Rs 2000 Notes Withdrawn from : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. काल, १९ मे रोजी यासंदर्भातील मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे २ हजारच्या नोटा आहेत, त्यांनी तत्काळ बँकेत जाऊन बदलून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत नागरिक २ हजारच्या नोटा बँकेतून बदलून घेऊ शकतात. परंतु, विविध कारणांमुळे बँका नोटा बदलून देण्यास नकार देऊ शकते. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास काय करायचं? असा प्रश्न तुम्हाला सतावत असेल. बँकेने नोटा बदलून देण्यास नकार दिला तर काय कराल हेच आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बँकेने नोटा बदलून नकार दिल्यास काय कराल?
- तुमच्याकडील दोन हजारच्या नोटा तुम्ही बँकेत बदलायला गेल्यास बँक तुम्हाला नकार देऊ शकते.
- अशावेळी सर्वांत प्रथम संबंधित बँकेत तक्रार दाखल करावी.
- बँकेत तक्रार दाखल केल्यानंतर ३० दिवसांनीही बँकेने तुमच्या तक्रारीची दखल घेतली नाही तर Reserve Bank – Integrated Ombudsman Scheme (RB-IOS), 2021 याअंतर्गत तक्रारदार तक्रार दाखल करू शकते.
- cms.rbi.org.in. या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तक्रार दाखल करू शकता.
तुमच्याकडे २००० रुपयांची नोट आहे, मग तुम्ही काय कराल?
तुमच्याकडे २००० रुपयांच्या नोटा असतील तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्या बदलून घेऊ शकता, यासाठी आरबीआयने पुरेसा वेळ दिला आहे.
हेही वाचा >> विश्लेषण : आरबीआयने २ हजारांच्या नोटा वितरणातून काढल्या; आता तुमच्याकडील नोटांचं काय? वाचा…
आता २००० रुपयांची नोट चालणार की नाही?
२००० रुपयांची नोट पूर्णपणे कायदेशीर आहे. ती आता सिस्टममध्येही चालणार आहे. पण आता सामान्य व्यक्तीसुद्धा २ हजार रुपयांच्या नोटेनं व्यवहार करण्यास टाळाटाळ करण्याची शक्यता आहे. कारण ती नोट आता बदलून घ्यावी लागणार आहे. त्यामुळे ती नोट बदलण्याचा त्रास टाळण्यासाठी दुकानदार ती घेणं टाळू शकतात.
तुम्हाला २००० रुपयांच्या नोटा कुठे बदलून मिळतील?
आरबीआयने सांगितले की, २००० रुपयांची नोट कोणत्याही बँकेत बदलता येते. म्हणजेच जर तुमचे खाते स्टेट ऑफ इंडिया (SBI) मध्ये असेल आणि तुमच्या घराजवळ पंजाब नॅशनल बँक (PNB) असेल, तर तुम्ही PNB मध्ये जाऊन २००० रुपयांची नोट बदलून घेऊ शकता. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास नोटा बदलून घेण्यासाठी कोणत्याही विशिष्ट बँकेत जाण्याची गरज नाही. कोणत्याही बँकेला भेट देऊन या बदलून घेतल्या जाऊ शकतात.
२००० रुपयांच्या नोटा कधीपासून बदलू शकतो?
बँकामध्ये २३ मे २०२३ पासून ते ३० सप्टेंबरपर्यंत २००० रुपयांच्या नोटा बदलून देण्याचे काम सुरू राहणार आहे. कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी बँकेच्या कामकाजाच्या वेळेत या नोटा कधीही बदलून घेता येतील.
एका वेळी २००० रुपयांच्या किती नोटा बदलू शकतो?
बँकेच्या सामान्य कामकाजात अडथळा येऊ नये, यासाठी एकाच वेळी २०,००० रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच २३ मे २०२३ पासून तुम्ही २००० रुपयांच्या नोटा एकावेळी १० नोटा म्हणजेच २०,००० रुपयांपर्यंत बदलू शकता.
२००० रुपयांची नोट कधीपर्यंत बदलता येईल?
तुमच्याकडे २००० रुपयांची नोट बदलण्यासाठी पुरेसा वेळ असेल. त्यामुळे कोणत्याही प्रकारची घाई करण्याची गरज नाही. आरबीआयने सांगितले आहे की, ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २००० रुपयांच्या नोटा बदलता येतील. म्हणजेच या नोटा बदलून घेण्यासाठी २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंत वेळ असेल.
हीसुद्धा नोटाबंदी आहे का?
नाही. ही नोटाबंदी अजिबात नाही. २००० रुपयांच्या नोटा पूर्णपणे वैध राहतील. त्या अद्याप बंद केल्या गेल्या नाहीत. फक्त त्या सिस्टममधून काढून घेण्यासाठी वेळ दिला जात आहे. ज्या उद्देशासाठी त्या छापल्या होत्या तो आता पूर्ण झाला आहे, असे आरबीआयला वाटते.