ChatGpt आता लोकांना त्यांचे पैसे परत मिळवण्यात मदत करीत असल्याचं सांगितलं जात आहे. DoNotPay चे CEO जोशुआ ब्राऊडर (Joshua Browder) यांनी यासंदर्भात आपला अनुभव सांगितला. ते म्हणतात की, त्यांनी ChatGPT ला त्यांचे हरवलेले पैसे मिळवण्यात मदत करण्यास सांगितले आणि काही काळानंतर त्यांच्या खात्यात २१० डॉलर म्हणजेच १७,२०० रुपये जमा झाले. याबद्दलची माहिती त्यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. “मी नवीन चॅटजीपीटी ब्राऊझिंग एक्स्टेंशनला माझ्यासाठी काही पैसे शोधण्यास सांगितले. एका मिनिटात कॅलिफोर्निया सरकारकडून माझ्या खात्यात २१० डॉलर म्हणजेच १७ हजार रुपये जमा झाले,” असं जोशुआ ब्राऊडर यांनी सांगितलं. हिंदुस्तान टाइम्सने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्राऊडर म्हणतात की, ChatGPT ने पहिल्यांदा कॅलिफोर्निया स्टेट कंट्रोलरच्या वेबसाइटवर जाण्यास सांगितले. या वेबसाइटवर दावा न केलेल्या निधीची माहिती दिली आहे. उदाहरणार्थ, जर एखादी कंपनी तुम्हाला परतावा देऊ इच्छित असेल, परंतु ती तुमच्याशी संपर्क साधू शकली नसेल तर हा निधी या वेबसाइटवर उपलब्ध असतो. ChatGPT ने मग ब्राउडरला सांगितले की, ते त्याच्या पैशांवर कसा दावा करू शकतात. AI ने त्यांना संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रक्रिया समजावून सांगितल्याचा ब्राउडर यांनी दावा केला आहे.

एका मिनिटात २१० डॉलर खात्यात जमा

ChatGPT च्या माध्यमातून १ मिनिटात २१० डॉलर खात्यात कसे हस्तांतरित केले गेले, याचीही माहितीही ब्राउडर यांनी दिली आहे. DoNotPay च्या सीईओने असेही सांगितले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे टप्पे स्वतः पूर्ण करू शकते. मात्र, असे इंटिग्रेशन केल्याने कंपन्यांचे नुकसान होईल. केवळ कॅप्चा चॅटजीपीटीला ही प्रक्रिया पूर्ण करण्यापासून रोखू शकत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचाः अवघे चार दिवस शिल्लक; ‘या’ बँकेच्या FDवर मिळतंय ७.५० टक्के व्याज

चॅटजीपीटी (ChatGPT) म्हणजे काय?

ChatGPT एक कृत्रिम बुद्धिमत्ता (artifical Intelligence) प्लॅटफॉर्म आहे. हे Open.ai द्वारे तयार केले गेले आहे आणि मायक्रोसॉफ्टने लॉन्च केले आहे. ChatGPT लाँच झाल्यापासून त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. हे एक अतिशय सक्षम व्यासपीठ आहे, जे माणसासारख्या अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकते. चॅटजीपीटीवर जगभरात अनेक प्रकारची कामे होत आहेत. विशेष म्हणजे ते कोडिंगमध्ये लोकांना मदत करत आहे. यामुळे आगामी काळात एआयमुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात किंवा त्यातील मानवी हस्तक्षेप पूर्णपणे कमी करेल, असा धोकाही निर्माण झाला आहे. त्यामुळे लोकांमध्ये बेरोजगारी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. मायक्रोसॉफ्टचा असा विश्वास आहे की, ती केवळ एक समर्थन प्रणाली असू शकते, ती चालविण्यासाठी मानवी देखरेखीची देखील आवश्यकता आहे.

हेही वाचाः अदाणींनी आधी इस्रायलचे सर्वात मोठे बंदर घेतले विकत, आता भारतातील माजी राजदूतालाच…

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: User stated in a widely shared tweet that he earned over 17000 using chatgpt vrd
First published on: 04-04-2023 at 09:58 IST