एस. बी. कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित रिझव्‍‌र्ह बँकेचे डिजिटल रुपी अर्थात सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसी) मंगळवारपासून प्रायोगिक तत्त्वावर वापरास खुले झाले. या पथदर्शी प्रयोगात सहभागासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने सरकारी, खासगी तसेच विदेशी अशा तिन्ही क्षेत्रातील निवडक नऊ प्रमुख बँकांचा समावेश केला आहे. हे डिजिटल रूपी काय? ते क्रिप्टो अर्थात कूटचलनापेक्षा वेगळे कसे? त्याद्वारे होणारे व्यवहार हे सध्या देयक व्यवहारासाठी लोकप्रिय बनलेल्या यूपीआयपेक्षा वेगळे आणि सरस असतील काय? हे समजावून घेऊया…

‘डिजिटल रुपी’बाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचा उल्लेख “ईझ ऑफ लिव्हिंग” म्हणजे आपल जगणं सोपं करणारी प्रणाली असा केला. यामुळे आर्थिक व्यवहार रोख रकमेशिवाय करता येतील आणि यात धनादेश किंवा ऑनलाईन पेमेंट सारखा बँकेचा सहभाग असणार नाही. ‘डिजिटल रुपी’ कसा असेल याबाबतची संकल्पना नुकतीच म्हणजे ७ ऑक्टोबर २०२२ रोजी रिझर्व्ह बँकेने जाहीर केली आहे. लवकरच डिजिटल रुपीचे प्रयोगरूपातील अनावरण केले जाणार असल्याचे त्यात सूचित केले आहे . मात्र डिजिटल रुपी नेमका कसा असेल याबाबत कमालीची उत्सुकता दिसून येते. यातून होणारे व्यवहार सध्या होणाऱ्या ऑनलाईन पद्धतीपेक्षा वेगळे असतील का, डिजिटल रुपी आणि बिटकॉईन किंवा तत्सम कूटचलन (क्रिप्टोकरन्सी) यात नेमका काय फरक असेल याबाबत काहीसा संभ्रमही दिसून येतो.

हेही वाचा… आगामी आठवड्यात काय घडणार ? नियोजित बाजार-संवेदनशील घडामोडींचा तारीखवार क्रम

सेन्ट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसी) म्हणजेच डिजिटल रूपी किंवा ई-रुपी होय. डिजिटल रूपी देशाच्या अधिकृत करन्सी सारखाच किंबहुना अधिकृत चलनच असेल आणि ती रिझर्व्ह बँकेच्या पूर्णपणे नियंत्रणाखाली असेल. सीबीडीसी केंद्रीय बँकेद्वारे जारी करण्यात आलेल्या चलनी नोटांचे एक डिजिटल रूप आहे. भारतात रिझर्व्ह बँकेने देऊ केलेले हे चलन – सेंट्रल बँक डिजिटल करन्सी किंवा डिजिटल रुपया म्हणून ओळखले जाईल. हे चलन अर्थातच रिझर्व्ह बँकेकडून कायदेशीर निविदा म्हणून केली जाऊ शकते. सीबीडीसीला दोन प्रकारात विभागले जाऊ शकते. डिजिटल रुपी रिटेल (सीबीडीसी-आर) आणि होलसेल (सीबीडीसी-डब्लू ). यातील रिटेल सीबीडीसी ही सर्वांच्या वापरासाठी उपलब्ध असेल आणि होलसेल सीबीडीसी हे काही वित्तीय संस्थांत्मक व्यवहारांसाठी असेल.

थोडक्यात असे म्हणता येईल की, डिजिटल रुपी हे रोखीचे इलेक्ट्रॉनिक स्वरूप असून यामुळे रोखीचे व्यवहार डिजिटल पद्धतीने करता येतील. यात बिटकॉईन किंवा तत्सम कूटचलनांमध्ये ज्याप्रमाणे मध्यस्थ बँक नसते त्याचप्रमाणे डिजिटल रुपीत व्यवहार करताना मध्यस्थ बँक असणार नाही. आपण आपल्याकडील डिजिटल रुपी ज्याला द्याल त्याला थेट दिले जातील जशी आपण रोख रक्कम देतो अगदी त्याचप्रमाणे. मात्र रोख रक्कम आपल्याला बँकेतून काढावी लागते किंवा आपल्याला कोणीतरी आधीच्या व्यवहारात दिलेली असते. त्याचप्रमाणे आपल्याला डिजिटल रुपी रिझर्व्ह बँकेकडून घ्यावा लागेल किंवा आपल्याला कोणीतरी दिलेला असेल. अशी डिजिटल करन्सी रिझर्व्ह बँक काही वाणिज्य बँकामार्फत वितरीत करणार आहे.

हेही वाचा… कमावत्या वयातच निवृत्तजीवनाचे नियोजन का गरजेचे?

डिजिटल रुपीची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे असतील:

१) रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी (पतधोरण ) नुसारच डिजिटल रुपी चलन जारी केले जाईल.

२) हे चलन मध्यवर्ती बँकेच्या ताळेबंदात दायित्व (लायबिलिटी) म्हणून दिसेल तर धारकाकडे ही मालमत्ता (अँसेट) असेल.

३) रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी. रवी शंकर यांनी म्हटलं होतं, “डिजिटल रुपी एकप्रकारचं अधिकृत चलनच असतं, जे केंद्रीय बँकेद्वारे जारी केलं जातं. ते अगदी खरोखरच्या पैशांसारखंच असेल आणि मूल्यसुद्धा तितकंच असेल, म्हणजे तुम्ही सध्याच्या एक रुपयाच्या मोबदल्यात एक डिजिटल रुपी घेऊ शकता. डिजिटल रुपी ही रोख आणि संपर्करहित पेमेंट पद्धती असून क्यूआर कोड आणि एसएमएसवर आधारित आहे जे ई-व्हाउचर म्हणून काम करते. या सेवेअंतर्गत पेमेंट करण्यासाठी वापरकर्त्याला कार्ड, पेमेंट डिजिटल अॅप किंवा इंटरनेट बँकिंग प्रवेशाची आवश्यकता नाही. हे कागदी चलनासारखेच आहे. डिजिटल चलनाचेही सध्याच्या चलनासारखेच (फियाट करन्सी) मूल्य असेल

४) सर्व नागरिक, व्यावसायिक, तसेच सरकारी आस्थापना यांच्यासाठी डिजिटल रुपी माध्यमातून व्यवहार करणे सुरक्षित असेल व हे व्यवहार सध्याच्या फियाट करन्सी प्रमाणे अधिकृत असतील.

५) डिजिटल रुपी बँक अथवा रोख रकमेत सहजगत्या रुपांतरित करता येईल.

हेही वाचा… महागाई, चलन दराचा सोन्याच्या भावाशी संबंध कसा?

डिजिटल रुपीचे प्रमुख फायदे :

कार्यक्षमता : हे कमी खर्चिक आहे. व्यवहार देखील जलद होऊ शकतात. त्या तुलनेत चलनी नोटांची छपाई किंमत, व्यवहार खर्चही जास्त आहे.
आर्थिक समावेशकता : डिजिटल चलनासाठी बँक खात्याची गरज नाही. हे ऑफलाइन देखील असू शकते.
भ्रष्टाचाराला प्रतिबंध : सरकार डिजिटल चलनावर लक्ष ठेवेल. डिजिटल रुपयाचा मागोवा घेणे शक्य होईल, जे रोखीच्या बाबतीत शक्य नाही. क्रिप्टो अथवा कूटचलनामुळे जी समांतर अर्थव्यवस्था होऊ घातली आहे तिला यामुळे काही प्रमाणात आळा घालता येऊ शकेल .

आर्थिक धोरण : डिजिटल रुपया किती आणि केव्हा जारी करायचा हे रिझर्व्ह बँकेच्या हातात असेल. बाजारात पैशाची अधिकता किंवा कमतरता यातून सहज व्यवस्थापित केली जाऊ शकते.

क्रिप्टो अथवा कूटचलनाच्या वाढत्या वापरामुळे मनी लॉंड्ररिंग तसेच दहशतवादी कारवायांना अर्थबळाची शक्यता वाढली आहे त्यास आळा घालण्यास डिजिटल रुपीमुळे मदत होऊ शकेल.

डिजिटल रुपीमध्ये क्रिप्टो अथवा कूटचलनाप्रमाणे जोखीम घटक असणार नाही.

हेही वाचा… गोल्ड ईटीएफ : सोन्यात गुंतवणुकीचा सुविधाजनक आणि कर-कार्यक्षम मार्ग

डिजिटल रुपी व डिजिटल पेमेंट यात नेमका काय फरक आहे हे आता आपण पाहू.

डिजिटल पेमेंट करताना ( उदाहरणार्थ, नेट बँकिंग / मोबाईल बँकिंग मार्फत एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस तसेच यूपीआय यासारख्या पद्धतीने पेमेंट करताना) आपण सूचित केलेल्या दुसऱ्या बँकेच्या खात्यात रक्कम जमा होते व या दोन्ही खात्यांची शहानिशा बँकेमार्फत केली जाते आणि मगच पेमेंट होत असते. मात्र डिजिटल रुपी मार्फत व्यवहार होताना कोणतीही मध्यस्थ बँक नसते. देणारा व घेणारा प्रत्यक्ष व्यवहार करतात जशी रोख रक्कम देऊन व्यवहार होत असतात अगदी तसेच. थोडक्यात नोटांच्या ऐवजी डिजिटल रुपी वापरला जाईल.

डिजिटल रुपी हे क्रिप्टो अथवा कूटचलनांच्या पेक्षा वेगळे असणार आहे . कारण हे चलन रिझर्व्ह बँकेने जरी केलेले असून ते सरकारचे अधिकृत चलन असणार आहे . याउलट कूटचलन हे कोणत्याही देशाचे अधिकृत चलन नाही. कूटचलनाच्या बाजारभावात वरचेवर चढ-उतार होत असतात तसे डिजिटल रुपीमध्ये होणार नाहीत. कूटचलन ही डिसेंट्रलाईजड करन्सी असून तिच्यावर कुणाचेही नियंत्रण नसते याउलट डिजिटल रुपी पूर्णपणे रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली असेल.

प्रत्यक्ष वापरता आल्यावर डिजिटल रुपी बाबतच्या गोष्टी आणखी स्पष्ट होतील सध्या तरी त्याबाबत उत्सुकता वाढत आहे.