श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन कर्नाटकमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. थंड पेयाच्या उत्पादनासाठी मुरलीधरनने कर्नाटक सरकारशी सामंजस्य करार केला असून कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यात कारखाना उभारला जाणार आहे. तसेच धारवाड जिल्ह्यातही मुरलीधरन गुंतवणूक करण्यास इच्छुक असून एकूण १४०० कोटींची गुंतवणूक मुरलीधरन कडून होणार असल्याचे कर्नाटकचे उच्च आणि मध्य उद्योग मंत्री एमबी पाटील यांनी सांगितले.

एमबी पाटील यांनी एक्सवर पोस्ट करून या कराराची माहिती दिली. सध्या चामराजनगर जिल्ह्यात कारखाना स्थापन्याचे काम सुरू आहे. नुकतीच मुरलीधरन आणि त्याच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर एमबी पाटील यांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर केलेल्या पोस्टमध्ये एमबी पाटील यांनी सांगितले की, मुथय्या मुरलीधरनला आपल्या कर्नाटकमध्ये त्याचा व्यवसाय वाढवायचा आहे. श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू मुरलीधरनने निवृत्ती घेतल्यापासून तो थंड पेयाच्या निर्मितीक्षेत्रात उतरला आहे. मायदेशात आपला व्यवसाय वाढविण्यासाठी तो प्रयत्नशील असून यासाठी त्याने आपल्या राज्याची निवड केली आहे.

Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Sri Lanka polls Ruling NPP secures two thirds majority
श्रीलंकेच्या संसदेत एनपीपीला बहुमत ; २२५ पैकी १५९ जागांवर विजय
Jitu Patwari said cm Shivraj Singh launched Ladli Behan Yojana but payments in mp irregular
‘लाडक्या बहिणींना रक्कम नियमित मिळणार का? कारण मध्य प्रदेशात…’
goa cm pramod sawant
Pramod Sawant: महायुती की महाविकास आघाडीच्या काळात उद्योग महाराष्ट्राबाहेर? मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
Some people in district promoted their own brothers sisters and daughters ajit pawar
नंदुरबार जिल्ह्यात काही जणांकडून भावकीचीच प्रगती, अजित पवार यांचा डॉ. विजयकुमार गावित यांना टोला
State Bank quarterly profit of Rs 18331 crore
स्टेट बँकेला १८,३३१ कोटींचा तिमाही नफा
sharad pawar ncp leader jayant patil slams ladki bahin yojana
लाडकी बहीण’मुळे सरकारची तिजोरी रिकामी – जयंत पाटील

निर्देशांकांची उच्चांकी दौड कायम; सेन्सेक्स त्रिशतकी खेळीसह विक्रमी ७७,३०१ अंशांवर

चामराजनगरशिवाय धारवाड जिल्ह्यातही गुंतवणूक वाढविण्यासाठी मुरलीधरन इच्छुक आहे. सध्या चामराजनगरमध्ये १००० कोटींचा कारखाना उभारण्याचे काम सुरू आहे. यापुढे जाऊन धारवाडमध्येही गुंतवणूक होणार असल्याने राज्यात एकूण १४०० कोटी रुपयांची गुंतवणूक मुरलीधरन केली जात आहे, असेही एमबी पाटील म्हणाले.

माध्यमात आलेल्या बातम्यांनुसार, थंड पेयाचे उत्पादन घेण्यासाठी ४६ एकरची जमीन याआधीच देण्यात आली असून त्या जमिनीवर कारखाना उभारण्याचे काम सुरू आहे. जानेवारी २०२५ पर्यंत कारखाना कार्यान्वित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. “मुथय्या बेव्हरेजेस अँड कन्फेक्शनरी”, या नावाने हा उद्योग उभा राहणार आहे.