SBI Amrit Kalash Deposit FD Scheme: स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय) ही आपल्या देशातील विश्वासू बॅंकांपैकी एक आहे. या बॅंकेतर्फ एसबीआय अमृत कलश या नावाने नवीन रिटेल मुदत ठेव योजना सुरु करण्यात आली आहे. ठराविक कालावधी या योजनेचा लाभ उपभोगर्त्यांना घेता येणार आहे. अमृत कलश योजनेमध्ये गुंतवणूक केल्याने उच्च व्याजदरासारखे अनेक फायदे मिळतील.
एसबीआय अमृत कलश योजनेचा कालावधी १५ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ आहे. ही योजना फक्त एसबीआयच्या वैध उपभोगतेसाठी आहे. बॅंकेच्या ट्विटर हॅंडलवर या संबंधित ट्वीट करण्यात आले. या ट्वीटमध्ये “स्टेट बॅंकेच्या देशांतर्गत आणि अनिवासी भारतीय ग्राहकांसाठी आकर्षक व्याजदर, ४०० दिवसांचा कार्यकाळ असे वैशिष्ट असलेली अमृत कलश ठेव योजना आम्ही घेऊन येत आहोत. *अटी आणि नियम लागू” असे लिहिण्यात आले होते.
या योजनेमार्फत स्टेट बॅंकेमध्ये मुदत ठेवींवर दिल्या जाणाऱ्या व्याजदराबाबतची माहिती समोर येणार आली आहे. अमृत कलश योजनेच्या ठेवींवरील व्याजदर व्यक्तीपरत्त्वे निश्चित केला जाणार आहे. त्यानुसार नियमित व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना ७.१० टक्के व्याजदर दिला जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर ७.६० टक्के असणार आहे. एसबीआयच्या पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांसाठी व्याजदरामध्ये अधिकच्या एका टक्क्याची जोड केली जाणार आहे. या ठेव योजनेचा कालावधी हा ४०० दिवसांचा आहे.
अमृत कलश ठेव योजनेची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे:
- या योजनेमध्ये गुंतलवणूक केल्यास त्यांचा निधी बॅंकेमध्ये किमान ४०० दिवस ठेवणे आवश्यक आहे.
- ३१ मार्च २०२३ ही अमृत कलश ठेव योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी एसबीआय अमृत कलश खाते उघडावे किंवा एसबीआय योनो अॅपद्वारे गुंतवणूक करावी.
- ज्यांना १-२ वर्षांच्या कालावधीसाठी पैसे गुंतवायचे आहेत त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर आहे.
- अमृत कलश ठेव योजनेअंतर्गत मुदतपूर्व कर्जाची सुविधा देखील उपलब्ध आहे.
आणखी वाचा – जगभरात नोकरकपातीचं संकट; Google, Amazon नंतर प्रसिद्ध एअरक्राफ्ट कंपनी २,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
स्टेट बॅंक ऑफ इंडियाने मुदत ठेव (FD) आणि आवर्ती ठेव (RD) यांच्या व्याजदरांमध्ये बदल केले आहेत. ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतचा कार्यकाळ असणाऱ्या या ठेवींचे व्याजदर काही टक्क्यांनी वाढवण्यात आले आहेत. सामान्य ग्राहकांना ३ ते ६.५० टक्के तर जेष्ठ नागरिकांना ३.५० ते ७.५० टक्के व्याज मिळणार आहे.