Senior Citizens Savings Scheme: जर तुमचे पालक निवृत्त झाले असतील आणि तुम्ही त्यांच्यासाठी चांगली बचत योजना शोधत असाल तर पोस्ट ऑफिसशी संपर्क साधा. ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकप्रिय पर्याय म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) जी पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग्ज स्कीमचा भाग आहे. पोस्ट ऑफिस योजना असल्याने त्यात सुरक्षिततेची १०० टक्के हमी आहे. कमाल ठेव मर्यादा आणि त्यावर मिळणारे व्याज वाढल्यामुळे ही योजना पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक बनली आहे. या योजनेत तुम्ही तुमच्या पालकांच्या नावावर दोन स्वतंत्र खाती उघडून दरमहा ४०,१०० रुपये घरी येण्याची व्यवस्था करू शकता. या योजनेवर ८.०२ टक्के वार्षिक व्याज आहे. सामान्यतः वयाची ६० वर्षे पूर्ण केलेली व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठेव मर्यादा वाढवली अन् व्याजही जबरदस्त

ज्येष्ठ नागरिक बचत योजने(SCSS)मध्ये आता कमाल ठेव मर्यादा वाढली आहे. अर्थसंकल्प २०२३ च्या घोषणेनुसार, १ एप्रिल २०२३ पासून या योजनेत १५ लाख रुपयांऐवजी जास्तीत जास्त ३० लाख रुपये जमा करता येतील. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत ही सुविधा आहे. जर तुम्ही पती-पत्नी असाल तर एका संयुक्त खात्याशिवाय तुम्ही २ संयुक्त खाती देखील उघडू शकता. दुसरीकडे जर दोघेही पात्र असतील तर दोन स्वतंत्र खातीदेखील उघडली जाऊ शकतात. या प्रकरणात २ वेगवेगळ्या खात्यांमध्ये जास्तीत जास्त ६० लाख रुपये (एका खात्यात ३० लाख रुपये) जमा केले जाऊ शकतात. ५ वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर तुम्ही हे खाते आणखी ३ वर्षांसाठी वाढवू शकता.

हेही वाचाः आता कार्डाशिवाय UPI द्वारे ATM मधून पैसे काढता येणार; ‘या’ बँकेने सुरू केली नवी सेवा

एकल खात्यावर किती रक्कम?

कमाल ठेव: ३० लाख रुपये
व्याजदर : वार्षिक ८.०२ टक्के
परिपक्वता कालावधी: ५ वर्षे
मासिक व्याज: २०,०५० रुपये
त्रैमासिक व्याज: ६०,१५० रुपये
वार्षिक व्याज: २,४०,६०० रुपये
५ वर्षात एकूण व्याज : १२,०३,०००
एकूण परतावा: ४२,०३,००० लाख (३०,००,००० + १२,०३,०००)

हेही वाचाः Ashish Deora Success Story : हार्वर्डच्या माजी विद्यार्थ्यानं रतन टाटांशी संबंधित कंपनी अवघ्या ९० कोटींना विकत घेतली, कोण आहेत आशिष देवरा?

२ वेगवेगळ्या खात्यांमध्ये किती रक्कम?

कमाल ठेव : ६० लाख रुपये
व्याजदर : वार्षिक ८.०२ टक्के
परिपक्वता कालावधी : ५ वर्षे
मासिक व्याज : ४०,१०० रुपये
त्रैमासिक व्याज: १,२०,३०० रुपये
वार्षिक व्याज: ४,८१,२०० रुपये
५ वर्षात एकूण व्याज: २४,०६,०००
एकूण परतावा: ८४,०६,००० लाख (६०,००,००० + २४,०६,०००)

SCSS : योजनेची वैशिष्ट्ये आणि फायदे

SCSS ची मॅच्युरिटी ५ वर्षे असते, तर खात्याच्या मॅच्युरिटीवर ती ३ वर्षांसाठी वाढवता येते. यात कोणतीही क्रेडिट जोखीम नाही. SCSS मध्ये गुंतवणूक केल्यास प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत १.५० लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सूट मिळू शकते. त्यावर ८.२ टक्के व्याजदर आहे, जो FD पेक्षा चांगला आहे. SCSS मध्ये गुंतवणूक करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. तुम्ही भारतातील कोणत्याही अधिकृत बँकेत किंवा कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये SCSS खाते उघडू शकता. या अंतर्गत व्याजाची रक्कम तिमाही आधारावर दिली जाते. ही योजना विशेषतः सेवानिवृत्ती लक्षात घेऊन चालवली जात आहे, ज्याद्वारे सेवानिवृत्तीनंतर तुमच्या जमा झालेल्या भांडवलावर चांगले परतावा मिळू शकतो.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior citizens savings scheme 40 thousand rupees per month best investment plan for your parents vrd