‘माझा पोर्टफोलियो’ या साप्ताहिक सदरातून गुंतवणुकीसाठी शेअर्स सुचविले जातात. हे सुचविलेले शेअर्स म्हणजे ‘खरेदीची टीप’ नसून एक अभ्यासपूर्ण विवेचन असते. तुमचा पोर्टफोलियो तयार करताना सदरात सुचविलेल्या शेअरचादेखील विचार करावा; परंतु तो स्वतः अभ्यासून, असा यामागे विचार आहे. या सदराचे उद्दिष्ट केवळ सुचविलेले शेअर्स खरेदी करणे हे नसून वाचक गुंतवणूकदारांनी निवडीचे निकष म्हणून दिलेल्या गुणोत्तरांखेरीज आपलेही इतर निकष लावून मगच गुंतवणूक करावी हा आहे.

हेही वाचा- व्होडा-आयडियाला भांडवली साहाय्याचा मुद्दा चर्चापटलावर – वैष्णव

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
loksatta money motra article Growth and Value strategy
तुमची रणनीती काय? ‘ग्रोथ की व्हॅल्यू’

मध्यंतरीच्या एका कार्यक्रमात अनेक वाचकांनी/ श्रोत्यांनी पोर्टफोलियो कसा करावा, शेअर्स कसे निवडावेत किंवा शेअर्स निवडताना इतर कुठले निकष लावावेत, असे प्रश्न विचारले होते. दर महिन्यातील दुसऱ्या सोमवारी आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.खरे तर कुठलीही गुंतवणूक ही त्या गुंतवणूकदाराच्या आर्थिक साक्षरतेखेरीज, त्याचे वय, त्याच्या वरच्या जबाबदाऱ्या, त्याचे शिक्षण, आर्थिक क्षमता, जोखीम घ्यायची वृत्ती आणि अर्थात मानसिकतेवर अवलंबून असते. एक गोष्ट मात्र नक्की, गुंतवणुकीचे पर्याय शोधताना गुंतवणुकीचे उद्दिष्ट, सुरक्षितता आणि त्यावरील परतावा (रिटर्न्स) याचा नक्की विचार करावा. पोर्टफोलियो म्हणजे नक्की काय? या प्रश्नाचे उत्तर एका सोप्या वाक्यात द्यायचे झाले तर, आपल्या गरजांप्रमाणे उद्दिष्ट ठेवून विविध पर्यायांत केलेल्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन. पोर्टफोलियो हा व्यक्तीसापेक्ष असल्याने तो प्रत्येक गुंतवणूकदाराचा वेगळा आणि तरीही उद्दिष्टपूर्ती करणारा असू शकतो. पोर्टफोलियोचे व्यवस्थापन करताना गुंतवणूकदाराने आपल्या भविष्यातील गरजा, जबाबदाऱ्या, उत्पन्न, कर नियोजन, तरलता, परतावा इ. सर्वच बाबींचा विचार आवश्यक असतो. पोर्टफोलियोसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असल्याने गुंतवणूकदाराला नियोजन आणि व्यवस्थापन अशा दोन्ही बाबींचा मेळ साधणे आवश्यक आहे. जेवणासाठी जसा बुफे मांडलेला असतो त्याप्रमाणेच सुदैवाने हल्ली गुंतवणुकीचे अनेक पर्याय गुंतवणूकदारांना उपलब्ध आहेत.

हेही वाचा- वाहन विक्री २०२२ मध्ये २.११ कोटींवर : ‘फाडा’

गुंतवणुकीचे विविधांगी पर्याय वापरून पोर्टफोलियो का करावा? एकाच पर्यायात गुंतवणूक केल्यास धोका वाढतो. हा धोका कमी करण्यासाठी विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक करावी. उदाहरणार्थ, संपूर्ण रक्कम फक्त सोन्यात गुंतवली आणि नेमका सोन्याचा भाव गडगडला तर भरपूर नुकसान होईल. परंतु हीच रक्कम सोने, शेअर्स, मुदत ठेव, म्युच्युअल फंड, स्थावर मालमत्ता अशी गुंतवली तर धोका कमी होईलच, शिवाय परतावाही वाढेल. ‘Don’t keep all eggs in one basket’ ही म्हण इथे चपखल बसते. त्यामुळे प्रत्येक गुंतवणूकदाराचा पोर्टफोलियो त्याच्या आर्थिक नियोजनानुसार वेगळा असेल. उदाहरणार्थ, सावंत आणि कुलकर्णी हे दोन मित्र एकाच वयाचे असले तरीही त्यांचे पोर्टफोलियो पुढीलप्रमाणे असू शकतात.                                    

सावंत कुलकर्णी

गुंतवणूक पर्याय पोर्टफोलियोचा टक्का % पोर्टफोलियोचा टक्का %

१. बँक मुदत ठेवी १५                                  १०

२. पोस्ट / पीपीएफ इ. १५                             ००

३. म्युच्युअल फंड १५                                 २५

४. कंपनी मुदत ठेवी १०                                ००

५. शेअर्स             १०                                  ३५

६. सोने/ चांदी             १०                            ०५

७. स्थावर मालमत्ता / सेकंड होम २५               २५

हेही वाचा- वित्तीय तूट वार्षिक अंदाजाच्या ५८.९ टक्क्यांवर; पहिल्या आठ महिन्यांत ९.७८ लाख कोटी रुपयांवर

वरील उदाहरणात दोन्ही गुंतवणूकदारांचे ‘रिस्क प्रोफाइल’ अर्थात जोखीम क्षमता ही सहज अभ्यासता येईल. तसेच प्रत्येक गुंतवणूक पर्यायाचा एक स्वतंत्र पोर्टफोलियो असू शकेल. म्हणजे बँक मुदत ठेवीत कालावधी, व्याज पर्याय हा चक्रवाढ व्याजाने किंवा मासिक, त्रैमासिक, वार्षिक यानुसार, तर म्युच्युअल फंडात इक्विटी, डेट, हायब्रिड, फंड ऑफ फंड्स इ. अनेक पर्याय असू शकतात. या सदरात मात्र आपण केवळ शेअर्सच्या पोर्टफोलियोसंबंधात अभ्यास करणार आहोत.पोर्टफोलियो कसा असावा?

हेही वाचा- ‘एनडीटीव्ही’मधील अदानी समूहाचा हिस्सा ६४ टक्क्यांवर

प्रत्येकाला आपला पोर्टफोलियो आयडियल आणि उत्तम असावा असे वाटत असते आणि ते साहजिकच आहे. परंतु तसा पोर्टफोलियो करण्यासाठी आपण किती वेळ देतो आणि किती अभ्यास करतो तेही पाहायला हवे. मला वाटते प्रत्येक पोर्टफोलियोला एक उद्दिष्ट हवे. पोर्टफोलियोतून वार्षिक किमान २० टक्के परतावा तरी मिळायला हवा. तसेच पोर्टफोलियोसाठी कंपन्या निवडताना पोर्टफोलियो समतोल राहील याची काळजी घ्यायला हवी. म्हणजे पोर्टफोलियोत २० पेक्षा जास्त कंपन्या नसाव्यात; परंतु त्याच वेळी पोर्टफोलियो वेगवेगळ्या क्षेत्रांतील कंपन्यांच्या समावेशाने संतुलित आहे ना याचीही खात्री करून घ्यायला हवी. सुरक्षितता आणि द्रवणीयता यासाठी शक्यतो लार्ज कॅप शेअर्स निवडावेत. किंबहुना मी तर म्हणेन की, पोर्टफोलियोत किमान ५० टक्के शेअर्स लार्ज कॅप हवेत. मिड कॅप अथवा स्मॉल कॅप निवडताना त्या कंपनीच्या कामगिरीमुळे तो शेअर लार्ज कॅप होईल असा निवडावा. उदाहरणार्थ, एके काळी स्मॉल कॅप असलेले विनाती ऑरगॅनिक्स, पर्सिस्टंट सिस्टीम्स, सुंदरम फायनान्स, दीपक नायट्राइटसारखे शेअर्स आता त्यांच्या उत्तम कामगिरीमुळे मिड/ लार्ज कॅप झाले आहेत. पोर्टफोलियोत शेअर्स निवडताना ते कुठल्या क्षेत्रातील निवडावेत तसेच त्याला कुठले निकष लावावेत हे पुढच्या लेखात पाहू या.

अजय वाळिंबे

Stocksandwealth@gmail.com

Story img Loader