा लोकांनी पैशांची बचत करणे आणि बुलेट यांसारख्या अवजड आणि कमी मायलेज देणाऱ्या दुचाकीकडे जवळपास पाठ फिरवली होती. त्याचदरम्यान २००६ मध्ये सिद्धार्थ यांना आयशर मोटर्सचे सीईओ आणि एमडी बनवण्यात आले. यानंतर रॉयल एनफिल्ड पुन्हा रस्त्यावर धावली आणि ती आजतागायत बाजारात आपलं स्थान टिकवून उभी आहे. कंपनीला यशोशिखरावर पोहोचवण्यासाठी त्यांनी १५ पैकी १३ व्यवसाय बंद केले. तसेच स्वतःचं सर्व लक्ष आणि ऊर्जा फक्त रॉयल एनफिल्ड ब्रँडवर लावलं.

shivshardul percussion indian band in usa
अमेरिकेतील शिवशार्दूल पर्कशन्सच्या ढोल-ताशा गर्जनेची दशकपूर्ती
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
government indicate extension of credit scheme for micro and small enterprises
सूक्ष्म, लघू उद्योगांच्या पतहमी योजनेला मुदतवाढीचे संकेत;  अतिरिक्त ५ लाख कोटींच्या तरतुदीचा केंद्राचा विचार
reliance Infra electric cars news
अनिल अंबानींची रिलायन्स ई-वाहनांच्या निर्मितीत उतरणार? २.५ लाख गाड्यांचं प्राथमिक लक्ष्य
Loksatta vyaktivedh AG Noorani India and China border fence Constitutionalist Expert on Kashmir
व्यक्तिवेध: ए. जी. नूरानी
mhada Reduce Consent Requirement of building owner for Group Redevelopment
समूह पुनर्विकासात इमारत मालकांच्या १०० टक्के संमतीला म्हाडाकडून आक्षेप, साडेआठशे इमारतींचा पुनर्विकास दृष्टिपथात!
cbi investigation into financial irregularities in r g kar medical college
आर्थिक अनियमिततेप्रकरणी ‘सीबीआय’चा तपास; कोलकाता हत्या प्रकरणात आरोपींच्या मालमत्तांचीही झडती
Why did SEBI ban Anil Ambani from trading in the capital market for five years
‘सेबी’ने अनिल अंबानींवर भांडवली बाजारात व्यवहारास पाच वर्षांची बंदी का घातली?

बंद करण्याच्या तयारीत होते, पण…

२०००मध्ये कंपनीचे चेअरमन विक्रम लाल यांनी व्यवस्थापनाला रॉयल एनफिल्डचे उत्पादन थांबवण्यास सांगितले. यानंतर सिद्धार्थ यांनी व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी काही वेळ मागितला. त्याने स्वतः एक महिना बुलेट मोटरसायकल चालवली आणि त्याचे गुण आणि दोष ओळखले. मग देशातील तरुणांना आकर्षित करू शकेल, अशी मोटारसायकल बनवली. अवघ्या २ वर्षांत बुलेट शोरूममध्ये नवीन रूपात दिसली आणि तिच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली. वर्ष २०१४ पर्यंत आयशर मोटर्स लिमिटेड समूहाच्या एकूण कमाईपैकी ८० टक्के कमाई एकट्या इनफिल्डमधून आली होती.

दुचाकीसाठी ट्रॅक्टरचा व्यवसाय केला

सिद्धार्थ यांनी आयशर मोटर्सचा ट्रॅक्टर व्यवसाय रॉयल एनफिल्डला विकला. २००५ मध्ये आयशरने ट्रॅक्टर्स आणि फार्म इक्विपमेंट लिमिटेडची विक्री केली. ट्रॅक्टर हा आयशर मोटर्सचा पहिला व्यवसाय होता. यानंतर त्यांनी २००८ मध्ये ट्रक व्यवसायातील ४६ टक्के हिस्सा स्वीडिश कंपनी व्होल्वोला विकला. हा एक कठीण निर्णय होता, पण त्यामुळे एनफिल्डला त्याच्या बाइकच्या किमती कमी ठेवता आल्या.

हेही वाचाः Success Story : कधी काळी फ्लिपकार्टमध्ये काम करायचे आणि आता ९९,००० कोटींच्या कंपनीची स्थापना; कोण आहेत समीर अन् राहुल?

२०२२ मध्ये ८.३४ लाख बाईक विकल्या गेल्या

सध्या रॉयल एनफिल्डची मागणी सातत्याने वाढत आहे. गेल्या वर्षी २०२२ मध्ये कंपनीने ८,३४,८९५ मोटारसायकली विकल्या, जो आतापर्यंतचा विक्रम आहे. या विक्रीमुळे समूहाला ७१४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. एवढी मागणी असूनही कंपनीने किमती वाढवल्या नाहीत. Bullet 350 आणि Classic 350 व्यतिरिक्त दोन सिलिंडर इंजिन असलेल्या बाइक्सना भारतात आणि परदेशातही खूप मागणी आहे.

सिद्धार्थने ऑटो इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी घेतलीय

सिद्धार्थ लाल हे विक्रम लाल यांचे पुत्र असून, ते कंपनीचे चेअरमन होते. दून स्कूलमधून सुरुवातीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी घेतली. यानंतर त्यांनी क्रॅनफिल्ड विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. एवढेच नाही तर त्यांनी यूकेच्या लीड्स युनिव्हर्सिटीमधून ऑटो इंजिनीअरिंगमध्ये मास्टर्सही केले. ते सध्या आयशर ग्रुपचे एमडी आणि सीईओ आहेत आणि त्यांनी रॉयल एनफिल्डचे सीईओ पद आता सोडले आहे.

सिद्धार्थच्या पॅकेजवरून झाला होता वाद

२०१५ पासून सिद्धार्थ यूकेमध्ये राहून तेथून ते आपला व्यवसाय चालवत आहेत. २०२१ मध्ये त्यांचे वार्षिक पॅकेज २१.१२ कोटींवरून वाद झाला होता, त्यानंतर त्यांचे वार्षिक पॅकेज १२ कोटी करण्यात आले होते. फोर्ब्सनुसार, २०२२ मध्ये विक्रम लाल कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे ५४ हजार कोटी रुपये होती. एवढेच नाही तर सिद्धार्थ लाल यांची एकूण संपत्तीही ३७ हजार कोटी रुपये एवढी आहे, तर कंपनीचे बाजार भांडवल ८० हजार कोटी रुपये झाले आहे.

हेही वाचाः RBI कडून मोठा दिलासा, आता EMI वाढणार नाही, व्याजदर जैसे थेच