US Stock Market Update : अमेरिकेच्या स्टॉक मार्केटमध्ये बुधवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. २०२२ साली आलेल्या घसरणीनंतर ही सर्वात मोठी घसरण असल्याचे सांगितले जाते. टेस्ला आणि अल्फाबेट (गुगलची पालक कंपनी) या कंपन्यांच्या तिमाही निकालानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाबद्दल असलेला उत्साह कमी झाला आहे. यामुळे स्टॉक मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली. एस अँड पी ५०० मध्ये मागील सहा दिवसांतली पाचवी घसरण आहे. याचा काही प्रमाणात भारतीय शेअर बाजारावरही परिणाम पाहायला मिळाला.

टेस्लाच्या नफ्यात ४५ टक्क्यांची घसरण

टेस्ला आणि अल्फाबेटच्या नफ्याचे अहवाल फार गंभीर नसले तरी नफा कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे. पुढील दिवसात नफा आणखी किती खाली जाणार? याचीच गुंतवणूकदारांना काळजी वाटत आहे. नफ्यात ४५ टक्क्यांची घसरण झाल्यानंतर शेअरच्या किंमती १२.३ टक्क्यांनी कमी झाल्या. कंपनीचा नफा अपेक्षेप्रमाणे न वाढल्यामुळे घसरण झाली असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Flipkart Cancellation Fee Rule Charges
Flipkart Cancellation Fee : ऑनलाइन ऑर्डर रद्द करताच पैसे द्यावे लागणार? फ्लिपकार्टचा ‘हा’ नियम जुना, वाचा कंपनी काय म्हणते
Daily zodiac sign horoscope For 17 December 2024
१७ डिसेंबर पंचांग: १२ पैकी ‘या’ राशींचे प्रगतीच्या…
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
loksatta money motra article Growth and Value strategy
तुमची रणनीती काय? ‘ग्रोथ की व्हॅल्यू’
Sharad Pawar asserts that distrust in the electoral system should be removed print politics news
मारकडवाडीवरून कलगीतुरा, निवडणूक यंत्रणेबद्दल अविश्वास दूर करा; शरद पवारांचे मारकरवाडीत प्रतिपादन
pune pustak Mahotsav latest news
‘लिटफेस्ट’च आता ग्रंथतारक…

हे वाचा >> Money Mantra: अर्थसंकल्पानंतर दिवसअखेर बाजारात निरुत्साहच!

टेस्ला वॉलस्ट्रिटची सर्वात मोठी कंपनी

टेस्ला ही कंपनी वॉल स्ट्रिटमधील सर्वात मोठी कंपनी आहे. केवळ विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या विक्रीवर कंपनीने हे स्थान मिळविले आहे. तसेच एआयवर आधारित रोबोटिक्स सारख्या उत्पादनांमुळे कंपनीची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

एआयमधील गुंतवणूक कमी होत आहे

अल्फाबेटमध्येही गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदार निरुत्साह दाखवत आहेत. अल्फाबेटने मागच्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा अधिक नफा दाखविला तरीही कंपनीच्या शेअरमध्ये ५ टक्क्यांची घसरण झाली. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार कंपनीच्या प्रदर्शनात काही कमतरता दिसून आल्या आहेत. विशेषकरून युट्यूबवरील जाहिरातींमधून होणाऱ्या महसूलात फार वाढ झालेली नाही. तसेच एआयमध्ये मोठी गुंतवणूक आणि इतर खर्चांमुळे कंपनीच्या भविष्यातील कमाईवर परिणाम होऊ शकतो, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा >> Stock Market Today : अर्थसंकल्प सादर होताच शेअर बाजारात मोठी पडझड, १००० अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स ८० हजारांखाली

भारतीय शेअर बाजाराची परिस्थिती

भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून विक्रमी वाढ पाहायला मिळत आहे. मंगळवारी जेव्हा अर्थसंकल्प सादर केला गेला. तेव्हा सेन्सेक्समध्ये १२०० अंकाची घसरण पाहायला मिळाली. मात्र नंतर बाजाराने घसरणीवर मात केली. बुधवारी सेन्सेक्समध्ये पुन्हा २८० अंकाची घसरण पाहायला मिळाली आणि बाजार ८०,१४८ वर पोहोचला. त्याचबरोबर निफ्टी निर्देशांक ६५.५५ अंकावर बंद होऊन २४,४१३ वर आला.

आज (गुरुवारी) सकाळी बाजार उघडताच ५५० अंकाच्या घसरणीसह सेन्सेक्स ७९,६१० वर आला. त्याचवेळी निफ्टीमध्येही १५० हून अधिक अंकाची घसरण झाली. तो २४,२५० च्या पातळीवर आला.

Story img Loader