Indira IVF IPO and Tumko Meri Kasam Film: चित्रपटातून एखादा विचार मांडणे किंवा प्रतिमा उंचावणे, हे आता नवीन राहिलेले नाही. क्रीडापटू, उद्योगपती, विशिष्ट विचारधारा यावर आधारित अनेक चित्रपट आजवर प्रदर्शित झाले आहेत. मात्र एका कंपनीच्या प्रवासाबाबतच्या चित्रपटामुळे त्या कंपनीलाच संभाव्य नुकसान सहन करावे लागल्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटल ही कंपनी काही दिवसांत ३,५०० कोटींचा आयपीओ आणणार होती. मात्र एका चित्रपटामुळे ही योजना फसली. ‘तुमको मेरी कसम’ हा चित्रपट २१ मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने तिकीटबारीवर केवळ ६५ लाख कमविले. मात्र चित्रपटामुळे ३,५०० कोटींचा आयपीओ आणण्यात आडकाठी निर्माण झाली.
दिग्दर्शक विक्रम भट यांनी ‘तुमको मेरी कसम’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात अनुपम खेर, ईशा देओल, अदाह शर्मा, इश्वाक सिंह यासारखे कलाकार आहेत. इंदिरा आयव्हीएफचे संस्थापक डॉ. अजय मुरडिया यांच्या जीवनावर चित्रपट बेतलेला आहे. आयव्हीएफला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ. मुरडिया यांनी जो लढा दिला, त्याचे वर्णन चित्रपटात केले आहे. अनुपम खेर यांनी डॉ. मुरडिया यांचे पात्र रंगविले असून त्यांच्या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले. मात्र तिकीटबारीवर चित्रपट फारसा कमाल दाखवू शकला नाही. प्रेक्षकांनी ज्या पद्धतीने चित्रपटाकडे पाठ फिरवली, त्याप्रमाणे सेबीलाही चित्रपट रुचला नाही, असे दिसते.
चित्रपटाचे आयपीओशी संबंध काय?

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

डॉ. अजय मुरडिया यांच्या दोन मुलांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटातून कंपनीचा प्रचार किंवा प्रतिमा उंचाविण्यासाठी वापर केलेले नाही, असे कंपनीकडून सांगितले गेले. मात्र सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI)ने तुमको मेरी कसम चित्रपटातून कंपनीचा प्रचार होत असल्याचा आरोप केला. त्यामुळे २७ मार्च रोजी इंदिरा आयव्हीएफने आपला महत्त्वाकांक्षी आयपीओ मागे घेतला.

इंदिरा आयव्हीएफने मागच्या महिन्यात सेबीकडे कागदपत्रे सादर केली होती. ज्याला डीआरएचपी म्हटले जाते. या दस्तऐवजामध्ये कंपनीशी संबंधित सर्व माहिती देण्यात येत असते. मात्र मागच्या आठवड्यात कंपनीने दस्तऐवज मागे घेतला.

चित्रपटामुळे गुंतवणूकदारांच्या भावना प्रभावित होऊ शकतात, अशी शंका व्यक्त केली जाते. चित्रपटामुळे कंपनीला लाभ मिळू नये, असे सांगितले जाते. शेअर बाजार तटस्थ असायला हवा, यासाठी सेबी प्रयत्नशील असते.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sebi put a stay on indira ivf hospital rs 3500 crore ipo because tumko meri kasam kvg