Sensex Today LIVE Updates: आज सकाळी शेअर बाजार उघडल्यानंतर कित्येक दिवसांनंतर सकारात्मक तेजीचे चित्र पाहायला मिळाले. सकाळी सेन्सेक्समध्ये ६२० अंकाची उसळी पाहायला मिळाली. तर निफ्टीही १९० अंकाने वाढून २,८०० चा टप्पा पार केला. काही शेअर्स वगळता बाजरात आज अनेक शेअरचा हिरवा रंग प्रकर्षाने दिसून येत होता. मात्र पुढे बाजारात अस्थिर चित्रही दिसले. सेन्सेक्स आणि निफ्टीने दुपारी काही अंकांनी गटांगळीही खाल्ली. त्यानंतर पुन्हा वर झेप घेतली. दिवसअखेर सेन्सेक्स केवळ ३२.८१ अंकांनी वाढून ७८,०१७.१९ वर बंद झाला. तर निफ्टीमध्ये १०.०५ अंकाची वाढ होऊन तो २३,६६८.६५ अंकांवर बंद झाला.
गेल्या काही आठवड्यांमध्ये बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली होती. त्यानंतर मागच्या आठवड्यात ३०७७ अंकानी वधारल्यानंतर आता या आठवड्याच्या सुरुवातीलाही बाजारात उत्साहाचे वातावरण दिसत आहे. सोमवारी सेन्सेक्सने १,२०० अंकाची उसळी घेतली होती. त्यानंतर आज सेन्सेक्सने ७८,६०० टप्पा ओलंडला आहे. तर निफ्टी निर्देशांक २३,८३२ वर पोहचला आहे.
Share Market Live Updates | BSE Sensex, Nifty 50 Today | शेअर मार्केट अपडेट्स २५ मार्च २०२५
Stock Market LIVE Updates: सेन्सेक्स १५० अंकानी वधारला, निफ्टी २३,००० च्या वर; ‘हे’ शेअर ठरले टॉप लूझर
सकाळी ७०० अंकांची उसळी घेतल्यानंतर दुपारी १२ वाजल्यापासून सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात सातत्याने चढ उतार झालेला पाहायला मिळत आहे. बाजारात तेजी आल्यानंतर अनेकांनी नफा काढून घेतल्याचे बोलले जात आहे.
Share Market Live Updates: बाजारात तेजीनंतर विक्रीचाही सपाटा, 'या' क्षेत्रात झाली सर्वाधिक विक्री
मेटलच्या शेअर्समध्ये लाभ वसूल केल्यानंतर या क्षेत्रातील शेअर्सवर दबाव दिसून आला. निफ्टी मेटल इंडेक्स जवळपास दीड टक्क्यांनी घसरला आहे. Hindalco, Nalco, Hind Zinc या शेअर्समध्ये दोन ते तीन टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. तसेच फार्मा आणि बांधकाम क्षेत्रातील शेअर्समध्येही मोठी विक्री पाहायला मिळाली.
Share Market Live Updates: ६०० अंकाच्या उसळीनंतर शेअर बाजारात काहीशी घसरण
सकाळी सेन्सेक्सने ६०० अंकाची उसळी घेतल्यानंतर ११ वाजून ४० मिनिटांनी सेन्सेक्समध्ये २० अंकाची घसरण पाहायला मिळाली. तर निफ्टी निर्देशांकही लाल रंगात दिसला. निफ्टीमध्ये ११ अंकाची घसरण पाहायला मिळाली.
Share Market Live Updates: आयटीच्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी
निफ्टी IT इंडेक्समध्ये जवळपास दोन टक्क्यांची उसळी पाहायला मिळत आहे. इन्फोसिस अडीच टक्क्यांनी वाढून टॉप गेनरच्या यादीत समाविष्ट झाला आहे. तर टीसीएसही टोन टक्क्यांनी वाढला आहे. तसेच मेटल, फार्मा, ऑईल आणि गॅसच्या शेअर्सवर दबाव दिसून येत आहे.
Share Market Live Updates: जाणून घ्या, सर्वाधिक वर गेलेल आणि खाली पडलेले शेअर कोणते?
सेन्सेक्स निर्देशांकात एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिन्सर्व्ह, इन्फोसिस आणि टीसीएस यांनी चांगली कामगिरी केली आहे. तर दुसरीकडे इंडसलँड बँक, झोमॅटो, एशियन पेंट, टाटा स्टिल आणि रिलायन्स इंडस्ट्रीज हे शेअर आपटले आहेत.
Share Market Live Updates: रिलायन्ससह ‘या’ १० शेअर्सची भरारी
काल शेअर बाजारात ८० टक्क्यांहून अधिक शेअर्सने भरारी घेतली होती. दिवसभरात सर्वाधिक धावणाऱ्या शेअर्समध्ये रिलायन्सचा व कोटक बँकेचा वरचष्मा पाहायला मिळाला. लार्जकॅप श्रेणीतील एटीपीसी शेअर ४.५० टक्क्यांनी वधारला. सविस्तर वृत्त वाचा
Stock Market Live Today: सकाळी १० वाजता सेन्सेक्सने ६४० अंकाची उसळी घेतली
काल दिवसभरात १,२०० अंकाची आघाडी घेतल्यानंतर सेन्सेक्स निर्देशांकात आज पहिल्या तासात ६४० अंकाची उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले. बाजार पुन्हा सुस्थितीत आल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.
सेन्सेक्ससह निफ्टीतही मोठी वाढ झालेली दिसत आहे. (PC : Pixabay)