तुम्ही आता तुमच्या बँक खात्यातून थेट पोस्ट ऑफिस बचत खाते, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि सुकन्या समृद्धी खात्यात (SSA) NEFT आणि RTGS द्वारे पैसे हस्तांतरित करू शकता. केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाचे नवीन आदेश एसबी ऑर्डर क्र. ०९/२०२३ जारी केला आहे. या आदेशानुसार, आता लाभार्थी न जोडता या योजनांमध्ये पैसे ऑनलाइन हस्तांतरित केले जाऊ शकतात. दूरसंचार मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, तुम्ही लाभार्थ्याला न जोडता तुमच्या बँक खात्यातून पोस्ट ऑफिस बचत खाते, पीपीएफ आणि एसएसए खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय मंत्रालयानं परिपत्रक केले जारी

केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने एक परिपत्रक जारी करून म्हटले आहे की, खातेदार आणि कर्मचाऱ्यांमध्ये फारशी जागरूकता नसल्याचे दिसून आले आहे. या कारणास्तव संबंधित संस्थेने बँक खात्यातून पोस्ट ऑफिस बचत खात्यात, पीपीएफ आणि एसएसएमध्ये एनईएफटी आणि आरटीजीएसद्वारे पैसे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचाः पगारातून पै अन् पै जमवली, म्हातारपणात सुरू केला व्यवसाय, वयाच्या ९२ व्या वर्षी २० हजार कोटींच्या कंपनीचे मालक

PPF आणि SSA मध्ये पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

>> PPF आणि SSA मध्ये मागील वर्षांशी संबंधित कोणतीही थकबाकी असू नये. तुम्हाला ते जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन जमा करावे लागतील.
>> जर तुमच्या PPF खात्याची मुदत पूर्ण झाली असेल, तर तुम्हाला एका वर्षाच्या आत पोस्ट ऑफिसला भेट देऊन मॅच्युरिटी वाढवावी लागेल.
>> तुम्ही PPF आणि SSA मध्ये ५० च्या पटीत निधी ट्रान्सफर करू शकता.
>> एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त १.५० लाख रुपये हस्तांतरित केले जाऊ शकतात.

लाभार्थी न जोडता पोस्ट ऑफिस बचत खाते, PPF आणि SSA मध्ये कसे हस्तांतरित करावे?

>> सर्वप्रथम तुमच्या बँकेच्या नेटबँकिंगमध्ये लॉगिन करा.
>> त्यानंतर पेमेंट / ट्रान्सफरचा पर्याय निवडा.
>> यानंतर लाभार्थ्याचे नाव टाका.
>> यानंतर पोस्ट ऑफिस बचत खाते, पीपीएफ आणि एसएसएचा खाते क्रमांक टाका.
>> खातरजमा करण्यासाठी पुन्हा प्रविष्ट करा.
>> त्यानंतर Inter Bank Transfer वर क्लिक करा.
>> संबंधित बँकेचा IFSC कोड टाका.
>> त्यानंतर NEFT चा पर्याय निवडा.
>> हस्तांतरित करायची रक्कम भरा.
>> ठेव/गुंतवणूक पर्याय निवडा.
>> त्यानंतर नियम आणि अटी स्वीकारा आणि सबमिट वर क्लिक करा.
>> यानंतर मोबाईलवर एक OTP येईल तो टाका.
>> तुमचा निधी हस्तांतरित केला जाईल आणि पैसे डेबिट करण्यासाठी एसएमएस प्राप्त होईल.

हेही वाचाः शेअर आहे की रॉकेट; २० वर्षांत १ लाखाचे झाले ११ कोटी, तुमच्याकडे तर नाही ना?