देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे एमडी आणि सीईओ राजेश गोपीनाथन यांनी राजीनामा दिला आहे. कंपनीने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. TCS ने राजेश गोपीनाथन यांच्या राजीनाम्यानंतर 16 मार्च 2023 पासून नवीन CEO म्हणून क्रितिवासन यांची नियुक्ती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे राजीनामा दिल्यानंतर राजेश गोपीनाथन यांनीसुद्धा आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

हा माझ्यासाठी संमिश्र भावनांचा दिवस आहे, असंही राजेश गोपीनाथन म्हणालेत. आम्ही संकटाच्या वेळी एकत्र आलो आणि एक संघ म्हणून एकत्र उभे राहिलो. आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी हे करणे महत्त्वाचे होते, जेणेकरून नवीन सीईओला आधीच तयारी करता येऊ शकेल. ” टीसीएस सोडण्यासाठी आता यापेक्षा चांगली वेळ नाही, असं म्हणत दुसऱ्या येणाऱ्या काळात लक्षणीय स्थिरता पाहायला मिळेल, असंही त्यांनी अधोरेखित केलं.

High Court orders Mumbai Police regarding atrocity case against Nawab Malik Mumbai news
मलिक यांच्याविरोधातील ॲट्रोसिटी प्रकरणाचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करा; उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
What Prakash Ambedkar Said?
Prakash Ambedkar : परभणी बंदला हिंसक वळण; प्रकाश आंबेडकरांचा इशारा, “२४ तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..”
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा सुटेना? आता शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही अद्याप…”
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
Revenue Secretary Sanjay Malhotra to be the new RBI Governor for a period of 3 years!
RBI Governer : संजय मल्होत्रा आरबीआयचे नवे गव्हर्नर, पुढील तीन वर्षे असेल कार्यकाळ
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी

हा एक असा काळ आहे, जिथे मी सर्व गोष्टी पाहिल्या आणि शिकलो. तसेच टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर शिकता आले. तुम्ही रस्त्यावरून कार चालवायला सुरुवात करता तेव्हा पादचाऱ्यांकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्याचप्रमाणे जेव्हा सल्लागारांचा विचार केला जायचा आणि मी एक कार्यकारी भूमिकेत असायचो, तेव्हा मी सर्व प्रकारच्या सल्लागारांचा बऱ्याचदा तिरस्कार करायचो आणि ते मनोरंजकही असायचे. आता मी एक महान सल्लागार असू शकतो, ज्याची जग वाट पाहत आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

खरं तर टीसीएसने फेरबदल करताना के क्रितिवासन (के क्रितिवासन) यांना सध्या कंपनीचे अध्यक्ष आणि बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा व्यवसाय गट (BFSI) चे जागतिक प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. के क्रितिवासन हे गेल्या ३४ वर्षांपासून TCSमध्ये कार्यरत आहेत. राजेश गोपीनाथन यांनी 22 वर्षे TCSला सेवा दिल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि गेल्या सहा वर्षांपासून ते कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO म्हणून कार्यरत आहेत. राजेश गोपीनाथन सप्टेंबर महिन्यापर्यंत कंपनीत कार्यरत राहणार आहेत.

राजेश गोपीनाथन यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, टीसीएससोबतचा २२ वर्षांचा प्रवास अतिशय रोमांचक आहे. एन चंद्रशेखरन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अतिशय आनंददायी असल्याचंही त्यांनी सांगितलं. टीसीएसची १० बिलियन डॉलरपेक्षा जास्त वाढ झाली आहे आणि बाजार भांडवल ७० बिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. काही योजनांवर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले आणि नव्या कल्पनांना वाट मोकळी करून देऊन टीसीएसला पुढे नेण्याची २०२३ हीच योग्य वेळ असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं.

के कृतिवासनसोबत काम करताना आलेले अनुभवसुद्धा त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, गेल्या दोन दशकांत क्रितिवासनसोबत काम केल्यामुळे मला विश्वास आहे की, टीसीएसला नव्या उंचीवर नेण्यासाठी ते सर्वात सक्षम आहेत. खरं तर अलीकडच्या काळात इन्फोसिससह अनेक मोठ्या आयटी कंपन्यांच्या उच्च व्यवस्थापन पदांवर बसलेल्या लोकांचे राजीनामे समोर आले आहेत आणि आता राजेश गोपीनाथन यांनीही टीसीएस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Story img Loader