Rupee VS Dollar: अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया शुक्रवारी ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण शुक्रवारीही कायम राहिली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ८५.९६५० वर बंद झाला. या आठवड्यासाठी ही ०.२ टक्क्याची घसरण असून या आठवड्यात सलग तिसऱ्या दिवशी रुपया नीचांकी पातळीवर घसरला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाने गुरुवारी ८५.९३२५ च्या मागील विक्रमी नीचांकी पातळी ओलांडली. दरम्यान, रुपयाची ही घसरण सलग दहावी साप्ताहिक घसरण नोंदवली गेली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मजबूत होत असलेला डॉलर आणि कमकुवत भांडवली प्रवाह यामुळे चलनाला सातत्याने दबावाचा सामना करावा लागला आहे. डॉलरचा निर्देशांक १०९ च्या वर राहिला आहे. कारण यूएस नॉन-फार्म पेरोल डेटाची प्रतीक्षा आहे. ज्यामुळे फेडरल रिझर्व्हच्या दर कपातीची अपेक्षा निर्माण होऊ शकते. रॉयटर्सच्या एका अहवालात नमुद केलेल्या तीन व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने काम करणाऱ्या सरकारी बँकांनी शुक्रवारी डॉलरची विक्री करण्यासाठी हस्तक्षेप केला आणि रुपयाचे नुकसान मर्यादित करण्यात मदत केली. यासंदर्भातील वृत्त फायनान्शिअल एक्स्प्रेसने दिलं आहे.

हेही वाचा : सर्वोच्च न्यायालयाचा ‘JEE’बाबत मोठा निर्णय, केवळ ‘या’ विद्यार्थ्यांनाच तीन वेळा देता येणार परीक्षा

दरम्यान, मिरे ॲसेट शेअरखानचे संशोधन विश्लेषक अनुज चौधरी अशी अपेक्षा करतात की चलनावरील दबाव नजीकच्या काळात कायम राहील. “देशांतर्गत बाजारातील कमकुवत टोन, मजबूत ग्रीनबॅक आणि सतत FII बहिर्वाह यामुळे रुपयावर घसरणीचा दबाव कायम राहील. याव्यतिरिक्त कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि यूएस ट्रेझरी उत्पन्नातील वाढ यावर प्रभाव टाकू शकतात. मात्र, आरबीआयचा हस्तक्षेप हा रुपयाला काहीसा आधार देऊ शकतो. सध्या व्यापारी नॉन-फार्म पेरोल्स अहवाल आणि यूएस मधील ग्राहक डेटावरून असे संकेत मिळतात की, रुपया ८५.८०-८६.१५/$ च्या श्रेणीत व्यापार करणे अपेक्षित आहे. वाढत्या डॉलर आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेसह सततच्या हेडवाइंड्सचा रुपयावर मोठा तोल गेला आहे. मात्र, आरबीआयच्या नियमित हस्तक्षेपांमुळे काही प्रमाणात स्थिरता आली असून ज्यामुळे घसरण कमी झाली आहे.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rupee vs dollar news indian rupee falls to historic lows against us dollar why in marathi news gkt