एंटरटेन्मेंट OTT प्लॅटफॉर्म Netflix ने बुधवारी ११६ देशांमध्ये त्याचे सबस्क्रिप्शन दर कमी केले आहेत. भारतातील बिझनेस मॉडेलच्या यशानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, २०२१ मध्ये भारतात कमी किमतीत सबस्क्रिप्शन योजना लॉन्च केल्यानंतर ग्राहकांच्या शेअर्समध्ये ३० टक्के वाढ झाली आहे आणि महसूल २४ टक्क्यांनी वाढला आहे. यानंतर कंपनीने आता ११६ देशांमध्ये समान सबस्क्रिप्शन मॉडेल लॉन्च केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कंपनीच्या उत्पन्नात ५ टक्के वाटा

ज्या देशांमध्ये कंपनीने सबस्क्रिप्शन प्लॅनच्या किमती कमी केल्या आहेत, त्या देशांचा कंपनीच्या उत्पन्नात फक्त ५ टक्के वाटा आहे. या निर्णयामुळे कंपनीची कमाई वाढण्यास मदत होईल, असा विश्वास असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

हेही वाचाः ITR Filling: तुम्हाला ITR भरण्याचे फायदे माहीत आहेत का? कर्जापासून ते परताव्यापर्यंत अनेक लाभ

सबस्क्रिप्शन दर २०-६० टक्क्यांनी कमी केले

कंपनीच्या वतीने, भारतीय ग्राहकांना लक्षात घेऊन २०२१ मध्ये प्रथमच सबस्क्रिप्शन प्लॅनचे दर २० ते ६० टक्क्यांनी कमी करण्यात आले. कंपनीचे दर कमी करण्यामागील उद्देश भारतातील तिचा प्रवेश वाढवणे हा होता.

हेही वाचाः वडिलांच्या चुकीतून मुकेश अंबानींनी घेतला ‘हा’ धडा, संपत्तीच्या वाटणीचं दुःख मुलांनी सहन करू नये म्हणून…

नेटफ्लिक्सचे घटते उत्पन्न

Netflix चा नफा मार्च तिमाहीत १८ टक्क्यांनी घसरून १,३०५ दशलक्ष डॉलर झाला, जो मागील आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत १,५९७ दशलक्ष डॉलर होता. मात्र, या कालावधीत कंपनीचे उत्पन्न ३.७ टक्क्यांनी वाढून ८१६१ दशलक्ष डॉलरवर पोहोचले. जागतिक स्तरावर कंपनीच्या सशुल्क सदस्यांची संख्याही वाढत आहे. गेल्या एका वर्षात ते ४.९ टक्क्यांनी वाढून २३२.५ दशलक्ष झाले आहे.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The indian business model changed the way netflix operated lowering subscription plan prices in 116 countries vrd
Show comments