मुंबई : रिझव्र्ह बँकेने बुधवारी अपेक्षेप्रमाणे चालू आर्थिक वर्षांतील मे महिन्यापासून सलग सहावी व्याजदर वाढ केली. ‘रेपो दरा’तील पाव टक्का वाढीमुळे गृह, वाहन, शिक्षण कर्ज आणखी महागणार आहेत, तर चालू स्थितीतील कर्जावरील हप्तय़ांपोटी सर्वसामान्यांच्या खिशावर ताण येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारपासून तीन दिवस चाललेल्या बैठकीअंती सहा सदस्य असलेल्या पतधोरण समितीने (एमपीसी) रेपो दरात वाढीचा निर्णय चार विरुद्ध दोन अशा बहुमताने घेतला. परिणामी रेपो दर २५ आधारिबदूंनी म्हणजे पाव टक्क्याने वाढवून तो ६.५० टक्क्यांवर नेण्यात आला आहे. महागाईला प्रतिबंध म्हणून १० महिन्यांत सहाव्यांदा झालेल्या या दरवाढीतून व्याजाच्या दरात एकूण अडीच टक्क्यांची (२५० आधारिबदू) वाढ झाली आहे.
उल्लेखनीय म्हणजे महागाई दर निश्चित मर्यादेपर्यंत खाली आला नाही तर यापुढेही व्याजदरात वाढ केली जाईल, असे स्पष्ट संकेत दास यांनी दिले. रिझव्र्ह बँकेने गेल्या वर्षीच्या सुरुवातीला स्वीकारलेली परिस्थितीजन्य लवचीकतेतून माघारीची भूमिकाही कायम असल्याचे बुधवारी स्पष्ट केले. दिलासादायी बाब इतकीच की, सलग दुसऱ्यांदा व्याज दरवाढीची गती अध्र्या टक्क्यावरून पाव टक्का अशी कमी झाली आहे.
गृहनिर्माण क्षेत्रातून नाराजी
व्याजदर वाढीवर गृहनिर्माण क्षेत्रातून नाराजीचा सूर उमटला आहे. अल्प व मध्यम उत्पन्न गटातून घरांच्या मागणीवर नकारात्मक परिणाम होण्याची भीती असल्याचे विकासकांचे म्हणणे आहे. मे २०२१पासून झालेली बेफाम दरवाढ ही अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी अडसर ठरणार नाही, हे पाहणे महत्त्वाचे असल्याचे ‘नरेडको’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी म्हटले आहे. तर गेल्या दोन तिमाहीत घरांच्या किमतीही वाढल्या आहेत. असे असताना व्याजदर वाढीमुळे घरखरेदी करणाऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याचे मालमत्ता सल्लागार संस्था ‘अॅनारॉक’चे अध्यक्ष अनुज पुरी यांनी सांगितले.
हप्ता किती वाढणार?
२० वर्षांसाठी ८.५० टक्के दराने ५० लाखांचे गृह कर्ज घेतले असल्यास, त्यावर ४३,३९१ रुपयांचा हप्ता भरावा लागतो. मात्र आता पाव टक्क्याची वाढ गृहीत धरल्यास ४४,१८६ रुपये हप्ता भरावा लागेल. म्हणजेच प्रति महिना ७९५ रुपयांची अधिक झळ कर्जदारांना सोसावी लागणार आहे.
अन्नधान्य महागाईतून दिलासा?
रब्बी हंगामात गहू आणि तेलबियांचे उत्पादन चांगले होण्याची शक्यता आहे. त्या परिणामी अन्नधान्याचा महागाई दर आणखी कमी होण्याची आशा आहे. परिणामी ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढ चालू आर्थिक वर्षांत ६.७ टक्क्यांवरून कमी होऊन ६.५ टक्क्यांपर्यंत खाली येण्याचे दिलासादायक सुधारित अनुमान बुधवारी गव्हर्नर दास यांनी वर्तविले.
किरकोळ महागाई दर अजूनही उच्च पातळीवर कायम असून ती एक चिंतेची बाब आहे. महागाई दर खाली येण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. ती कमी करण्यासाठी मध्यवर्ती बँक प्रयत्नशील आहे. रेपो दर अजूनही करोना महामारीपूर्व पातळीपेक्षा कमी आहेत.
– शक्तिकांत दास, गव्हर्नर, रिझव्र्ह बँक