Country wise Gold Reserves List : जगातील प्रत्येक देशाकडे सोन्याचे साठे आहेत. काही देशांकडे हजारो टन सोनं आहे, तर काही देशांकडे कमी प्रमाणात सोनं आहे. जगातील कुठल्या देशाकडे सोन्याचा किती साठा आहे असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. तुम्हाला देखील असा प्रश्न कधी पडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आम्ही तुम्हाला जगातील सोन्याचा साठा सर्वाधिक असणाऱ्या टॉप १० देशांची यादी देणार आहोत. तसेच या देशांकडे किती सोनं आहे हे देखील सांगणार आहोत.
जगभरात सर्वाधिक सोन्याचा साठा अमेरिकेकडे आहे. एकट्या अमेरिकेकडे ८,१३३ टन सोनं आहे. याचबरोबर अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. अमेरिकेनंतर या यादीत जर्मनीचा नंबर लागतो. जर्मनीकडे ३,३५२ टन सोनं आहे. जर्मनीपाठोपाठ इटली, फ्रान्स, रशिया, चीन, जपान, भारत, नेदरलँड्स आणि तुर्कीये या देशांचा नंबर लागतो.

जगात सर्वाधिक सोन्याचा साठा असणारे टॉप १० देश

क्रमांकदेशसोन्याचे साठे (टनांमध्ये)
अमेरिका८,१३३.४६
जर्मनी३,३५१.५३
इटली२,४५१.८४
फ्रान्स२,४३६.९७
रशिया२,३३५.८५
चीन२,२६४.३२
जपान८४५.९७
भारत८४०.७६
नेदरलँड्स६१२.४५
१०तुर्कीये५८४.९३


महत्त्वाची टिप

वरील यादी वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या संकेतस्थळावरील माहितीच्या आधारावर देण्यात आली आहे. तसेच ही यादी देशांच्या अधिकृत सोन्याच्या साठ्यावर आधारित आहे, जे त्यांच्या केंद्रीय बँकांमध्ये साठवून ठेवण्यात आलं आहे. खाणीतून काढलं जाणारं सोनं किंवा खासगी साठ्यांचा यांचा यात समावेश नाही. या आकडेवारीत थोडा बदल होऊ शकतो कारण हे साठे आर्थिक धोरणांनुसार वाढवले किंवा कमी केले जाऊ शकतात.

Story img Loader