United States Economy Update: टेक कंपन्यांना अमेरिकेतील महागड्या कर्जाचा फटका बसला आहे, त्यामुळे टेक कंपन्या कर्मचारी कपात करीत आहेत. अलीकडे अमेरिकेतही बँकिंग संकट आले आहे. सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक ढासळली. २०२३ च्या दुसऱ्या सहामाहीत प्रचंड महागाई आणि उच्च कर्जामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत आंशिक मंदीचा अंदाज वर्तवला जात आहे. अमेरिकेतील आर्थिक विकासाचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. देशातील दिग्गज बँकर आणि कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष एमडी उदय कोटक यांनीसुद्धा या सर्व युक्तिवादांवर भाष्य केले आहेत. ते म्हणाले की, अमेरिकेच्या आर्थिक विकासाच्या घसरणीबद्दल बोलणे म्हणजे वेळेआधीच निष्कर्षापर्यंत आल्यासारखे आहे. अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या पीछेहाटीचे अंदाज म्हणजे निव्वळ उतावीळ तर्क आहेत, असंही ते म्हणालेत. विशेष म्हणजे जागतिक उलाढालीच्या १० कंपन्यांमध्ये एकही भारतीय कंपनी नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उदय कोटक यांनी ट्विट केले की, जागतिक उलाढालीच्या बाबतीत जगातील १० पैकी ९ कंपन्या अमेरिकन आहेत आणि एक कंपनी सौदी अरेबियाची आहे. या यादीत कोणतीही युरोपियन कंपनी किंवा चिनी किंवा कोणतीही भारतीय कंपनी नाही. म्हणूनच अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या पतनाबद्दल बोलणे हे धाडसाचे ठरेल, असेही त्यांनी अधोरेखित केलं आहे.

उदय कोटक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, अॅपल ही जगातील सर्वात मोठी कंपनी आहे, ज्याचे बाजार भांडवल २.५९८ ट्रिलियन डॉलर आहे. त्यानंतर मायक्रोसॉफ्टचा नंबर लागतो, ज्यांचे बाजारमूल्य २.१३ ट्रिलियन डॉलर आहे. तिसर्‍या स्थानावर सौदी अरेबियाची सौदी अरामको आहे, ज्यांचे बाजार मूल्य २.०३२ ट्रिलियन डॉलर आहे. Google चौथ्या स्थानावर आहे, ज्याचे मूल्य १.३४९ ट्रिलियन डॉलर आहे. अॅमेझॉन १.०४३ ट्रिलियन डॉलरसह पाचव्या स्थानावर, ७११.१० अब्ज डॉलरसह बर्कशायर हॅथवे सहाव्या स्थानावर, NVIDIA ६५५.४८ अब्ज डॉलर मूल्यासह सातव्या स्थानावर आहे. टेस्ला ५८०.११ ट्रिलियन डॉलरसह आठव्या क्रमांकावर आहे. तर मेटा ५६४.६५ अब्ज डॉलर्ससह नवव्या स्थानावर आहे आणि १०व्या स्थानावर जॉन्सन अँड जॉन्सन आहे, ज्यांचे बाजारमूल्य ५१६.०५ ट्रिलियन डॉलर आहे.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: United states economy why uday kotak said predicting a decline in the us economy is a sign of immaturity vrd
Show comments