Indian Music Companies Filed Suit Against OpenAI: भारतातील टी-सीरीज आणि सारेगामासारख्या आघाडीच्या बॉलीवूड म्युझिक कंपन्या नवी दिल्लीत ओपनएआय विरुद्ध कॉपीराइट खटला दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत. एआय मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांच्या रेकॉर्डिंगच्या गैरवापर होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत या कंपन्यांनी खटला ओपन एआय विरोधात खटला दाखल करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे ओपन एआयसाठी युजर्सच्या दृष्टीने दुसरी सर्वात मोठी बाजापरेठ असलेल्या भारतात कायदेशीर आव्हान निर्माण झाले आहे. परंतु कंपनीचे म्हणणे आहे की, ते त्यांचे एआय मॉडेल्स तयार करण्यासाठी सार्वजनिकरित्या उपलब्ध असेलेल्या डेटाचाच वापर करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतेच, इंडियन म्युझिक इंडस्ट्री ग्रुप, टी-सीरीज आणि सारेगामा इंडिया यांनी नवी दिल्लीतील एका न्यायालयात एआय मॉडेल्सना प्रशिक्षण देताना त्यांच्या कॉपीराइटचे उल्लंघन करणाऱ्या ध्वनी रेकॉर्डिंगच्या अनधिकृत वापराबद्दल त्यांचे म्हणणे ऐकण्याची विनंती केली होती.

या खटल्यातील कंपन्यांचे दावे “भारतातील आणि जगभरातील संपूर्ण संगीत उद्योगासाठी महत्त्वाचे आहेत,” असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणाची माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही, परंतु रॉयटर्स वृत्तसंस्थेला याबाबत माहिती मिळाली असून, त्यांनी हे वृत्त दिले आहे.

यापूर्वी एएनआयचा ओपन एआय विरोधात खटला

भारतीय वृत्तसंस्था एएनआयने गेल्या वर्षी दाखल केलेल्या खटल्यात भारतातील म्युझिक कंपन्यांनाही सहभागी होण्याची इच्छा आहे. एएनआयने दाखल केलेल्या खटल्यात ओपनएआयच्या चॅटजीपीटी अॅप्लिकेशनवर एआय मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी परवानगीशिवाय त्यांचा कंटेंट वापरल्याचा आरोप करण्यात आला होता. तेव्हापासून, पुस्तक प्रकाशक आणि काही मीडिया ग्रुप्स नवी दिल्ली न्यायालयात ओपन एआयला विरोध करण्यासाठी एकत्र आले आहेत.

ओपन एआयचा खटल्याना विरोध

दरम्यान, चिनी एआय स्टार्टअप डीपसीकमुळे नव्या आव्हानांना तोंड देत असलेल्या ओपन एआयने एएनआयच्या खटल्याला विरोध करत, ते भारतीय न्यायालयांच्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याचे म्हटले होते. कारण कंपनी अमेरिकेत आहे आणि तिचे सर्व्हर परदेशात आहेत.

भारतात म्युझिक इंडस्ट्रीचा आवाका मोठ

भारतात बॉलीवूड आणि हिंदी पॉप संगीताचा मोठा व्यवसाय आहे. टी-सीरीज ही भारतातील सर्वात मोठ्या म्युझिक कंपन्यांपैकी एक आहे. जी दरवर्षी सुमारे २००० गाणी रिलीज करते, तर १०० वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या सारेगामा म्युझिक कंपनीकडे मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्यासारख्या प्रसिद्ध भारतीय गायकांच्या गीतांचा संग्रह आहे.

दरम्यान आयएमआय ग्रुपने त्यांच्या वेबसाइटवर नमूद केले आहे की, ते सोनी म्युझिक आणि वॉर्नर म्युझिक सारख्या जागतिक कंपन्यांचेही प्रतिनिधित्व करतात.