10 Most Valuable Indian Brands of 2025 : सध्याच्या इंटरनेटच्या युगात जग एकमेकांच्या खूपच जवळ आले आहे. यादरम्यान वेगवेगळ्या देशातील ब्रँड्स हे जागतिक स्तरावरील बाजारपेठेत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करताना दिसून येत आहेत. भारतीय ब्रँड देखील जागतिक पातळीवर नावाजले जात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ब्रँड फायनान्सच्या ताज्या रिपोर्टनुसार टाटा ग्रुपने जागतिक स्तरावर भारताची मान उंच केली आहे. या रिपोर्टनुसार टाटा ग्रुपची ब्रँड मूल्य ३१.६ अब्ज डॉलर असून, ज्यामध्ये १० टक्के वाढ आहे. याबरोबरच २०२५ मध्ये जगातील टॉप १०० सर्वात मूल्यवान ब्रँडमध्ये आघाडीचा भारतीय ब्रँड म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे. जागतिक स्तरावर हा भारतीय ब्रँड ६० व्या क्रमांकावर आहे .

सर्वात मूल्यवान भारतीय ब्रँडच्या यादीत इन्फोसिस दुसर्‍या क्रमांकावर आहे. इतकेच नाही तर इन्फोसिस सलग चौथ्या वर्षी जागतिक स्तरावर तिसर्‍या क्रमांकाची सर्वात मूल्यवान आयटी सर्व्हिसेस ब्रँड ठरला आहे.

विशेष बाब म्हणजे २०२५ मध्ये एलआयसी सर्वात वेगाने वाढणारा भारतीय ब्रँड म्हणून उदयास आला आहे. कारण २०२५ मध्ये एलआयसीच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये ३६ टक्के वाढ झाली आहे, जी आता १३.३ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे आणि त्याचबरोबर एएए ब्रँड स्ट्रेंथ रेटिंग देखील कायम ठेवली आहे, असेही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

या यादीत एचडीएफसी ग्रुपने पहिल्यांदाच या यादीत स्थान मिळवले आहे. या ग्रुपची ब्रँड व्हॅल्यू १४.२ अब्ज डॉलर आहे. तर लार्सन अँड टुब्रोची ब्रँड व्हॅल्यू ७.४ अब्ज डॉलर आहे. तर जीओ ग्रूप देखील ६.५ अब्ज डॉलर इतक्या ब्रँड व्हॅल्यूसह जागतिक स्तरावर आपले स्थान पक्के करताना दिसून येत आहे.

जागतिक ब्रँड व्हॅल्यू मार्केटमध्ये सध्या तरी अमेरिका आघाडीवर आहे, एकूण ब्रँड व्हॅल्यू मार्केटच्या ५२.९ टक्के वाटा हा अमेरिकेचा आहे. त्यामुळे जगभरातील इतर देश शर्यतीत खूपच मागे असल्याचे दिसून येते. तर ब्रँड फायनान्स ग्लोबल ५००, २०२५ मधील सर्वात मौल्यवान ब्रँडमध्ये भारत ८ व्या स्थानावर आहे. भारताचा ब्रँड व्हॅल्यूमध्ये एकूण १.७ टक्के वाटा आहे. ज्याच्या आधारे भारतीय ब्रँड्सचे जागतिक स्तरावर वाढते महत्त्व अधोरेखित होते.

ब्रँड फायनान्स रिपोर्ट २०२५ नुसार भारतातील टॉप १० सर्वात मौल्यवान ब्रँडची यादी खालीलप्रमाणे आहे.

रँक २०२५कंपनीब्रँड मूल्य उद्योग जागतिक क्रमवारी २०२५
टाटा ग्रुप३१.६ अब्ज डॉलर्सडायव्हर्स ६०
इन्फोसिस १६.३ अब्ज डॉलर्स आयटी सर्व्हिसेस १३२
एचडीएफसी ग्रुप १४.२ अब्ज डॉलर्सबँकिंग १६४
एलआयसी १३.३ अब्ज डॉलर्सविमा १७७
रिलायन्स ग्रुप९.८ अब्ज डॉलर्स डायव्हर्स २३७
एसबीआय ग्रुप ९.६ अब्ज डॉलर्सबँकिंग २४१
एचसीएलटेक ८.९ अब्ज डॉलर्स आयटी सर्व्हिसेस २६२
एअरटेल ७.७ अब्ज डॉलर्स टेलिकम्युनिकेशन्स २९२
लार्सन अँड टुब्रो७.४ अब्ज डॉलर्सडायव्हर्स ३१६
१०महिंद्रा ग्रुप९७.२ अब्ज डॉलर्सडायव्हर्स ३३०
मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top 10 most valuable indian brands in 2025 tata infosys hdfc check list marathi news rak