Ban On Spam Calls And Messages : ग्राहकांना वारंवार त्रास देणाऱ्या स्पॅम कॉल्स आणि मेसेजेसना आळा घालण्यासाठी दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. ट्रायने नुकतेच नवीन नियम जारी केले असून, आता स्पॅम कॉल्सची खरी आकडेवारी जाहीर न करणाऱ्या टेलिकॉम कंपन्यांना २ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद केली आहे. टेलिकॉम माध्यमांचा गैरवापर करणाऱ्या टेलिमार्केटिंग पद्धती रोखण्यासाठी हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. या नव्या नियमांमध्ये नोंदणीकृत नसलेल्या टेलिमार्केटर विरुद्धचे नियम कडक करणे, मार्केटिंगसाठी १०-अंकी क्रमांकांचा गैरवापर रोखणे आणि ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा भक्कम करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टेलिमार्केटिंगसाठी आता १०-अंकी क्रमांक वापरण्यास बंदी

पारदर्शकता सुधारण्यासाठी, ट्रायने १०-अंकी मोबाइल क्रमांकाद्वारे व्यावसायिक संवाद साधण्यावर मर्यादा आणल्या आहेत. त्याऐवजी, एक नियुक्त क्रमांक मालिकेचा वापर करावा लागणार आहे. ‘१४०’ मालिका प्रमोशनल कॉलसाठी सुरू राहणार असून, नव्याने सुरू केलेली ‘१६००’ मालिका व्यवहार आणि सेवा कॉलसाठी वापरली जाणार आहे.

तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया होणार सोपी

मोबाइल ग्राहकांना आता नोंदणी नसलेल्या क्रमांकावरून येणाऱ्या स्पॅम मेसेज आणि कॉल्सविरुद्ध तक्रारी दाखल करता येणार आहेत. यासाठी ट्रायने तक्रार प्रक्रिया देखील सोपी केली आहे. स्पॅमची तक्रार करण्याची वेळ तीन दिवसांवरून सात दिवसांपर्यंत वाढविण्यात आली आहे. दूरसंचार ऑपरेटरना आता पाच दिवसांच्या आत तक्रारींवर कारवाई करावी लागणार आहे, यासाठी आधी ३० दिवसांची मर्यादा होती.

वारंवार उल्लंघन करणाऱ्यांसाठी कडक शिक्षा

ट्रायने नव्या नियमांनुसार नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्यांसाठी कठोर दंड लागू करण्याची तरतूद केली आहे. पहिल्यांदा उल्लंघन करणाऱ्यांची आउटगोइंग सेवा १५ दिवसांसाठी बंद केली जाईल. पण, वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची सर्व दूरसंचार सेवा एका वर्षासाठी खंडीत केली जाईल. याचबरोबर, नवीन नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या दूरसंचार ऑपरेटरसाठी ट्रायने आर्थिक दंडाची तरतूद केली आहे. पहिल्यांदा नियम उल्लंघन केल्यास २ लाख रुपये, दुसऱ्या उल्लंघनासाठी ५ लाख रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक उल्लंघनासाठी १० लाख रुपये दंड आकारला जाणार आहे.

स्पॅम कॉल्सची समस्या

  • गेल्या काही काळा स्पॅम मेसेजेस आणि कॉल्स सर्वसामान्य ग्राहकांसाठी मोठी समस्या बनले आहेत. ज्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
  • स्पॅम कॉल्समुळे अनेकवेळा ग्राहकांचा महत्त्वाचा वेळ वाया जात आहे.
  • स्पॅम कॉल्समध्ये सहसा अनवधानपणे विक्री, कर्ज, किंवा पॅरामेडिकल सेवा यासारख्या गोष्टींचे प्रचार केले जातात. यामुळे ग्राहकांना मोठा त्रास होत आहे.
  • याचबरोबर काही स्पॅम कॉल्स लोकांच्या वैयक्तिक माहितीची चोरी करण्याचा प्रयत्न करतात, जसे की क्रेडिट कार्ड नंबर, बँक खाते तपशील, किंवा ओटीपी. या प्रकारांमुळे ग्राहकांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
  • स्पॅम कॉल्समध्ये लोकांना फसवण्याचा किंवा त्यांच्यावर इतर प्रकारचा हल्ला करण्याचा धोका असतो. फसवणुकीमुळे ग्राहकांना मानसिक, शारीरिक, आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो.