श्रीलंकेच्या सर्वोच्च न्यायालयाने देशातील पवन ऊर्जेविरोधात दाखल झालेल्या याचिकांवर उत्तर देण्यासाठी श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुणवर्धन, मंत्रिमंडळ आणि अदाणी समूहाला उत्तर दाखल करण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ दिला आहे. अदाणी समूहाकडून अक्षय ऊर्जा उपक्रमाअंतर्गत दोन पवन ऊर्जा प्रकल्प राबवविले जाणार आहेत. यामध्ये एक प्रकल्प २५० मेगावॅट तर दुसरा प्रकल्प २३४ मेगावॅट क्षमतेचा आहे. यामध्ये एकूण ७५ कोटी डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

या प्रकल्पाविरोधात पर्यावरणप्रेमींनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयातील तीन न्यायाधीशाच्या खंडपीठाने याचिकेवर उत्तर देण्यासाठी पंतप्रधान, सरकार आणि अदाणी समूहाला उत्तर देण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ दिला आहे.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sri lanka sc seeks response from govt and adani group on objections against wind power project kvg
First published on: 19-06-2024 at 17:44 IST