लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : गेल्या वर्षी दिवाळीत याच ऑक्टोबर महिन्यात भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र जागतिक पातळीवरील भू-राजकीय तणाव आणि महागाईमुळे मंदीची चाहूल लागल्याने त्या शिखर पातळीपासून घसरण सुरू झाली. आता महागाई नियंत्रणासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून आक्रमकपणे व्याजदर वाढ सुरू असल्याने जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये निराशेचे वातावरण आहे. या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात कोणत्या कंपन्यांचे समभाग खरेदी करावेत हा प्रश्न सामान्य गुंतवणूकदाराला सतावतो आहे. यामुळे विविध दलाली पेढ्यांनी यंदाच्या दिवाळीपासून ते पुढील वर्षाच्या दिवाळीपर्यंत अर्थ-उज्ज्वलतेसाठी काही खास समभाग सुचविले आहेत.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
pune samyukta Maharashtra movement
त्यागी लोकप्रतिनिधी आणि पदनिष्ठ राजकारणी
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका

आयसीआयसीआय बँक

कमी होत असलेले बुडीत कर्जाचे (एनपीए) प्रमाण, व्याजदर येथून पुढे स्थिरावत जाऊन उतरणीला लागण्याची शक्यता आणि त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्जाच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता, उत्तम व्यवस्थापन या सर्वच बाबींचा सकारात्मक परिणाम बँकेच्या कामगिरीवर होईल. जून २०२२ अखेर बँकेचा एकूण व्यवसाय १,४१,५५८ कोटींचा असून देशातील खासगी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने प्रत्येक पडझडीत हा समभाग खरेदी करण्यास सुचविला असून तो ९९९ रुपयांचे लक्ष्य गाठेल असा अंदाज वर्तविला आहे. तसेच ‘५पैसा डॉट कॉम”ने ८६७ ते ९१० रुपये किंमत पातळीमध्ये समभाग खरेदी करण्यास योग्य असल्याचे सुचविले आहे. प्रभुदास लीलाधर या दलाली पेढीने समभाग ९५० रुपयांचे लक्ष्य समभागाकडून गाठले जाईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

सिप्ला

जागतिक विस्तार असलेली सिप्ला ही भारतातील तिसरी सर्वात मोठी औषध निर्मात्री कंपनी आहे, जिचा सध्या ४.८ टक्के बाजार हिस्सा आहे. कंपनी श्वसन, अँटी-रेट्रोव्हायरल, यूरोलॉजी, कार्डियाक, अँटी-इन्फेक्टिव्ह, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि सीएनएस या उपचारात्मक विभागांवर कंपनीने लक्ष केंद्रित केले आहे. कंपनीची पाच औषधे अमेरिकी अन्न आणि औषध प्रशासनाच्या मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. यामुळे अमेरिकेतील कंपनीचा महसूल लवकरच १० कोटी डॉलरच्या टप्पा गाठण्याची आशा आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने गुंतवणूकदारांना १,१०९ रुपयांच्या पातळीवर खरेदी आणि समभागासाठी १,२८३ रुपयांचे लक्ष्य निर्धारित केले आहे. समभाग ९९२ रुपयांपर्यंत घसरल्यास अधिक समभाग जोडण्याचा सल्ला दिला आहे. तर कोटक सिक्युरिटीजने १,२१५ रुपयांचे लक्ष्य निर्धारित केले असून १० टक्के वाढीची आशा व्यक्त केली आहे.

दीपक नायट्राइट

दीपक नायट्राइट लिमिटेड ही रसायन उत्पादन कंपनी आहे. कंपनीच्या विभागांमध्ये बल्क केमिकल्स अँड कमोडिटीज, फाइन अँड स्पेशालिटी केमिकल्स आणि फ्लोरोसेंट व्हाइटिंग एजंट यासारख्या रसायन उत्पादनांचा यांचा समावेश आहे. ३०,५७८ कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह कंपनी संबंधित क्षेत्रातील सर्वात भक्कम अशा कंपन्यांपैकी एक आहे. दीपक नायट्रेटला ‘मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड’ उपक्रमाद्वारे मोठा लाभ मिळाला असून कंपनीकडे १,५०० कोटी रुपयांच्या मागण्या प्रलंबित आहेत. कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त आहे. एक मजबूत वृद्धी नोंदविणारी कंपनी म्हणून कंपनीचा पाया आर्थिकदृष्ट्या भक्कम आहे. जेएम फायनान्शियल सर्व्हिसेस या दलाली पेढीने २,७३० रुपयांचे लक्ष्य निर्धारित केले असून समभागात २१ टक्के वाढीची आशा व्यक्त केली आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने २,७०० रुपयांपर्यंत समभाग मजल मारेल अशी आशा व्यक्त केली आहे. तर २,२६५-२,२३० या पातळीत समभाग खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

चंबल फर्टिलायझर्स

डॉ. के. के. बिर्ला यांनी १९८५ मध्ये स्थापन केलेली ‘चंबल फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड’ आज देशातील आघाडीची खत उत्पादक कंपनी असून भारतातील एकूण उत्पादित युरियाच्या सुमारे १३ टक्के वाटा कंपनीचा आहे. दोन दशकांहून अधिक काळापासून कंपनीने देशाच्या अन्न सुरक्षेसाठी जबाबदारीने योगदान दिले आहे. कंपनीचे तीन हायटेक नायट्रोजनयुक्त खत (युरिया) प्रकल्प राजस्थानच्या कोटा जिह्यात आहेत. या तिन्ही प्रकल्पांची वार्षिक उत्पादन क्षमता सुमारे ३४ लाख मेट्रिक टन आहे. हे सर्व प्रकल्प डेन्मार्क, इटली, अमेरिका आणि जपानमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. प्रभुदास लीलाधर या दलाली पेढीने हा समभाग ४८० रुपयांपर्यत तो वाढेल असा अंदाज वर्तविला आहे.

भारती एअरटेल

दूरसंचार क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या या कंपनीच्या ग्राहक संख्येत महिनादरमहिना वाढ होत आहे. कंपनीने ५जी सेवेत देखील आघाडी घेतली आहे. कंपनीचे प्रति ग्राहक उत्पन्न (एआरपीयू) वर्ष २०२५ पर्यंत १३४ रुपयांवरून २१९ रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. कंपनीकडे सध्या ४९ कोटी ग्राहक असून व्होडाफोन-आयडियाकडील ग्राहक एअरटेलकडे आकृष्ट होत आहेत. प्रभुदास लीलाधर या दलाली पेढीने समभागासाठी १,०३२ रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने ९०० रुपयांपर्यंत समभाग मजल मारेल, अशी आशा व्यक्त केली आहे.

फेडरल बँक

गेल्या दोन तिमाहीत फेडरल बँकेची पत वाढ बँकिंग क्षेत्राच्या सरासरीपेक्षा अधिक वेगाने सुरू आहे. बँकेने मजबूत मागणी दर्शविणाऱ्या क्षेत्रांमध्ये व्यापक प्रमाणावर सेवा पुरवून उत्पन्न वाढीला हातभार लावला आहे. बँकेकडे मुबलक ठेवी उपलब्ध असून आगामी काळात अधिक पत विस्तार करता येणे शक्य आहे. प्रभुदास लीलाधर या दलाली पेढीने सध्या १३२ रुपयांच्या पातळीवर असलेला समभाग १६५ रुपयांची पातळी गाठेल असा अंदाज व्यक्त केला आहे. एलकेपी सिक्युरिटीजने समभागमूल्यात ३८ टक्के वाढीसह, १८० रुपयांची पातळी गाठली जाण्याचा अंदाज वर्तविला आहे.

टीसीआय एक्स्प्रेस

टीसीआय एक्स्प्रेस ही भारतीय वितरण क्षेत्रातील एक अग्रणी आहे. सध्याच्या काळात जलद वितरणाची वाढती मागणी, सरकारी उपक्रम आणि धोरण समर्थन, सुधारित रस्ते दळणवळण आणि वितरणाची वेळ कमी करून कमानीला या क्षेत्रात मजबूत वाढ अपेक्षित आहे. कंपनीने शाखांचे विस्तृत जाळे तयार केले आहे. कंपनीकडे विविध ठिकाणी १,४०० हून अधिक कार्यालय आहेत तसेच १.२ कोटी चौरस फूट गोदामांचे क्षेत्र आणि ६,०००हून अधिक प्रशिक्षित कर्मचारी आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजने हा समभाग २,१६९ रुपयांचे लक्ष्य गाठेल असा अंदाज वर्तविला आहे. ‘५पैसा डॉट कॉम’ने ८०४ ते ८४४ रुपयांच्या किमतीत समभाग खरेदीचा सल्ला दिला आहे.

आयटीसी

बाजारात जवळपास १०.८ अब्ज डॉलर्सची एकूण विक्री मूल्य असलेली अग्रणी ग्राहकोपयोगी उत्पादन कंपनी आहे. वर्ष १९१० मध्ये स्थापन झालेली आयटीसी लिमिटेड ही एक बहुविध व्यवसाय विस्तार असलेली कंपनी आहे ज्यात खाद्यपदार्थ, पर्सनल केअर, सिगारेट आणि सिगार, वस्त्रोद्योग, शिक्षण व स्टेशनरी उत्पादने, धूप स्टिक वगैरे विविध वस्तू आणि सेवांचा समावेश आहे. या एफएमसीजी कंपनीचा विस्तार अनेक क्षेत्रांत असून त्यात हॉटेल्स, पेपरबोर्ड आणि पॅकेजिंग, ॲग्री बिझिनेस आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी आदींचा समावेश होतो. प्रभुदास लीलाधर या दलाली पेढीने समभाग खरेदीचा सल्ला देताना, त्यासाठी ४२५ रुपये ते ४५० रुपयांचे लक्ष्य निर्धारीत केले आहे.

ज्युबिलंट फूड

ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेड (जेएफएल) ही भारतातील सर्वात मोठी खाद्य सेवा कंपनी आहे. कंपनीकडे डॉमिनोज पिझ्झा, डन्किन डोनट्स आणि पोपाय हे तीन प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड आहेत. भारत आणि इतर जवळपासच्या देशांमध्ये तिच्या दालनांचे मोठे जाळे आहे. भारतातील ३२२ शहरांतून डॉमिनोजचे १५०० हून अधिक स्टोअर्स, डन्किन डोनट्सचे ३० स्टोअर्स आणि स्वत:च्या होंग्स किचन या ब्रॅण्डची १४ रेस्टॉरंट आहेत. या खेरीज श्रीलंकेत ३२ डॉमिनोज स्टोअर्स आणि बांगलादेशमध्ये ८ डॉमिनोज स्टोअर्स आहेत. सर्व स्टोअरची कच्च्या मालाची मागणी पूर्ण करण्यासाठी भारतभर एकूण आठ पुरवठा साखळी केंद्रे आणि चार वितरण केंद्रांची तिच्याकडे मालकी आहे. भारतातील लोकसंख्या आणि वाढती मागणी पाहता कंपनी लवकरच ३,००० स्टोअर्सचा टप्पा पार पाडेल. प्रभुदास लीलाधर या दलाली पेढीने आगामी काळात समभाग ७५० -७९० रुपयांची पातळी गाठेल असा अंदाज वर्तविला आहे.

हॅवेल्स इंडिया

विद्युत उपकरणातील हॅवेल्स ही विद्युत अभियांत्रिकी उद्योगाच्या बाजारपेठेतील सर्वात मोठी नाममुद्रा आहे. हॅवेल्स व्यतिरिक्त कॅबट्री, सिल्व्हेनिया, कोन्कॉर्ड, ल्युमिनन्स व स्टॅण्डर्ड या नाममुद्रेने कंपनी उत्पादने विकते. हॅवेल्स इंडियाने २००७ मध्ये सिल्व्हेनिया या जागतिक पातळीवरील लाइटिंग क्षेत्रातील कंपनीचे अधिग्रहण केले. कंपनी आपली उत्पादने ५० देशात विकत आहे. भारतात कंपनीचे विद्युत उत्पादने व निर्मिती कारखाने असण्यासह, विदेशात युरोप, आफ्रिका, चीन व लॅटिन अमेरिका इथे आहेत. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने १,१६५ रुपयांच्या पातळीवर असलेला हा समभाग इथून २९ टक्क्यांनी वाढेल अशी शक्यता वर्तविली आहे. शिवाय समभाग १,६५० रुपयांची पातळी गाठेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.